अशा खुणा असलेल्या महिला ठरतात भाग्यवान!

अशा खुणा असलेल्या महिला ठरतात भाग्यवान!

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर नशिबाची साथ मिळावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. महिला आणि पुरुष दोघांच्याही शरीरावर अशा काही खुणा असतात जे भाग्यवान असण्याचं लक्षण मानलं जातं. शरिरावर असलेल्या या शुभ चिन्हाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

प्रत्येक पुरुषाच्या यशामागे स्त्रीचा हात असतो. काहीजण याला ‘लेडी लक’ (Lady Luck) म्हणतात. आपल्याकडे अनेक ठिकाणी वडिलांचं घर असो की सासर, सर्वत्र महिलांना देवीचा मान दिला जातो. दरम्यान महिलांच्या शरीरावर असलेल्या खास खुणा भाग्यवान असल्याचे संकेत देतात.

पायावर तीळ - (Mole on the feet) सामुद्रिक शास्त्रानुसार, जर एखाद्या स्त्रीच्या पायाच्या तळव्यावर त्रिकोणी चिन्ह असेल तर ती बुद्धिमान असल्याचं म्हटलं जातं. असं म्हणतात की, अशा महिला इतरांच्या मदतीसाठी नेहमीच पुढे असतात.

नाभीजवळ तीळ - (Mole near the navel) असं मानलं जातं की, जर एखाद्या स्त्रीच्या नाभीखाली तीळ असेल तर ते कुटुंबासाठी खूप शुभ असते. हे चिन्ह केवळ त्यांना भाग्यवान बनवत नाही तर आनंद आणि समृद्धी देखील दर्शवतं.

पायाचा अंगठा - (Toe) असं म्हणतात की, ज्या महिलेचं पायाच्या बोटाचा अंगठा लांब असतो, तिला आयुष्यात खूप त्रास सहन करावा लागतो. पण जर स्त्रीचा अंगठा रुंद, गोलाकार आणि लाल असेल तर ती खूप भाग्यवान मानली जाते.

जीभ - (Tongue -) ज्या महिलांची जीभ अतिशय मऊ आणि गुलाबी असते त्यांना आनंदाचं प्रतीक मानलं जातं. अशा महिलांच्या घरी तसंच कुटुंबात नेहमी आनंदाचे वातावरण असतं.

डोळे- (Eyes) हरणासारखे सुंदर डोळे असलेल्या स्त्रिया खूप भाग्यवान असतात. जर डोळ्याचा कोपरा लाल असेल तर ते स्त्री भाग्यवान असल्याचे संकेत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com