साप्ताहिक राशीभविष्य Weekly Horoscope

17 ते 23 जून 2021
साप्ताहिक राशीभविष्य Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्यweekly Horoscope

मेष - आर्थिक व्यवहार सांभाळून करा

शेतकर्‍यांसाठी अत्यंत आनंददायी काळ आहे. शेतीची मशागत, बीजपेरणी यासारखी कामे करण्याचा उत्साह वाढेल. परिचित मंडळींकडून सहकार्य मिळेल. आर्थिक व्यवहार मात्र सांभाळून करावेत. पारिवारिक संबंधात हलकीशी कटुता निर्माण होऊ शकते. सामंजस्याने अडचणींवर मात करू शकाल. समाजामध्ये मानसन्मानाची वागणूक मिळेल. नोकरदारांना अपेक्षित यश मिळू शकेल. न्यायालयीन कामकाजात यशाकडे वाटचाल सुरु कराल. आठवड्याच्या उत्तरार्धात मानसिक चलबिचल वाढू शकते शुभ तारखा : 18, 19, 20

वृषभ - शैक्षणिक क्षेत्रात सक्षम वाटचाल

आर्थिक स्थितीत सुधारणा होत असली तरी व्यावहारिक अनुभवाने मानसिक संतुलन ढासळू शकते. शैक्षणिक क्षेत्रात सक्षमपणे वाटचाल कराल. प्रत्येक व्यवहारात आत्म्याचा आवाज ऐकून निर्णय घ्या. कर्जाची परतफेड करताना तारेवरची कसरत करावी लागेल. प्राकृतिक कारणाने मन विचलित होऊ शकेल. कौटुंबिक जीवनात नाती जपण्यासाठी पूरक वातावरण तयार होईल. व्यावसायिक क्षेत्रात तोटा सहन करावा लागेल. शेतीविषयक क्षेत्रात तज्ज्ञ लोकांचा सल्ला उपयोगी पडेल. संगीत, काव्य, नर्तन यांसारख्या कलाप्रेमींना साधनेसाठी उत्तम काळ आहे. गृहस्वप्न साकार होण्याचे योग आहेत. कोणतेही काम करताना तज्ज्ञांचा अथवा थोरांचा सल्ला घेऊनच करा. अन्नदान केल्याने आत्मिक समाधान लाभेल. शेतकर्‍यांनी संयम राखणे जरुरी आहे. शुभ तारखा : 19 ते 23

मिथुन - आर्थिक गुंतवणुकीबाबत संयम ठेवा

राजकीय सामाजिक आणि व्यावसायिक तिन्ही स्तरांवर विविध निर्णय प्रक्रियेत सहभागी व्हाल. व्यवसायाला नवीन दिशा प्राप्त होतील. नावीन्यपूर्ण विचारांना स्वीकारण्यात फायदा आहे. शेतकर्‍यांनी पारंपरिक व्यवसायाला विज्ञानाची जोड दिल्यास फायद्यात वाढ होईल. आर्थिक गुंतवणुकीबाबत संयम आवश्यक वाटतो. कला क्षेत्रात नावलौकिक प्राप्त होऊ शकेल. देवाणघेवाण व्यवहारात फसगत होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा उत्तरार्ध मनातील दिशांना मूर्तरूप देणारा काळ आहे. विद्यार्थी जनांना मार्गदर्शक तत्वांचा लाभ होईल. शुभ तारखा : 21 ते 23

कर्क - मोठ्यांचा सन्मान करणे हितकारक

या आठवड्यात दुसर्‍याची मध्यस्थी करणे टाळा. व्यावसायिक स्थिती जैसे थे राहील. आरोप प्रत्यारोपाने काळाचा आणि पैशाचा अपव्यय होऊ शकतो. मोठ्यांचा सन्मान करणं हितकारक ठरेल. राजकीय क्षेत्रात यशासाठी झगडावे लागेल. नोकरदारांना आपली नोकरी टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा प्रत्यक्ष उपयोग होईल. कोणतीही खरेदी करणे शहाणपणचे लक्षण ठरणार नाही. शुभ तारखा : 22, 23

सिंह - मंगलकार्य ठरण्याची शक्यता

मनात अकारण भय निर्माण होऊ शकते. मात्र ही स्थिती जास्त काळाची नाही. चांगल्या लोकांचे मार्गदर्शन लाभेल. नवीन कामकाज हातात घेताना सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. शेतीसाठी उत्तम काळ आहे. गुंतवलेली रक्कम परत मिळविताना अडचणींचा सामना करावा लागेल. आरोग्य विषयक प्रश्न भेडसावतील. मंगल कार्यात सहभागी व्हावे लागेल. आपण जर कपड्याचा किंवा स्त्री सौन्दर्य प्रसाधनांचा व्यापार करीत असाल तर त्यात फायदा वाढेल. घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. अन्नदान केल्याने आत्मिक समाधान लाभेल. शेतकर्‍यांनी संयम राखणे जरुरी आहे. शुभ तारखा :18 ते 22.

कन्या - जुने येणे वसूल होईल

या आठवड्यात प्रत्येक पाऊल सांभाळून टाका. राजकरणात कार्यरत असाल तर आत्मपरीक्षणाची वेळ येऊ शकते. मानापमान नाट्य रंगवले जाऊ शकते. राजकीय विरोधक आक्रमक होण्याची दाट शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी करण्यासाठी कठीण परिश्रमाची आवश्यकता आहे. मित्र परिवाराकडून सहकार्य मिळाल्याने मोठ्या संकटावर मात करण्यात यशस्वी व्हाल. जुने येणे वसूल होऊ शकेल. व्यवसायात फायदा वाढू शकेल. कोणाशीही वैरभाव ठेवू नका. विद्यार्थी जनांना मार्गदर्शक तत्वांचा लाभ होईल. शुभ तारखा : 19,20,23

तूळ - वाहन चालवताना काळजी घ्या

आनंददायी घटनांनी सुखाचा अनुभव कराल. मंगल कार्ये ठरतील. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. मोठे निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. तणावाची तीव्रता कमी होईल. मात्र आर्थिक व्यवहार हाताळताना विश्वासार्हता तपासून पाहणे गरजेचे आहे. नेत्रविकार वाढणार नाहीत याबाबत काळजी घ्या. वैवाहिक जीवनात घडणार्‍या घडामोडी मनाला आनंद देतील. वाहन चालवताना काळजी घ्यावी. आरोग्यविषयक तक्रारीत वाढ होण्याची शक्यता आहे. शुभ तारखा : 18,21

वृश्चिक - कामकाजाला गती मिळेल

वयोवृद्ध मंडळींनी आरोग्यविषयक काळजी घ्यावी. बर्‍याच काळापासून करीत असलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. भाग्योदय होण्यास अनुकूल ग्रहस्थिती आहे. परदेशांतील कामाविषयी दिलासादायक बातमी ऐकायला मिळेल. कामकाजाला गती मिळेल. सांसारिक सुखाची प्राप्ती होईल. वाहन खरेदी सारख्या विषयात सकारात्मक चर्चा होईल. गृह सजावटीच्या वस्तू खरेदी कराल. मानसिक संतुलन ढासळणार नाही याबाबत दक्ष रहा. शुभ तारखा : 19, 20, 23

धनू - मित्र परिवाराकडून सहकार्य मिळेल

भविष्यातील घटनांचा ठोस अंदाज मांडता येईल. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ आहे. आपण करत असलेल्या कामाबाबत अविश्वास निर्माण होऊ शकेलं. कर्जाची तरतूद होऊ शकेल. विकारांवर प्रतिकार करण्याची क्षमता वाढेल. महत्त्वाचे निर्णयाबाबत गुप्तता राखणे हिताचे ठरेल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. स्त्रियांबद्दल आदरभाव निर्माण होईल. मित्र परिवाराकडून सहकार्य मिळेल. शुभ तारखा : 18, 21, 22.

मकर - वेळीच औषधोपचार करा

शेतीविषयक ध्येयधोरणे यशस्वी ठरतील. आर्थिक व्यवहार करताना सांभाळून करावेत. धार्मिक कार्यासाठी पैसे खर्च करावे लागतील. जवळचे प्रवास घडून येतील. संततीकडून अपेक्षा पूर्ण झाल्याने घरात आनंदाचे वातावरण बनेल. शत्रुपक्षावर सहज विजय मिळवाल. आजोळच्या नातेवाईकांच्या भेटीगाठी होतील. रक्तदाब किंवा तत्सम विकार असतील तर वेळीच औषधोपचार करण्याची आवश्यकता आहे. शुभ तारखा : 19, 20, 23

कुंभ - देवाणघेवाण व्यवहारात सावध रहा

मनासारख्या घटना घडतील. आपण करीत असलेल्या कामाचे सामाजिक स्तरावर कौतुक होईल. आदर्श व्यक्तिमत्त्व तयार होत असतानाच जबाबदार्‍याही वाढत आहेत. याबाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. प्रकृती नाजूक बनेल. साथीच्या विकारापासून स्वतःचा बचाव व्हावा यासाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. गृहसौख्य उत्तम आहे. घर खरेदीसारखे व्यवहार उत्तम रीतीने पार पडले जातील. कोणाशीही वैरभाव वाढू देऊ नका. आर्थिक बाबतीत अपेक्षित तरतूद होईल. शुभ तारखा :21,22

मीन - न्यायालयीन कामकाजात आळस नको

जास्त अपेक्षा ठेवून परावलंबी बनू नका. स्वकर्तृत्वावर पुढे जाणण्यासाठी प्रयत्न करा नक्कीच यश मिळेल. पारिवारिक स्नेह वाढेल. न्यायालयीन कामकाजात आळस करू नका. परदेशवारीसाठी प्रयत्न करीत असाल तर कामाला सकारात्मक प्रतिसाद मिळेल. तुमच्या हिताची जपणूक करणारे मार्गदर्शक लोक भेटतील. जुने येणे वसूल करण्यासाठी प्रयत्न केल्यास उत्तमप्रकारे वसुली होऊ शकेल. आर्थिक गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करा. शुभ तारखा : 18, 19, 20,

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com