साप्ताहिक राशीभविष्य Weekly Horoscope

3 ते 9 जून 2021
साप्ताहिक राशीभविष्य Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्यweekly Horoscope

मेष - मध्यस्थी करणे टाळा

मानसिक स्थैर्य राखण्यासाठी प्रयत्न. समाज मनावर प्रभाव वाढेल. व्यावसायिक तरतूद करण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. काही प्रमाणात मानसिक दुर्बलता निर्माण झाल्याने नियोजित कामावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. वाहन चालविताना काळजी घ्या. शक्यतो प्रवास करणे टाळावे. उद्योगधंद्यांसाठी स्थलांतर करावे लागण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेची जपणूक करा. इतरांची मध्यस्थी करणे टाळा. शुभ तारखा :- 4, 7, 8

वृषभ - महिलांना इच्छापूर्तीसाठी संघर्ष

कोणताही नवीन निर्णय घेताना त्याबाबतच्या दूरगामी परिणामाविषयीचा अचूक अंदाज मांडू शकाल. कौटुंबिक जीवनातील वातावरण आनंददायी राहील. जुने विकार उद्भवण्याची शक्यता आहे. मनोबल वाढण्यासाठी दैवी उपासना करावी. विशेषतः नेत्रविकाराकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. नोकरदारांसाठी दिलासादायक काळ आहे. पदोन्नती होऊ शकेल अथवा नवीन नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर त्यातही यश संपादन कराल. घरातील व्यक्तींना प्रोत्साहन द्याल. तरुणांना नवीन संधी खुणावतील. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. न्यायालयातील केसचा निकाल आपल्या बाजूने लागेल. महिलांना इच्छापूर्तीसाठी संघर्ष करावा. शुभ तारखा : - 5,6,9

मिथुन - कालमानानुसार आर्थिक गुंतवणूक करा

शैक्षणिक ध्येय धोरण राबविताना उत्तम कलाकौशल्य वापराल. संततीविषयक प्रश्न मार्गी लागतील. देवाधर्माविषयी आस्था निर्माण होईल. कला क्रीडा क्षेत्रांत पुढील आयाम गाठण्यास यशस्वी वाटचाल कराल. ऐच्छिक विषयात विशेष प्रावीण्य मिळू शकेल. बदलत्या कालमानाचा विचार करून कर्ज घेणे अथवा आर्थिक गुंतवणूक करण्याबाबत निर्णय घ्या. भागीदाराकडून सुरक्षित सहकार्य मिळेल. सवलतींचा उपयोग योग्य कारणा करताच करावा. घरातील व्यक्तींशी क्षुल्लक कारणावरून हुज्जत घालू नका. शुभ तारखा : - 7, 8

कर्क- मातृसेवा घडेल

विविध सुखांचा अनुभव देणारा सप्ताह आहे. अनेक दिवसांपासून पाहिलेले गृहउभारणीचे स्वप्न पूर्ण होईल. आप्तस्वकीयांसोबत सुखकारक वार्तालाप होईल. व्यापार उद्योगांच्या अनेक संधी उपलब्ध होतील. मातृसेवा घडेल. राजकारणापासून दूर राहणे हितावह ठरेल. न्यायदेवतेवरील विश्वास अधिक दृढ होईल. संतान प्राप्तीचा योग आहे. त्यामुळे कुटुंबातील सर्वाचा आनंद द्विगुणित होईल. संकल्पित गोष्टी पूर्ण होण्यासाठी मित्रांची योग्य ती मदत होईल. महिलांनी कुलदेवतेची उपासना करावी. शुभ तारखा:- 6, 9

सिंह - आर्थिक उन्नती साधता येईल

व्यावसायिक शिक्षणाकडे कल वाढेल. संततीकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. भविष्यात घडणार्‍या घटनांचा अंदाज मांडू शकाल. वाहन न चालविणे हिताचे ठरेल. आर्थिक उन्नती साधता येईल. नेत्रविकारांकडे दुर्लक्ष करू नका. नोकरदारांसाठी अपेक्षित समाधान देणारा काळ आहे. पदोन्नतीसाठी प्रयत्नशील असाल तर त्यातही यश संपादन कराल. लांबलेल्या कामांना गती येईल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे लागेल. परदेशातील व्यवहार सुरळीत होऊन कामकाजाला गती मिळेल. नवीन व्यवसायाचा विचार तूर्तास न करणे उत्तम राहील. शुभ तारखा :- 7, 8

कन्या - गुंतवणुकीतून अनपेक्षित लाभ

कोणतेही करार करण्याअगोदर त्यातील सर्व गोष्टींचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा. व्यवसायासाठी आवश्यक आर्थिक तरतूद करू शकाल. सामाजिक कार्य करताना अनेक लोकांचे सहकार्य लाभेल. बर्‍याच दिवसंपासून प्रलंबित मालमत्ता आपल्या नावावर होईल. सज्जनांची संगत लाभेल. मंत्र तंत्र इत्यादी धार्मिक गोष्टी शिकून घेण्यास रुची निर्माण होईल. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून अनपेक्षित लाभ होण्याचे योग संभवतात. विद्यार्थ्यांसाठी अडचणींचा व संघर्षाचा काळ संभवतो. शुभ तारखा : - 4, 5, 6,

तूळ - वाहन खरेदीचे योग आहेत

आर्थिक उलढालींना लगाम घालावा लागेल. उसने दिलेले पैसे येण्यासाठी बळापेक्षा बुद्धीचा जास्त वापर करावा लागेल. आपले छंद जोपासता येतील. आपण केलेले लिखाण प्रसिद्ध होण्यास विलंब लागेल. दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीतून धनलाभ होईल. वादविवाद टाळावेत. वाहन खरेदीचे योग आहेत. विद्यार्थ्यांनी आपल्या नवनवीन कल्पनांना मूर्तरूप दिल्याने त्यांचा नावलौकिक वाढेल. घरातील ज्येष्ठ मंडळींच्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. महिलांसाठी आर्थिक गणिते बिघडवणारा काळ आहे. शुभ तारखा : - 4,6, 8

वृश्चिक - योग्य व्यक्तीची निवड करा

व्यवहार सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागेल. दुसर्‍याने दिलेल्या दूषणामुळे मन व्यथित होण्याची शक्यता आहे. मनाने ठरविलेल्या संकल्पावर ठाम रहा. आपण करीत असलेल्या कार्यामध्ये भरपूर मोठे यश मिळेल. संगीत, काव्य, नर्तन यांसारख्या कलाप्रेमींना साधनेसाठी उत्तम काळ आहे. गृहस्वप्न साकार होण्याचे योग आहेत. शेतकरी, मजूर, लघुउद्योजकांचे अनेक प्रश्न सुटून नवीन कामे हाती लागतील. शुभ तारखा : - 5, 6

धनू - जुने येणे वसूल होईल

राजदरबारात नावलौकिक प्रतिष्ठा वाढेल. जुने येणे वसूल होईल. आर्थिक गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे. गाडी खरेदीसारखे व्यवहार तूर्तास लांबणीवर टाकावेत. जवळचे प्रवास करावे लागतील. थोरांचे मत उपयोगी पडेल. परिश्रम वाढविण्याची आवश्यकता आहे. नफातोटा विचारात घेऊनच व्यवहार सांभाळावेत. तुम्ही वागत असलेल्या सामंजस्याने प्रतिस्पर्धी बुचकळ्यात पडत आहेत. शुभ तारखा :- 4, 7

मकर - जादा भांडवलाची गरज

अनेक प्रकारचे लाभ प्राप्त होतील. स्थावर इस्टेटीचे व्यवहार सुरळीत होण्यास मदत होईल. आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात कराल. परिवाराशी जवळीक वाढेल. अचानक वाढणार्‍या जबाबदारीचे भान ठेवून ती पेलण्याचा प्रयत्न करावा. अतिउंच ठिकाणावर जाणे टाळावे. मनाची चलबिचल नुकसानकारक ठरेल. भाग्योदयासाठी केलेलं प्रयत्न यशाकडे घेऊन जातील. वाहन खरेदी करू शकाल. सद्गुरू मंत्राचा जप करावा. शुभ तारखा :- 4, 5, 6,

कुंभ - भागीदारांकडून सहकार्य मिळेल

मनातील विचारांना मूर्त रूप मिळेल. नवीन संकल्पना राबविताना उत्तम सहकार्य मिळेल, दूरदृष्टी ठेवल्याने भवितव्यासाठी फायद्याचे निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल. मनावर दडपण निर्माण होऊ शकेल. कर्तृत्वात कसूर ठेवू नका. रणांगण गाजवाल. प्रेमाचे संबंध प्रस्थापित कराल. भागीदारांकडून सहकार्य मिळेल. समाजाला अभिमान वाटावा अशी कामगिरी या काळात आपल्या हातून होण्याची स्थिती निर्माण होत आहे. आठवड्याच्या उत्तरार्धात कोणतीही महत्त्वाची कामे विचारपूर्वकच करावीत. शुभ तारखा :- 4 ते 8

मीन - दुर्जनाची संगत घातक ठरेल

कर्तव्य दक्षता बाळगावी. आर्थिक व्यवहाराबाबतीत निर्णय चुकतील. आरोग्याच्या तक्रारी वाढतील. मनाला दिलासा देणार्‍या घटना घडल्याने काही प्रमाणात दिलासा मिळेल. त्रयस्थ व्यक्तीकडून स्तुती ऐकायला मिळेल. दुर्जनाची संगत घातक ठरेल. पारिवारिक स्नेह वृद्धिंंगत होईल. न्याय विषयाबद्दल आत्मीयता वाढेल. सगे सोयर्‍यांकडून सहानुभूती प्राप्त होईल. वडिलोपार्जित व्यवहार पद्धती अथवा प्राचीन रूढी परंपरा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोगी पडतील. शुभ तारखा :- 5, 6, 7

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com