परमात्मा कुठे आहे?

jalgaon-digital
2 Min Read

लोकांद्वारे विचारल्या जाणार्‍या अनेक प्रश्नांपैकी एक प्रश्न असा आहे की, परमात्मा कोठे आहे? आपण आपल्या आत्म्याविषयी सुद्धा जाणू इच्छितो. विज्ञानाने आज खूप प्रगती केली आहे, जिथे आपल्याकडे बाह्य अंतरिक्षाविषयी माहिती उपलब्ध करण्यासाठी शक्तिशाली दुर्बीण आणि अवकाश याने आहेत. तसेच प्रत्येक परमाणुतील छोट्या कणाला पाहण्यासाठी सूक्ष्मदर्शक यंत्रे आहेत, तरीही विज्ञान याबाबत खुलासा करू शकत नाही की, ईश्वर या भौतिक ब्रम्हांडामध्ये कोठे आहे? सत्य स्थिती अशी आहे की सृष्टिकर्ता आजपर्यंत बाह्य भौतिक मंडलांमध्ये भेटला नाही. संत महापुरुष शतकानुशतके सांगत आहेत की परमात्मा आपल्या अंतरी आहे. त्यांनी ध्यान-अभ्यासाद्वारे परमात्म्याला अंतरीच प्राप्त केले.

ध्यान-अभ्यास काय आहे? काही लोक केवळ शरीर आणि मस्तिष्क यांना आराम देण्याचे एक माध्यम मानतात. संत आणि महापुरुषांकरिता मात्र ध्यान अभ्यास परमात्म्याला अंतरी शोधण्याचा मार्ग आहे. ध्यान-अभ्यासाच्या माध्यमातून आपण या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकतो की मृत्यूनंतर आपले काय होते? आणि या भौतिक जीवनानंतर ही जीवन आहे का?

सर्व संतांनी मानवी शरीराला हरीमंदिर म्हटले आहे, ज्यामध्ये सृष्टिकर्ता राहतात. कारण आत्मा परमात्म्याचा अंश आहे, म्हणून प्रत्येक प्राणिमात्रांमध्ये परमात्मा अस्तित्वात आहे. ध्यान-अभ्यास केल्याने आपण अंतरीच परमात्म्याला शोधू शकतो.

ध्यान-अभ्यास करण्याकरिता काय निर्देश आहे? ध्यान-अभ्यास सहज, सोपी पद्धत आहे. आपण केवळ बसण्याकरिता एक शांत आणि आरामदायी जागा शोधूया, जिथे आपले मन आणि शरीर स्थिर होईल. आपण आपले डोळे बंद करून अंतरी पहावे काय दिसते? ध्यान-अभ्यासादरम्यान मन आपणास विचारांद्वारे विचलीत करते, याचकरिता अध्यात्मिक विज्ञानामध्ये आपण परमात्म्याच्या कोणत्याही नामाचा मानसिक रूपाने जप करतो. कारण मनातील विचारांपासुन आपले ध्यान भटकता कामा नये. असे केल्याने आपण आराम व शांती अनुभवतो आणि आपल्या आीत्म्यास अध्यात्मिक अनुभूती होईल जी आपणास ईश्वराच्या शोधार्थ घेऊन जाईल.

दररोज मानवी शरीराचा एका प्रयोगशाळेच्या रूपात उपयोग करून ध्यान-अभ्यासाची अध्यात्मिक साधना केल्याने आपणास कळेल की, ईश्वर कुठे आहे? जेव्हा वैज्ञानिक ईश्वराला बाह्य अंतरिक्ष किंवा परमाणुतील सूक्ष्म कणांमध्ये शोधत असतात तेंव्हा आपण ध्यान-अभ्यासास बसून सृष्टीतील सर्वात मोठ्या रहस्याला स्वतः उलगडू शकु.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *