इंडिगोला वाळू डम्परची जोरदार धडक; दोन ठार

0

भेंडा (वार्ताहर)- नेवासा तालुक्यातील भेंडा येथून चिलेखनवाडीच्या दिशेने जाणार्‍या इंडिगो या वाहनाला भरधाव डम्परचे जोरदार धडक दिल्याने इंडिगोचा चालक जागीच ठार झाला. तर या गाडीतील अन्य चौघे अत्यवस्थ असून त्यांना नगर येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना कुकाणा-चिलेखनवाडी रस्त्यावरील पेट्रोलपंपानजीक सोमवारी रात्री 10.15 वाजेच्या सुमारास घडली.

जखमी मधील विनोद बर्डे (वय 16) रा चिलेखनवाडी याचे नगर सिव्हिल मध्ये उपचार घेतांना निधन झाले असून भारत धनवडे याची प्रकृती चिंताजनक आहे. 

चालक चिलेखनवाडीचा असून त्याच्या नातेवाईकासह तो इंडिगो नं. एमएच 04-सीएम 2194 मधून भेंड्याहून आपल्या गावी निघाला.

मध्ये एका ढाब्यानजीक गाडी थांबविण्यासाठी चौघांनी हात केल्याने आणि गावातील असल्याने त्यांनाही या गाडीत घेण्यात आले. इंडिगो चिलेखनवाडी रस्त्यावरील पेट्रोलपंपानजीक आली असता समोरून भरधाव वाळूचा डम्पर तुर्बो 1613 मॉडेल (नं. एमएच के 9747)येत होता. या ठिकाणी असलेल्या बोअर मारण्याच्या वाहनाला घासून गेला. त्यानंतर या इंडिगो या वाहनावर जोरदार आदळला. त्यामुळे मोठ्याने आवाज झाला.

ही इंडिगो रस्त्याच्या कडेला लोटली गेली. यात चालक अक्षय शाम दळवी (वय25, चिलेखनवाडी) याचा जागीच मृत्यू झाला. तर या वाहनात बसलेल्या अन्य चौघे साईनाथ आरले (वय20), विक्रम दीपक ओहळ (वय 40), भारत धनवटे (वय 18), सोनू गुंजाळ (वय 18), विनोद बर्डे (वय 16) हे गंभीर जखमी झाले. ही घटना घडताच आसपासचे लोक मदतीला धावले. या इंडिगोतून जखमींना बाहेर काढून त्यांना उपचारासाठी 108 रूग्णवाहिकेतून नगरला रवाना करण्यात आले. त्यांची प्रकृती अत्यावस्थ असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

*