वार्षिक राशिभविष्य 2023 : वृषभ : प्रथम भाग्योदय नंतर अडचणीचा काळ!

वार्षिक राशिभविष्य 2023 : वृषभ : प्रथम भाग्योदय नंतर अडचणीचा काळ!

पुरुष - प्रथम तीन महिन्यांचा काळ हा अत्यंत भरभराटीचा असणार आहे. या तीन महिन्यांत आपल्या मनातील सर्व इच्छा या पूर्ण होणार आहेत. ज्या कामांना आपले नातेवाईकांकडून विरोध होत होता, तर वरील काळात या कामांना होकार मिळेल. आपण ज्या कामासाठी खूप मेहनत घेऊनही यशाची प्राप्ती होत नव्हती, अशी कामे थोड्याश्या प्रयासाने यशस्वी होतील. अविवाहितांना योग्य स्थळे प्राप्त होऊन शुभ-मंगल सावधानदेखील होणार आहे. मेनंतरचा काळ हा आपणास ताकही फुंकून प्यावे लागणार आहे. हा काळ समस्यांनी भरलेला असेल. आर्थिक बाजू कमजोर होणार आहे.

स्त्रिया - उपवर मुलींना आतपर्यंत पसंतीची स्थळे येत नव्हती ती एप्रिलअखेरपर्यंत येतील व शुभमंगल सावधान पण होईल. प्रेमविवाहाबाबतीत आपल्या ओळखी झालेल्या असतील तर याबाबतीत माता-पित्यांना सूचना द्याव्यात. फार वर्ष झाली तरी संतान नाही. टेस्ट ट्यूब बेबी सफल होत नाही. अशा दाम्पत्यांना प्रथम तीन महिने संततीसाठी उत्तम ग्रहयोग आहेत. पुन:श्च टेस्ट ट्यूबचा प्रयत्न करावा. संसारात वाद होऊन घटस्फोटापर्यंत प्रकरणे जाण्याची स्थिती मे ते डिसेंबर काळात असेल अशा दाम्पत्यांनी वाद होणार नाहीत, या पद्धतीने वागावे. समझोत्याची भूमिका घ्यावी.

नोकरवर्ग - ज्यांना नोकरी आहे व बदलीची इच्छा आहे. अशा नोकरदारांनी मार्च-2023 अखेरपर्यंत प्रयत्न करावे. त्यात सफलता मिळेल. याच काळात नोकरीच्या कामातील आपली प्राविण्यता पाहून आपणास बढती दिली जाईल. पगारवाढ होईल. प्रथम तीन महिन्यांत नोकरी इच्छुकांनी प्रयत्न करावेत. नोकरी प्राप्त होईल. मे ते डिसेंबर हा काळ सर्वच नोकरवर्गास समस्या पूर्ण करणारा असणार आहे. या काळात वरिष्ठ वर्गाची नाराजीदेखील सोसावी लागेल. नोकरी राहील की नाही? याबाबत प्रश्नचिन्ह आहेत. अनारोग्याचे प्रसंग, नोकरी ठिकाणी वादाचे प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे, सावध असावे.

व्यवसाय - व्यावसायिकांना मागील कोरोना काळात जी हानी झालेली आहे, ती हानी प्रथम तीन महिन्यांत भरुन निघण्याची शक्यता आहे. हे तीन महिने अधिकाधिक व्यापार करावा आणि लाभ कमवावा. व्यापार, व्यवसायात वाढ करावयाचा असल्यास हीच योग्य वेळ आहे. तसेच व्यापारासाठी जागा खरेदीच्या संधी प्राप्त होतील. मे-2023 पासून मात्र आपणास व्यवसाय करताना खूप सावधानता बाळगावी लागणार आहे. फसवणुकीच्या घटना घडण्याचे योग आहेत. आर्थिक व्यवहार हे नोकरांच्या हाती सोपवू नका. दुर्लक्षामुळे आर्थिक नुकसानीची शक्यता आहे.

विद्यार्थी वर्ग - सिव्हिल इंजिनिअर, आर्किटेक्ट, इंटेरियल डेकोरेटर, प्लास्टिक सर्जन, ब्यूटी पार्लर, हॉटेल मॅनेजमेंट, फॅशन डिझायनर, फोटोग्राफी, कलाकार, कलावंत, गायन, नर्तन, वाद्य, संगीत, नट यासंबंधित शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना प्रथम चार महिने यश मिळवून देणारे असणार आहेत. 15 एप्रिलनंतर 30 तारखेपर्यंत समस्यांना सुरुवात होणार आहे. मे ते डिसेंबर हा काळ विद्यार्थी वर्गास मन विचलित करणारा काळ असेल. या काळात इतरत्र कुठलेही कार्य करु नका. आपण आपले शालेय कार्य व शालेय जीवन तसेच शालेय अभ्यासात परिपूर्ण लक्ष द्यावे.

राजकारणी - प्रथम महिना हा राजकारणी व्यक्तींना शुभ समाचार घेऊन येणारा ठरणार आहे. पक्षश्रेष्ठींकडून आपली इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. त्याप्रमाणे आपणावर मोठी जबाबदारीदेखील टाकली जाणार आहे. आपण या काळात निवडणूक लढवित असाल तर आपली पक्षनिष्ठा पाहून आपणास विजय-पराजय प्राप्त होणार आहे. जून-2023 नंतर मात्र आपण आपल्या राजकारणात सावध राहावे. घाईगर्दीत, गडबडीत कुठलाही निर्णय घेऊन अन्यथा हा राजकारणदृष्ट्या आत्मघातक ठरणार आहे. आपले विचार पाहून आपले कार्यकर्ते पण विचार करावयास लागणार आहे.

आरोग्य - ज्यांची ऑपरेशन झालेली आहेत व याबाबतीत आपणास काळजी आहे. अशा सर्वांना आता काळजी करण्याची गरज नाही. त्यांच्या आरोग्यात सुधारणा निश्चितपणे होणार आहे. जानेवारी ते मार्च-2023 हा काळ सर्वच वृषभ राशी व्यक्तींना आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असणार आहे. वृषभ राशी व्यक्तींना मी सांगू इच्छितो की, आपणास डॉक्टरांनी ऑपरेशनचा सल्ला दिला असल्यास आपण जानेवारी ते मार्च-2023 यादरम्यान करावेत. एप्रिल ते डिसेंबर-2023चा काळ हा आरोग्य समस्यांचा असेल. काहींना काही लहान-मोठे आजार या काळात होण्याची शक्यता राहील. या काळात आरोग्यास सांभाळावे.

आर्थिक - वर्षाची सुरुवातच आर्थिक बाबतीत उन्नतीचा संदेश घेऊन येणारा ठरणारा आहे. आपण जी कामे या काळात कराल, त्या सर्वच कार्यात आपण आर्थिक लाभ कमविणार आहात. नवीन कार्यारंभ आपण या वर्षाच्या सुरुवातीस करु शकतात. इ.स.2023 मधील जानेवारी, फेब्रुवारी हे दोन महिने आपणास आर्थिक सुलभता लाभणार आहे. मार्च हा महिना म्हणजे पैसे मोजणारा असेल, अशी आर्थिक कामे प्रगतीपथावर राहील. मे, जून महिन्यात आर्थिक कामाची गजी कमी होणारी असेल यानंतर आपण आर्थिकबाबतीत काळजी घ्यावी. कर्ज काढावे लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com