Saturday, April 27, 2024
Homeभविष्यवेधवार्षिक राशिभविष्य 2023 : मीन : मनातील इच्छा पूर्ण करणारे वर्ष

वार्षिक राशिभविष्य 2023 : मीन : मनातील इच्छा पूर्ण करणारे वर्ष

पुरुष – नवीन वर्ष 2023 हे संपूर्ण वर्ष समस्त मीन राशी व्यक्तींना आपण करणार असलेल्या प्रत्येक कार्यास सफलता प्राप्त होणार आहे. आपणास कार्याच्या माध्यमातून अपेक्षित लाभ पण मिळणार आहे. खरोखरच 2023 हे वर्ष आपल्या सर्व आशा-आकांक्षा पूर्ण करणार आहेत. या ग्रहगोलाचा लाभ आपण घ्यावा. आपण करीत असलेल्या कार्याच्या व्यतिरिक्त कार्य आपण अवश्य करावे. यातून आपणास सफलता मिळेल व दुसरे कार्यदेखील होईल.

स्त्रीया – विवाह जमविण्याच्याबाबतीत खास करुन तरुणींना उत्तम अशी ग्रहगोलाची साथ आपणास मिळरार आहे. नवतरुणींना विवाहस्थले भरपूर येणार असल्यामुळे वराची निवड आपणास करता येणार आहे. प्रेमविवाह योग्य कुंडली असलेल्या मुलींनी प्रेमयोग संबंध पूर्वी आपला जोडीदार कसा आहे? शिक्षण, नोकरी, आई, वडील, घरदार सर्वकाही बघावे. तो आपणास फसवित तर नाही याबद्दल खात्री करावी योग्य नसल्यास स्पष्ट नकार द्यावा. प्रेमपूरक अशी भरपूर स्थळे मिळण्याचे योग या नवीन वर्षात असणार आहेत.

- Advertisement -

नोकरवर्ग – नोकरवर्गाची तर या नवीन 2023 मध्ये चांदीच होणार आहे. भरपूर पगारवाढ केली जाईल. सरकारी नोकरांना न मागता पगारवाढ केली जाणार आहे. वरकढ अभिलाषा आपण बळी पडू नये. नोकरी इच्छुकांनी योग्य तर्‍हेने प्रयत्न केल्यास नोकरी प्राप्त होईल. कंपनीमार्फत आपणास परदेश दौरा घडणार आहे. नोकरवर्ग अविवाहित असला तर त्यांचे याचवर्षी शुभमंगल झाल्याशिवाय राहत नाही. वरिष्ठांची मर्जी आपणावर सदैव राहणार आहे. शक्यतोवर नोकरी सोडून दुसरी नोकरी स्वीकारु नये.

व्यवसायिक – कोरोना काळात झालेले नुकसान हे भरुन काढणारे वर्ष व्यवसायिकांना लाभणार आहे. 2023चे संपूर्ण वर्ष हे आपले मनाप्रमाणे व्यवसाय करणारे असणार आहे. खरे तर व्यवसायिकांनी 2023 मध्ये धाडसाने व्यवसाय करावेत. मर्यादित व्यवसायसाठीचे समाधान न करता मोठ्या प्रमाणावर व्यवसाय करावा. कारण अशी योग्य ग्रहस्थिती भाग्यकारक आपणास मिळत आहे. याचा उपयोग आपण करुन घ्यावा. नवीन शाखा सुरु कराल. वाहन जागा खरेदीचे योग प्रबळ आहेत.

विद्यार्थीवर्ग – या नवीन वर्षात 2023 चे संपूर्ण वर्षभर आपणास शुभग्रहाची साथ लाभणार आहे. मग विद्यार्थीवर्गाचे पण कर्तव्य आहे की आपण भरपूर अभ्यास करुन या ग्रहगोलांना साथ द्यावी व अपेक्षित यश मिळवावे. नवीन शाळेतील प्रवेश आपणास सहज प्राप्त होईल. काही कायदेशीर अडचणी असतील तर ते पण दूर होतील. मेडिकल, सायन्स, गणित, वकील या विद्यार्थीवर्गास अत्यंत उपयुक्त असे हे वर्ष आहे. सिव्हिल आर्किटेक्ट, कृषी विभाग विद्यार्थीवर्गास यश मिळेल.

राजकारणी – राजकारणी व्यक्तींना प्रस्तुत वर्ष हे यशदायी आहे. आपण पक्षनिष्ठा ठेऊन कार्य केल्यास आपणास पक्षश्रेष्ठींकडून वरिष्ठ पद दिले जाईल. राज्यकर्त्यांना डावलून कार्य केल्यास ते अहितकारक ठरणार आहे. वचनबद्ध असलेल्या राज्यकर्त्यांना अभुतपूर्व असे कार्य लाभ मिळण्याची शक्यता आहे. राज्यकर्ते आपले मुलांना राजकारणात टाकण्याचा हा योग्य काळ आहे. मीन राशी तरुण-तरुणी महिलांना राजकारणाची आवड असल्यास महिलांसाठी राखीव जागा असल्यास प्रचाराचा नारळ फोडूनच टाका.

आरोग्य – वृद्धजणांना थोडी फार आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. पाण्यापासून दूर राहावे. घसरुन पडण्याचा धोका अधिक राहणार आहे. हृदयादी विकार हाडांची दुखणी त्रास करणारी राहतील. याबाबतीत एखादे ऑपरेशनचे योग पण प्रभावीत आहेत. अनारोग्य असणार्‍या रुग्णास आरोग्याचा लाभ मिळेल. तब्येत अधिकतर मीन राशी व्यक्तींच्या ठणठणीत राहतील. फारसी आरोग्याची काळजी यावर्षी करावी लागणार नाही. किरकोळ सर्दी पडसे, डोकेदुखी, कंबरदुखी यासारखे विकार उद्भवतील.

आर्थिक – नवीन वर्ष 2023 चे आपणास संपूर्ण काळ हा दिवाळी, दसर्‍यासारखा असणार आहे. दोन हातांनी किती घेता? अशी स्थिती यावर्षात निर्माण होणार आहे. आपण कुठलेही कार्य करा आर्थिक लाभ मिळण्याची जी कामे असतील त्यातून आपणास आर्थिक लाभ हा मिळणारच आहे. या काळात मात्र आपण प्रलोभनास बळी पडू नये. आर्थिक कामे शक्यतोवर स्वत:च्याच हाताने करावीत. दीर्घकालीन गुंतवणूक ही अधिकतर सोने-चांदी यासारख्या मूल्यवान वस्तुत करावी. गुंतवणूक गोपनीय ठेवावी.

नातीगोती- रक्तादी संबंधितच नातेवाईक कामास येतात याची प्रचिती आपणास यावर्षी येईल. सासुरवाडीकडील मंडळी आपणावर आर्थिक बोजे टाकणार आहेत. चुकीचे मार्गदर्शन केले जाण्याचे योग आहेत. मोठे मामा व आपणात वादाचे योग आहेत. आपला ज्यात भाग नाही अशा घटनांबाबत आपणावर ठपका ठेवला जाणार आहे. नातेवाईकांची वर्दळ नवीन वर्षात आपणा घरात अधिक वाढणार आहे. धार्मिक कार्य आपले हातून संपन्न होणार आहेत. धार्मिक तिर्थाटनात सासरवाडीच्या लोकांचा हस्तक्षेप होणार आहे. कारण नसतांना नातेवाईकावर आपण अधिक खर्च कराल.

- Advertisment -

ताज्या बातम्या