Thursday, April 25, 2024
Homeभविष्यवेधसाप्ताहिक राशीभविष्य Weekly Horoscope

साप्ताहिक राशीभविष्य Weekly Horoscope

मेष – अन्नधान्याची भरभराट होईल

या आठवड्यात वडीलधार्‍या मंडळींनी केलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. आर्थिक परिस्थितीत जास्त बदल घडण्याची शक्यता धूसर आहे. शेतकर्‍यांना दिलासादायक काळ आहे. अन्नधान्याची भरभराट होईल. मानसिक संतुलन बिघडू शकते. कर्ज वाढणार नाही याबाबत काळजी घ्यावी. गुप्तशत्रूंच्या कारवायांना बळी पडले जाऊ शकतात. प्रकृतीची काळजी घेणे गरजेचे आहे. मित्रपरिवाराच्या सहकार्याने प्रासंगिक घटनांचा सामना करण्यात यश प्राप्त होईल. शुभ तारखा : 11, 12, 13

- Advertisement -

वृषभ – स्थावर इस्टेटीचा व्यवहार सुलभ

हाती घेतलेल्या कामांना उत्तम दिशेने गती प्राप्त होईल. नवीन कामकाज सुरु करण्यासाठी अत्यंत शुभ काळ आहे. कौटुंबिक जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित स्थावर इस्टेटीचा व्यवहार सुलभ होईल. परंपरेचा सन्मान राखल्याने समाजात प्रतिष्ठा तयार होईल. अभ्यासाला अनुकूल काळ आहे. कोणाच्याही व्यवहारात सहभागी होताना आर्थिक बाजू अंगलट येण्याची शक्यता आहे. परिश्रम वाढविण्याची आवश्यकता आहे. नफातोटा विचारात घेऊनच व्यवहार सांभाळावेत. तुम्ही वागत असलेल्या सामंजस्याने प्रतिस्पर्धी बुचकळ्यात पडत आहेत. भाग्योदयासाठी केलेलं प्रयत्न यशाकडे घेऊन जातील. वाहन खरेदी करू शकाल. शुभ तारखा : 11 ते 15

मिथुन – कौटुंबिक सौख्य लाभेल

राजदरबारात सन्मानाची वागणूक मिळेल. हितशत्रूची भूमिका समजून घेण्याची तसदी घ्या. नोकरदारांसाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. कौटुंबिक सौख्य लाभेल. आर्थिक आवक वाढेल. सकारात्मक वातावरण बनून राहील. परदेशातील प्रलंबित कामांना गती मिळेल. भाग्योद्याकडे वाटचाल कराल. भागीदारीसाठी संधी चालून येतील. संस्थेवर पदाधिकारी नियुक्ती केली जाऊ शकते. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नवीन घर खरेदी संबंधी व्यवहार सुरळीत होतील. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून अनपेक्षित लाभ होण्याचे योग संभवतात. शुभ तारखा : 11 ते 15

कर्क- कुटुंबियांकडून उचित सहकार्य

मानसिक संतुलन ढासळू शकते. आरोग्यविषयक चिंता वाढू शकेल. जुन्या विकारांवर योग्य उपचार करावेत. वाहन चालवू नका. दूरचे प्रवास टाळा. न्यायालयीन कामकाजात प्रगती दिसून येईल. उच्च पदावर नियुक्ती होऊ शकते. आपण राजकारणात कार्यरत असाल तर सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. जमिनीच्या व्यवहारात फसगत होऊ शकते. अल्प परिचितांकडून सहाय्य मिळू शकते. कुटुंबातील लोकांकडून उचित सहकार्य मिळेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. शुभ तारखा : 14, 16

सिंह – गृहस्वप्न साकार होण्याचे योग

चांगल्या मित्र परिवाराच्या सहकार्याने जीवनाची महत्वपूर्ण वाटचाल सुरु कराल. विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील. वाहन चालवताना काळजी घ्यावी. शब्दांचा गैर अर्थ लावला जाऊ शकतो. कोणतीही चर्चा काळजीपूर्वक करा. परदेशातील हितसंबंध सुधारतील. दूरच्या प्रवासाचे नियोजन कराल. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. राजदरबारात मानसन्मान मिळेल. जमीन खरेदी करण्यासाठी अनुकूल काळ आहे. जुने येणे वसूल होण्यासाठी अनुकूल काळ आहे. संगीत, काव्य, नर्तन यांसारख्या कलाप्रेमींना साधनेसाठी उत्तम काळ आहे. गृहस्वप्न साकार होण्याचे योग आहेत. शुभ तारखा : 11,12,13

कन्या – मित्रांकडून सहकार्य मिळेल

समाजातील विविध स्तरातून सहकार्य करणारी मंडळी भेटतील. व्यवहारिक विषय पूर्णत्वास नेण्यास कमी मेहनतीत कार्यसिद्धी होऊ शकेल. विरोधकांवर सहज मत करू शकाल. कर्जाची मागणी केली असल्यास ते व्यवहार पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल करतील. विवाह इच्छूकांसाठी आनंदाची बातमी ऐकायला मिळेल. मित्रांकडून सहकार्य मिळेल. दूरचे प्रवास टाळावेत. वयोवृद्ध व्यक्तींनी आरोग्यवर्धनासाठी ईश्वरीय चिंतन करावे. कर्तृत्वात कसूर ठेवू नका. रणांगण गाजवाल. वाहन खरेदी करू शकाल. डिलोपार्जित व्यवहार पद्धती अथवा प्राचीन रूढी परंपरा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगी पडतील. शुभ तारखा : 11 ते 15

तूळ – कौटुंबिक वातावरण उत्तम

धोरणात्मक निर्णय कराल. विद्यार्थ्यांसाठी अत्यंत दिलासादायक वातावरण तयार होईल. संततीविषयक प्रश्न मार्गी लागतील. वडीलधार्‍या व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. काही प्रमाणात खर्चही वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. दूरगामी विचारांनी भविष्यातील उज्ज्वल वाटचालीची नांदी होऊ शकेल. आरोग्यविषयक किरकोळ तक्रारी येतील. शस्त्रक्रियाही होण्याची दाट शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण उत्तम राहील. भागीदारांकडून कामकाजात मोलाचे सहकार्य लाभेल. शुभ तारखा : 11,12,13

वृश्चिक – इस्टेटीचे व्यवहार पूर्णत्वास जातील

हा आठवडा महत्वपूर्ण उलाढालीचा राहील. व्यावसायिक संबंध अधिक घट्ट होतील. वाहन खरेदी तसेच स्थावर इस्टेटीच्या खरेदीविषयी सकारात्मक वातावरण तयार होऊन बहुधा व्यवहार पूर्णत्वास देखील जातील. संततीकडून अपेक्षा पूर्ण झाल्याचा आनंद प्राप्त होईल. भविष्यातील घडामोडींचे पूर्व संकेत मिळतील. दैवी चमत्काराची अपेक्षा वाढेल. उधारी वाढणार नाही याची काळजी घ्या. गुप्त शत्रूंच्या कारवाया तापदायक ठरू शकतात. शुभ तारखा : 14, 15

धनू- घर खरेदीसाठी उत्तम काळ

नोकरदारांना बदलीचे योग संभवतात. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. गृहसौख्य लाभेल. साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो, योग्य ती काळजी घ्या. घरातील व्यवहार सुरळीत चालतील. घर खरेदीसाठी उत्तम काळ आहे. नवीन कामकाज सुरु करण्याच्या प्रयत्नात असाल तर त्या व्यवहारास चालना मिळेल. कोणतेही काम करताना तज्ज्ञांचा अथवा थोरांचा सल्ला घेऊनच करा. शुभ तारखा : 11,12,13,16,17

मकर – घरात मंगलकार्याची शक्यता

पारिवारिक स्नेह वाढेल. नवीन मित्र परिवार जोडला जाईल. आर्थिक व्यवहार सुरळीत होण्यास मदत होईल. गुंतवणूक करताना विचारपूर्वक करा. नोकरदारांना सन्मान मिळवून देणारा काळ आहे. न्यायालयीन कामकाजात उल्लेखनीय प्रगती दिसून येईल. घरात मंगलकार्य ठरण्याची शक्यता आहे. अन्नदान केल्याने आत्मिक समाधान लाभेल. शेतकर्‍यांनी संयम राखणे जरुरी आहे. शुभ तारखा : 11 ते 15

कुंभ – देवाणघेवाण व्यवहारात सावध रहा

आदर्श प्रतिमा तयार होईल. लोकमान्यता प्राप्त होईल. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. भागीदाराकडून अनुकूल प्रतिसाद मिळेल. दीर्घ मुदतीची गुंतवणूक करण्यासाठी अनुकूल काळ आहे. शेतकर्‍यांसाठी अनुकूल काळ आहे. अन्नधान्याची भरभराट होईल. देवाणघेवाण व्यवहारात फसगत होण्याची शक्यता आहे. आठवड्याचा उत्तरार्ध मनातील दिशांना मूर्तरूप देणारा काळ आहे. विद्यार्थी जनांना मार्गदर्शक तत्वांचा लाभ होईल. शुभ तारखा : 14, 15, 16

मीन – नोकरदारांना पदोन्नतीचे योग

आठवड्याची सुरुवात धकाधकीच्या वातावरणात होईल. आत्मसंयम राखण्याची नितांत गरज आहे. मित्रपरिवाराकडून सहकार्य मिळेल. वयोवृध्द मंडळींनी शारीरिक विकाराकडे दुर्लक्ष करू नये. पाहुण्यांच्या अनपेक्षित भेटीगाठी होतील. नोकरदारांना पदोन्नतीचे योग आहेत. अचानक खर्चाचे प्रमाण वाढू शकते. आर्थिक व्यवहारात दुसर्‍याची मध्यस्थी करू नये. कर्जाचा परतावा करताना तारेवरची कसरत करावी लागेल. शुभ तारखा 10 ते 12

- Advertisment -

ताज्या बातम्या