साप्ताहिक राशीभविष्य

9 ते 15 फेब्रुवारी 2023
साप्ताहिक राशीभविष्य
साप्ताहिक राशीभविष्य weekly horoscope Bhavishyavedh

मेष- काळजी मिटेल

सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल व मनावर असलेले काळजीचे सावट मिटेल. महत्त्वपूर्ण कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल व सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. अंतिम चरणात आर्थिक चढ-उतार स्थिती राहील. आर्थिक क्षेत्रातील बहुतेक अंदाज चुकतील. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी भावी काळात होणार्‍या परिणामाचा अंदाज घेणे उचित. जुने आजार बळावण्याची शक्यता. नातेसंबंधांमधील कौटुंबिक आणि वैयक्तिक बाबींवर विशेषत: लक्ष केंद्रित कराल.

शुभ तारखा : 12, 13

वृषभ - सावधगिरी बाळगा

आवक मंदावेल व आर्थिक अस्थिरता निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करणे चांगले ठरेल व होणारे नुकसान टळू शकेल. शांतता प्रस्थापित राहील. अंतिम चरणात पराक्रम अगर क्रीडा क्षेत्रातील नवनवीन डावपेचाचे केलेले प्रयोग यशस्वी ठरतील. बक्षीसपात्र स्थिती कायम राहून इतरांचे सहकार्य वेळेवर मिळेल व यश समोर दिसेल. सावधगिरी बाळगा. प्रवासा दरम्यान काळजी घ्यावी. संगती संग दोष: या वचनाची प्रत्यक्ष अनुभूती येईल. दगदग व त्रास निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे चांगले दूरध्वनी येऊन उत्साह वाढेल. वाहनाच्या खरेदीचा योग आहे. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे सहकार्य मिळेल. काही कौटुंबिक कलहामुळे मानसिक त्रास होईल. रिअल इस्टेटशी संबंधित बाबी देखील निकाली निघतील.

शुभ तारखा : 13, 15

मिथुन- वाहनाची खरेदीचा योग

कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. भावी काळात होणारा मनस्ताप टळेल. सर्वत्र परिस्थिती थोडी समाधानकारक स्थितीत राहून यश मिळण्यात प्रारंभ होऊ शकेल. जमीन मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा निर्धार पूर्ण. आरोग्याची काळजी घ्या. उच्च अधिकार्‍यांशी संबंध बिघडू देऊ नका. आठवड्याच्या शेवटी नोकरी मिळेल. नवीन कराराची प्राप्ती होईल. वाहनाची खरेदीचा योग आहे. वारंवार बदलणार्‍या विचारसरणीचा कोणी गैरफायदा घेणार नाही याची काळजी घ्या.

शुभ तारखा : 12, 13,14

कर्क- अडकलेला पैसा परत मिळू शकेल

सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक स्थिती मजबूत राहील इतरांकडून येणे असलेला पैसा वेळेवर हाती येईल. अचानक धनलाभ योग संभवतो त्यामुळे लॉटरीवगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. अंतिम चरणात परिस्थिती प्रतिकूल आहे. त्यामुळे दगदग व त्रास वाढेल. सावधगिरी बाळगा. भांडणे वाद टाळा. नातेवाईक किंवा मित्राकडून अप्रिय बातम्या प्राप्त करण्याचा योग. जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयम ठेवणेच उचित ठरू शकेल.

शुभ तारखा : 10, 11, 12

सिंह- अपेक्षेप्रमाणे यश प्राप्त होईल

सप्ताहाच्या प्रथम चरणात उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील घडामोडी अनुकूल लाभाच्या ठरतील व व्यवसाय क्षेत्र सुरळीतपणाच्या मार्गावर राहील. जवळचा प्रवास योग जुळून प्रवास कार्यसाधकच ठरेल. काळजीचे सावट काही प्रमाणात दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. अंतिम चरणात सर्व क्षेत्रात यश मिळेल व अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही. अपेक्षेप्रमाणे यश मिळवून देणारी ग्रहस्थिती अनुकूल आहे. आठवड्याच्या मध्यात ग्रहांच्या संक्रमणाची सुसंगतता व्यवसायात वाढ देईल. विद्यार्थ्यांसाठी वेळ अनुकूल असेल.

शुभ तारखा : 9, 10, 11

कन्या - नोकरीत बढतीजनक बदल

सप्ताहाच्या प्रथम चरणात धार्मिक यात्रायोग घडेल व सर्व क्षेत्रात नशिबाची साथ पाठीमागे राहील. नियोजित कामे ठरविलेल्या वेळेवर पूर्ण होऊन उत्साह वाढीस लागेल व यशाचा मार्ग खुलाच राहील. अंतिम चरणात नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत मिळतील. नवीन नोकरीसाठी होणारी मुलाखत भावी काळाच्यादृष्टीने आशा पल्लवीत करणारी ठरेल व सर्व समस्यांपासून मुक्तता होण्याची दाट शक्यता आहे. काळजीचे सावट दूर होऊन मानसिक आनंद वाढेल. परदेशी कंपन्यांमध्ये सेवेसाठी अर्ज करणे किंवा परदेशी नागरिकत्वासाठी अर्ज करणे यशस्वी होईल.

शुभ तारखा : 14, 15

तूळ- शांतता व संयमाचे धोरण स्वीकारा

सप्ताहाच्या प्रथम चरणात वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचेच ठरेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच उचित ठरेल. अंतिम चरणात महत्त्वपूर्ण कामासाठी तातडीचा प्रवास योग जुळून येईल व प्रवास कार्यसाधक ठरेल. मानसिक आनंद वाढविणारे समाचार हाती येऊन मनावरील काळजीचे सावट मिटेल. परदेशीस्थित नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळेल. नवीन जोडप्यांना अपत्यप्राप्तीचे योग आहेत.

शुभ तारखा : 13, 14

वृश्चिक- मोठदगदग निर्माण करणारी स्थिती

सप्ताहाच्या प्रथम चरणात भागीदारीमधून विशेष करून लाभ घडेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार जरूर करावा भावी काळासाठी लाभप्रद ठरेल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे सहकार्य मिळेल. अंतिम चरणात विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागेल व यश मिळविण्यासाठी केलेले अथक परिश्रम वाया जातील. दगदग व त्रास निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे.

शुभ तारखा : 11, 12

धनू- मानसिक आनंद वाढेल

या सप्ताहात आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील. जुन्या आरोग्याच्या व्याधी दूर होण्याच्या मार्गी राहतील. इतरांचे सहकार्य वेळेवर मिळेल व कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही. भागीदारीत असणारा वाद मिटण्याच्या मार्गावर राहील व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त राहील. आपले सहकार्य इतरांच्या बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिद्ध होऊन मानसिक आनंद वाढीस लागू शकेल. जुने मित्रमैत्रिणी भेटण्याचे योग.

शुभ तारखा : 12, 15

मकर- विरोधकांचा त्रास कमी होईल

स्पर्धा परीक्षेसह सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येतील. आठवड्याच्या मध्यात ग्रहांच्या संक्रमणाची सुसंगतता व्यवसायात वाढ देईल. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे चांगले दूरध्वनी येऊन उत्साह वाढेल. विरोधक मंडळींचा ससेमिरा व त्रास कमी होऊन विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करतील.

शुभ तारखा : 11, 12, 13

कुंभ-विनाविलंब काम मार्गी लागेल

सप्ताहाच्या प्रथम चरणात पारिवारिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील व पारिवारिक सदस्य मंडळींबरोबर असणारे मतभेद मिटतील. परिस्थिती पूर्वपदावर येऊन उत्साह वाढीस लागेल. परिवारात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन कराल. अपूर्ण व स्थगित व्यवहार सुरळीत होतील. कार्यालयात परिस्थिती चांगली राहील व कार्यक्षेत्रात आपला शब्द अंतिम प्रमाण स्वरूप मानला जाईल. कोणतेही काम विनाविलंब पूर्ण होण्याच्या मार्गी राहील.

शुभ तारखा : 11, 12, 13

मीन- नेत्रदीपक यश मिळेल

क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात वर्चस्व वाढेल व सहकारीवर्ग मनोनुकूलरित्या सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवूनच वाटचाल करतील. नेत्रदीपक यश मिळेल. पारिवारिक आनंद वाढविणारे समाचार हाती येईल. नियोजित कामे ठरविलेल्या वेळेवर पूर्ण होऊन उत्साह वाढीस लागेल मानसिक आनंद वाढून मनावर असलेले काळजीचे सावट व दडपण दूर होऊन शांतता प्रस्थापित राहील.

शुभ तारखा : 9, 10, 11

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com