Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधचंद्र-बुध ग्रहाची विद्वत्ता.. गुरु ग्रहाची एकनिष्ठता!

चंद्र-बुध ग्रहाची विद्वत्ता.. गुरु ग्रहाची एकनिष्ठता!

प्रफुुुल्ल कुलकर्णी

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग (Former Prime Minister Manmohan Singh) यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी गाह-पंजाब येथे झाला. सिंग यांचे कुटुंब 1947 मध्ये फाळणीच्या वेळी भारतात स्थलांतरित झाले. सिंग हे अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी आहेत. ते 2004 ते 2014 असे प्रदीर्घ काळ भारताचे 13 वे पंतप्रधान होते. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य असलेले सिंग हे भारताचे पहिले शीख पंतप्रधान होते.

- Advertisement -

मनमोहन सिंग राजकारणी नव्हते. विद्वत्तेमुळे नेहरूनंतर सलग दहा वर्षे पंतप्रधान म्हणून त्यांनी कामगिरी बजावली. मणिबंधातून शुक्र ग्रहावरून थेट बुध ग्रहावर पोहोचलेली विद्वान रेषा बुध ग्रह हा हुशारीची व विद्वत्तेचा कारक आहे. बुध ग्रहावर मणिबंधाकडून अथवा तळहाताच्या कुठल्याही भागातून एक रेषा जाऊन थांबत असेल तर असे लोक अत्यंत हुशार व चलाख असतात. हस्तसामुद्रिकशास्त्रात बुध रेषा ही आत्यंतिक व्यावहारिक हुशारी व कल्पकता देणारी रेषा आहे. बुध रेषेचा उगम सर्वसाधारणपणे आयुष्य रेषा, भाग्य रेषेतून अथवा चंद्र ग्रहावरून होत असतो.

शुक्र व बुध ग्रहाच्या शुभ युतीमुळे सिंग यांना बुध ग्रहाने विद्वत्ता प्रदान केली व शुक्र ग्रहाने ऐश्वर्य, सुखसोयी प्रदान केल्या. अशी शुक्र बुध ग्रहाची युती सिंग यांचे हातावर आहे. यांच्या आधी अशी युती व शुक्र बुध शुभ योगाची रेषा पाहण्यात अली नाही. त्यामुळेच ती अद्वितीय व वैशिष्ट्य पूर्ण आहे व भाग्यवंताच्याच हातावर असू शकते. भारताच्या राजकारणात, राजकारणापासून कोसो दूर असलेले मनमोहन सिंग हे पहिले पंतप्रधान ज्यांनी पंतप्रधानपदाच्या दोन पूर्ण टर्म यशस्वी व समर्थरित्या सांभाळल्या.

ऑक्सफर्डमधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवल्यानंतर सिंग यांनी 1966-1969 दरम्यान संयुक्त राष्ट्रांसाठी काम केले. त्यानंतर ललित नारायण मिश्रा यांनी त्यांना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयात सल्लागार म्हणून नियुक्त केले. 1970 आणि 1980 च्या दशकात सिंग यांनी भारत सरकारमध्ये मुख्य आर्थिक सल्लागार (1972-1976), रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर (1982-1985) आणि नियोजन आयोगाचे प्रमुख (1985-1987) यासारखी अनेक महत्त्वाची पदे भूषवली.

1991 मध्ये भारताला गंभीर आर्थिक संकटाचा सामना करावा लागला. तेव्हा तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांनी आश्चर्यकारकपणे गैरराजकीय मनमोहन सिंग यांना त्यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री म्हणून समाविष्ट केले. अग्रगण्य सुधारणा विचारसरणीचे अर्थशास्त्रज्ञ म्हणून सिंग यांची जागतिक स्तरावर प्रतिष्ठा वाढवली. सिंग हे 1998-2004 च्या अटलबिहारी वाजपेयी सरकारच्या काळात राज्यसभेत विरोधी पक्षाचे नेते होते. 2004 मध्ये जेव्हा काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी (यूपीए) सत्तेवर आली, तेव्हा अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अनपेक्षितपणे सिंग यांच्याकडे पंतप्रधानपद सोपविले. 1991 ते 2019 पर्यंत आसाम राज्याचे आणि 2019 पासून त्यांनी राज्यसभेत राजस्थानचे प्रतिनिधित्व केले.

आरोग्य रेषा – चंद्र ग्रहावरून उगम पावलेली व बुध ग्रहपर्यंत न पोहोचलेली रेषा अथवा हृदय रेषेच्या अलीकडेच थांबलेली आरोग्य रेषा म्हणून ओळखली जाते. आरोग्य रेषेवरून त्या व्यक्तीच्या अयोग्याची कल्पना येते, व्यक्ती निरोगी आहे का हे समजते. हातावर दुर्धर रोगाच्या खाणा खूणा आरोग्य रेषाचा पोत चंद्र ग्रहावर कसा आहे किंवा आरोग्य रेषा कुठल्या स्वरूपाची आहे, त्यावरून आजारपणाची व एकंदरीत आरोग्याची कल्पना येते. आरोग्य रेषा चंद्र ग्रहावर असताना ती चट्टायुक्त, तुटक, वेडीवाकडी जाडी-भरडी असता आरोग्याच्या मोठ्या तक्रारी असतात. सिंग यांच्या हातावरील बुध रेषा व आरोग्य रेषा मणिबंधापासून सुमारे अडीच इंच तळ हाताच्या खाली चंद्र ग्रहावर गडद पसरट ठिपक्याने युक्त व त्यावरील रेषा या एकमेकाला छेद देऊन पसरट होऊन बिघडलेल्या आहेत. त्यामुळे सिंग यांची प्रकृती वय वर्ष 65 पासूनच कमजोर होत आहे. या आरोग्य रेषेतच शुक्र ग्रहाच्या तळातून उगम पावलेली बुध रेषा थेट बुध ग्रहावर जाऊन पोहोचली आहे. वय वर्ष 65 मध्ये सिंग यांच्या आयुष्य रेषेतून चंद्र ग्रहावर एक फाटा गेला आहे. या चंद्र ग्रहाच्या फाट्याने सिंग यांची प्रतिकारशक्ती तीस टक्के कमी केली आहे. त्याच दरम्यान आरोग्य रेषेंचा पुंजका त्यांच्या चंद्र ग्रहावर आहे.

मंगळ रेषा- त्यांच्या हातावरील मंगळ रेषा आयुष्य रेषेच्या आत वय वर्ष 30 ते 60 वर्षापर्यंत साथ देत आहे. या मंगळ रेषेने त्यांना त्यांच्या आयुष्यात अधिकची ऊर्जा प्रदान केली. उमेदीच्या दिवसात त्यांना अधिकचे काम व कष्ट घेण्याची ताकद या मंगळ रेषेने दिली दिली.

दोन मस्तक रेषा – शुक्र बुध रेषेबरोबर सिंग यांचे हातावर दोन मस्तक रेषा आहेत. आयुष्य रेषेत उगमापासून विलीन झालेली पहिली मस्तक रेषा सिंग यांच्या वय वर्ष 32 पर्यंत आहे. दुसरी मस्तक रेषा दुसर्‍या बोटाखाली म्हणजे मंगळ मैदानावर शनी ग्रहाच्या खाली उगम पावत असून ही मस्तक रेषा वरच्या मंगळ ग्रहाकडे जाताना थोडी चंद्र ग्रहाकडे उतरली आहे. हातावर दोन मस्तक रेषा असता मेंदू तल्लख असतो. मस्तक रेषा मेंदूचे कार्य दाखविते. दोन मस्तक रेषा असता असे लोक विद्वान असतात. सिंग यांची दुसरी मस्तक रेषा शनीग्रहाच्या सानिध्यातून उगम पावत असल्याने त्यांच्या अंगी शनी ग्रहाची चिकाटी, चिंतन, संशोधनाची वृत्ती व किचकट विषयात यश संपादन करण्याची कुशाग्र बुद्धिमत्ता प्रदान आहे.

भाग्य रेषेचा उगम- भाग्य रेषेचा उगम मणिबंधापासून होत बालपणापासून त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती उत्तम असल्याचे दाखवीत आहे. सिंग यांनी 66 साली ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठातून पदवी शिक्षण घेतले त्यावरूनच सिंग यांच्या कटुंबीयांची आर्थिक परिस्थिती लक्षात यावी. भाग्य रेषा थेट शनी ग्रहावर अखंड जाऊन थांबली आहे. याचाच अर्थ सिंग यांचे आयुष्यात आर्थिक सुब्बता होती व आहे. वयाच्या 50 वय वर्षात सिंग यांच्या हातावर दुसरी भाग्य रेषा हृदय रेषेच्या अलीकडे उगम पाऊन शनी ग्रहावर मधोमध गेली आहे. या भाग्य रेषेने सिंग यांच्या आर्थिक परिस्थितीत आमूलाग्र बदल घडवून आणला आहे.

हृदय रेषा- त्यांच्या हातावरील हृदय रेषा वय वर्ष 65 दरम्यान बिघडली आहे. त्यामुळे कार्यक्षमतेता खालावली. हृदय रेषेचा एक फाटा शनी-रवि ग्रहाच्या सीमेवरून मस्तक रेषेत जाऊन मिळाला आहे. या हृदय रेषेच्या फाट्याने सिंग यांच्यात आपल्या जवळचे कुटुंबीय व अवती भवतीच्या अथवा सानिध्यात असलेल्या व्यक्तीशी संवेदनशील भावनिक नाते निर्माण झाले आहे. हा हृदय रेषेचा फाटा त्यांच्या एकत्रित उगम पावलेल्या मस्तक व आयुष्य रेषेत जाऊन थांबल्याने त्यांचे मनात उपकाराची भावना कायम होती व आहे.

गुरु ग्रहाच्या पेर्‍यात- त्यांची हृदय रेषा पहिल्या बोटाच्या खाली गुरु ग्रहाच्या पेर्‍यात गेल्यामुळे ते अतिनिष्ठावान झाले. पहिल्या बोटाच्या पेर्‍यापर्यंत जर हृदय रेषा जाऊन थांबली तर असे लोक आपल्या श्रेष्ठींबरोबर अत्यंत निष्ठेने राहतात. हृदय रेषा पहिल्या बोटाच्या पेर्‍यात गेलेली असता व्यक्ती निस्सीम प्रेमी असतात व आंधळे प्रेम करतात. त्याला सामोरच्या व्यक्तीत कुठलेही दुर्गुण दिसत नाहीत. त्यांच्या मनात कोणाबद्दल ही कधीही द्वेष भावना नव्हती व नाही. ते ज्या लोकांना मानतात, आदर करतात त्यांच्याबाबत कधीही प्रतारणा केली नाही.

एकनिष्ठता – गुरु ग्रहाखालील मस्तक रेषा व व आयुष्य रेषा अंगठ्याचे आत एकत्र उगमापासून आहेत. या एकत्र मस्तक रेषा व आयुष्य रेषेवर हृदय रेषेचा फाटा येऊन थांबला आहे. मस्तक रेषा,आयुष्य रेषा व हृदय रेषेचा फाटा गुरु ग्रहाखाली एकत्र आल्याने सिंग यांची भाषा शैली मृदू, अभ्यासपूर्ण व संस्कारित आहे. गुरु ग्रहाखाली या तीन रेषा एकत्र आल्याने तेे वाडवडिलांचे संस्कार घेऊन आले आहेत व या संस्कारांचा त्यांच्यावर पगडा कायम आहे. भावनांचा आदर करणे, आचरण एकनिष्ठ ठेवणे या सर्व बाबी गुरु ग्रहाकडून सिंग यांना लाभल्या. मस्तक रेषा व आयुष्य गुरु ग्रहाखाली एकत्र असल्याने व त्यावर येऊन थांबलेला हृदय रेषेमुळे ते आपल्या अवती भवतीच्या व्यक्तींबद्दल आदर भावना ठेवणारे व आज्ञाधारक बनले.

8888747274

ज्योतिषभास्कर, सामुद्रिक मार्तंड

- Advertisment -

ताज्या बातम्या