साप्ताहिक राशीभविष्य

8 ते 14 डिसेंबर 2022
साप्ताहिक राशीभविष्य
साप्ताहिक राशीभविष्यWeekly Horoscope

मेष- अचानक धनप्राप्ती होईल

थोरा-मोठ़्यांच्या सहकार्याने आपली रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. कर्जप्रकरणे मंजूर होतील. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. अचानक धनप्राप्ती होईल. वारसाहक्काने धनप्राप्ती होण्याचे योग आहे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. कुणीतरी तुम्हाला आव्हान देण्याचा प्रयत्न करेल. पण त्याकडे दुर्लक्ष करा. सामाजिक प्रतिष्ठा उंचावेल. स्वादिष्ट भोजन करण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये काही अभूतपूर्ण आव्हाने आणि बाधांचा उत्तमरित्या सामना करणे आणि उन्नती प्राप्त करण्यात यश मिळू शकेल.

शुभ तारखा : 9, 10, 11

वृषभ - आर्थिक तजवीज करणे शक्य

नव्या योजनांची अंमलबजावणी यशस्वी होईल. व्यवसायात चाललेल्या प्रयत्नांना यश येईल. हितशत्रूंच्या कारवायांवर मोठ़्या युक्तीवादाने तोंड द्याल. व्यवसाय उद्योगात आपणास विरोध करणार्‍या व्यक्तींकडून लाभ होतील. मेहनतीचे चीज झाल्याने समाधान लाभेल. भविष्यकाळाच्यादृष्टीने आर्थिक तजवीज करणे शक्य होईल. मोठी आर्थिक उलाढाल केली जाईल. भागीदारी व्यवसायातून नवीन उपक्रम राबविणे शक्य होईल. जे विद्यार्थी उच्च शिक्षण घेण्याची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा सप्ताह उत्तम राहील. व्यवसायानिमित्त प्रवास घडेल आणि प्रवासातून फायदा मिळेल. वाहन चालवताना बेपर्वाई करू नका.आईच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जुनी घरगुती कामे पुढे ढकलण्याऐवजी ते काम पूर्ण करण्यासाठी स्वत: प्रयत्न करण्याची आवश्यकता असेल.

शुभ तारखा : 8, 10

मिथुन- कलागुणांना चांगला वाव

स्वभावात सकारात्मक बदल दिसतील. कर्तव्य भावना ठेवून वागावे. पत्नीचा सल्ला उपयोगी पडेल. जोडीदारांच्या मताचा आपल्यावर पगडा राहील. आपल्या व्यक्तिमत्त्वाची सभोवतालच्या व्यक्तींवर चांगली छाप पडेल. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.वेगवान प्रगती होण्यासाठी आपली जिद्द, महत्वाकांक्षा वाढवावी लागेल. मिळालेल्या संधीचा लाभ आपले भविष्य उज्जवल करणारा राहील. अनेकांचे सहकार्य लाभेल. पूर्वीच्या गुंतवणुकीद्वारे धनलाभ होईल. नवीन वाहन खरेदीने स्वप्न पूर्ण होईल.

शुभ तारखा : 11, 12, 13

कर्क- लाभाचे प्रमाण समाधानकारक

संततीच्या प्रगतीमुळे आपली पत वाढणार आहे. विद्यार्थ्यांंना शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. सप्ताहाच्या उत्तरार्धात वाहन चालविताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवावे. कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नका. अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. भावंडातील रुसवे फुगवे दूर होऊन सलोख्याचे संबंध होतील. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. संबंध बिघडतील. अव्यवहारिक कामांपासून लांब रहा. आपल्या कामाच्या गोष्टी गुप्त ठेवा. मानसिक संतोष वाढेल. कामात अडचणी येतील. नवीन वाहन खरेदीने स्वप्न पूर्ण होईल.

शुभ तारखा : 9, 10, 11

सिंह- भाग्यकारक घटना घडेल

समोर आलेल्या संधीचा फायदा घ्या.सुखस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण यामुळे घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. कुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल. एखादी भाग्यकारक घटना घडेल. अनुकूल व्यक्तींशी संपर्क साधण्यात यश येईल. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना मनाजोगे काम मिळेल. मित्रपरिवाराबरोबर सुग्रास भोजनाचे योग येतील. आपली सामाजिक प्रतिष्ठा उंचावणार्‍या घटना घडतील. कामात मन रमणार नाही. तब्बेतीची काळजी घ्या. व्यावसायिक प्रकरणात अडचणी येतील. आर्थिक जबाबदार्‍या वाढतील. आत्मविश्वास वाढेल. कामात अडचणी येतील. आपली चूक स्वीकारावी लागेेल.

शुभ तारखा : 13, 14

कन्या -प्रवासातून कार्यसिद्धी

उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणार्‍या विद्यार्थ्यांना योग्य ठिकाणी प्रवेश मिळेल. संततीच्या उत्कर्षाची वार्ता कानी येईल. आठवड्याच्या सुरुवातीला आपल्या राशीच्या पराक्रमस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. परदेशातील भावंडांशी सल्लामसलत करून महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. प्रवासातून कार्यसिद्धी होईल. नवीन नोकरीच्या शोधात असणार्‍या तरुणांना मनाजोगे काम मिळेल. भावंडांशी असलेले नाते सुधारण्यासाठी प्रयत्न करा. नातेवाईक व कुटुंबियांशी जिव्हाळ्याचे संबंध राहतील. आईच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच, स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.

शुभ तारखा : 10, 11, 12

तूळ- आर्थिक आवक वाढेल

आजूबाजूच्या लोकांवर तुमच्या व्यक्तीमत्त्वाचा प्रभाव पडेल. अवघड कामे सहजतेने मार्गी लागतील. आपल्या राशीच्या धनस्थानातून चंद्राचे होणारे भ्रमण आपली आवक वाढविणारे आहे. अचानक सामाजिक क्षेत्रातून सहलीचे बेत आखले जातील. प्रिय व्यक्तींच्या भेटी होतील. परप्रांताशी व्यावसायिक संबंध प्रस्थापित करता येतील. शेजार्‍यांचे सहकार्य लाभेल. मिळकतीपेक्षा जास्त खर्च होईल. अनिश्चितता वाटेल. शत्रुपक्षाच्या कारवाया वाढतील. पारिवारिक वैचारिक मतभेद वाढतील. भरपूर धन कमावण्यासाठी गैरमार्गाचा वापर टाळा.

शुभ तारखा : 12, 13

वृश्चिक - वारसाहक्काने धनप्राप्ती

आपल्या आवडत्या छंदास व्यावसायिक स्वरुप देण्यास योग्य काळ आहे. आपल्याला मताचा समाजात आदर होईल. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे. आपल्या समस्येचे निराकरण करण्यासाठी विशेष प्रयत्न करतील, कामात थोडा बदल केल्याने बरे वाटेल. घरातील सुख सुविधा वाढविण्याकरीता नवीन वस्तूंची खरेदी होईल. वारसाहक्काने धनप्राप्ती होण्याचे योग आहेत.

शुभ तारखा : 8, 10, 12

धनू- शेजार्‍यांचे सरकार्य लाभेल

कोणाकडूनही आपले काम होईल अशी अपेक्षा बाळगू नका. स्वत:चे काम स्वत:च करावे. अनुकूल घडामोडी घडतील. स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी सतत कार्यरत, प्रयत्नशील राहाल. शेजार्‍यांचे सहकार्य लाभेल. सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. समाधान लाभेल. आपल्या कर्तृत्वाला झळाळी येणार्‍या घटना घडतील. स्थितप्रज्ञ राहून महत्त्वाचे निर्णय घ्या.

शुभ तारखा : 12, 14

मकर- खर्चाला नवनवीन वाटा फुटतील

अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी कराल. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलावा लागेल. दुसर्‍यांकडून काम करून घेण्यात यशस्वी व्हाल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्यादृष्टीने लाख मोलाचा ठरेल. आठवड्याच्या सुरुवातीला लाभस्थानातून चंद्राचे भ्रमण होत आहे. खर्चाला नवनवीन वाटा फुटतील. चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे. सहलीचे बेत आखले जातील.

शुभ तारखा : 13, 14

कुंभ - कामात गुप्तता राखा

प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. तुमचा सरळ स्वभाव आणि मजबूत व्यक्तिमत्व या जोरावर तुम्ही कठीण प्रसंगातून सहज बाहेर पडाल. व्यवसाय उद्योगाच्या निमित्ताने देशातील तसेच परदेशातील संस्थांशी संपर्क साधण्यात यशस्वी व्हाल. दुसर्‍यांकडून काम करून घेण्यात यशस्वी व्हाल. कामात गुप्तता राखा. सहयोग मिळेल. आपण हाती घेतलेले प्रत्येक काम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी सहाय्यकांची मदत मोलाची ठरणार आहे.

शुभ तारखा : 11, 12, 13

मीन- न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ

परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. न्याय प्रविष्ठ प्रकरणातून लाभ होतील. एखाद्या संघटनेच्या नेतृत्वाची जबाबदारी स्विकाराल. आपल्या कार्यक्षेत्रातून प्रशिक्षणासाठी आपली निवड केली जाईल. वरीष्ठांकडून आपल्या कामाची प्रशंसा होईल. आठवड्याच्या सुरुवातीला भाग्यस्थानातून चंद्रभ्रमण होत आहे. तीर्थस्थळांना भेटी देण्याचे योग येतील. सत्कार्यासाठी प्रवास घडून येतील.

शुभ तारखा : 10, 12

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com