
मेष- आर्थिक सुबत्ता येईल
नवीन वर्षाची सुरुवात काही प्रमाणात ओढाताण करणारी ठरेल. जवळच्या लोकांमध्ये मतमतांतरे दिसून येतील मात्र आपण आपल्या निर्णयावर ठाम रहाल. ठोस भूमिका मांडल्यामुळे समाजात सकारात्मक संदेश जाईल. दुरावलेली मंडळी पुन्हा जवळ येतील. पारिवारिक सलोखा वाढेल. आर्थिक सुबत्ता येईल. दूरच्या नातेवाईकाबद्दल अप्रिय बातमी ऐकायला येऊ शकते. प्राकृतिक स्थिती मध्यम राहील. निष्काळजीपणा हानी देऊ शकतो सावध राहा. देवाण-घेवाणीच्या वेळी कागदपत्र लक्षपूर्वक वाचा. शुभ तारखा : 6, 8, 9
वृषभ - आर्थिक व्यवस्थापन हिताचे
नवीन वर्षाची सुरुवात सन्मानाने होईल. कीर्ती वाढेल. शैक्षणिक जीवनात अपेक्षित यशाकडे वाटचाल कराल. अध्यात्मिक उपासना -ध्यानधारणा याविषयीची ओढ तीव्र होईल. आर्थिक व्यवस्थापन करणे हिताचे ठरेल. कोणत्याही विषयाची शहनिशा केल्याशिवाय मत प्रकट करू नका. दीर्घकालीन परिणामांचा विचार -अभ्यास करूनच कोणतेही निर्णय करणे हिताचे ठरेल. पारिवारिक स्नेह वाढेल. इतरांचे मन वळविण्याची आपली क्षमता या आठवड्यात कौटुंबिक शांतता राखण्यास मदत करेल. अंतिम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रातील कामगिरी बक्षीसपात्र स्थितीच राहील. कार्यक्षेत्रात सहकारी वर्गाबरोबर असणारे मतभेद मिटतील व परिस्थिती सुधारेल. थोरांचे निर्णय लाभदायक ठरतील. कमाईमध्ये ही वाढ होण्याचे योग बनतील. शुभ तारखा : 9, 10, 11
मिथुन- आर्थिक समस्या मिटेल
नवीन वर्षाची सुरुवात सकारात्मक वातावरणात होत आहे. मनाला आनंद देणार्या गोष्टी ऐकायला मिळतील. सामोपचाराने अनेक प्रश्न मार्गी लागतील. श्रेयवादाच्या लढाईत बाजी मारून जाल. वडिलोपार्जित रूढी परंपरांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न करा. संतती विषयक प्रश्न मार्गी लागतील. नवा कीर्तिमान स्थापन करण्यात यशस्वी व्हाल. जुन्या गुंतवणुकीवरील प्रत्यक्ष लाभ हाती येण्याचे संकेत व सूचना प्राप्त होऊन भावी काळातील आर्थिक समस्या मिटेल. हित शत्रूंच्या कारवाया मानसिक तनाव वाढवणार्या ठरतील. शुभ तारखा : 8, 9, 10
कर्क- आनंददायी घटनांची चाहूल
अनेक दिवसापासून प्रयत्न करीत असलेल्या कामांना गती मिळेल. सहकार्यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. परदेश वारी कराल. नोकरी-व्यवसायात उंच भरारी घेण्यास सिद्ध व्हाल. कामाच्या पद्धतीमुळे जनसामान्यांच्या अपेक्षा वाढतील. काही कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. घर खरेदीसारखे निर्णय अंतिम टप्यात येतील. घरच्या सुशोभीकरणाच्या वस्तू खरेदी करू शकाल. शैक्षणिक आलेख चढता राहील. मनावर असलेले काळजीचे दडपण दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधकच ठरेल. शुभ तारखा : 6, 8, 9
सिंह- प्रयत्नांना यश मिळेल
नवीन वर्षाच्या सुरुवातील वाहन चालवण्याचा अट्टाहास टाळा. मनातील विचारांना नियंत्रित ठेवण्याचा प्रयास करा. शाब्दिक चुका टाळण्याचा प्रयत्न करा. न्यायालयीन क्षेत्रात यशाच्या दिशेने वाटचाल कराल. भावंडांची अपेक्षित साथ मिळेल. पदोन्नतीसाठी प्रयत्न करीत असाल अथवा नवीन नोकरीच्या शोधात असाल तर लवकरच यशस्वी व्हाल. व्यवसायासाठी वस्तूची खरेदी करण्याचे योग आहेत. राजकीय क्षेत्रात नव्या उमेदीने वाटचाल कराल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत करावी लागेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. शुभ तारखा : 7, 8, 9
कन्या - अचानक धनलाभ योग
विवाह इच्छूकांसाठी अपेक्षित स्थळ येईल. विवाह नक्की होण्याची शक्यता आहे. भागीदारीत फायदा होईल. जवळच्या मित्रांच्या सहयोगाने अडकून पडलेल्या कामांना गती मिळू शकेल. कोणतेही नवीन पाऊल उचलताना काळजीपूर्वक उचला. आर्थिक गुंतवणूक करताना व्यावहारिक गणित मांडा. उसनवारी टाळा. राजदरबारात मानमान्यता मिळेल. जवळचे प्रवास कराल . तीर्थयात्रा किंवा मंगल कार्यात सहभागी व्हाल. मेहनतीचे उत्तम परिणाम मिळण्याचे योग आहेत. अचानक धनलाभ योग आहे. त्यामुळे लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. शुभ तारखा: 7, 9, 11
तूळ- कमाईमध्ये वाढ होण्याचे योग
नवीन वर्षाच्या सुरवातीलाच मनातील विचारांना मूर्त रूप देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. विरोधकांचा प्रतिकार करताना शाब्दिक युध्दजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मित्र परिवाराकडूेन सहजभावाने साथ मिळेल. थोरांचे निर्णय लाभदायक ठरतील. कमाईमध्ये ही वाढ होण्याचे योग बनतील. सहयोगी लोकांबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त केल्याने आत्मिक समाधान लाभेल. दूरचे प्रवास टाळणे हिताचे ठरेल. जुने विकार त्रासदायक ठरतील. वैद्यकीय उपचाराची गरज भासेल. शुभ तारखा : 5, 6, 7
वृश्चिक- नवीन कामाच्या सुरूवातीस उत्तम वेळ
नवे वर्ष नव्या दिशा नव्या आशा पल्लवित करणारे ठरेल. विविध विचारांना घेऊन यशस्वी वाटचाल कराल. हित शत्रूंपासून सावध असावे. कामकाजातील गुप्तता यशाच्या वाटेवर चालण्यास मदतगार ठरेल. आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ नाही. सामाजिक स्थितीचे भान ठेवण्याची गरज आहे. मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात आनंद होईल. अतिविश्वास घातक ठरेल. अपेक्षित यश मिळू शकेल. अंतिम चरणात धार्मिक स्वरूपाच्या कार्यक्रमानिमित्त प्रवास योग जुळून येईल व प्रवास अनुकूलतेचा ठरेल. शुभ तारखा : 8, 9
धनू- प्रशिक्षणासाठी लाभदायक काळ
कौटूंबिक वातावरण सुखद राहील. मंगल कार्य ठरू शकतील. वाहन खरेदीचे योग. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुकूल काळ आहे. अधिकारात वाढ होऊ शकेल. प्रशिक्षणासाठी लाभदायक काळ आहे. विद्यार्थ्यांसाठी प्रगतिशील काळ आहे. आपल्या वाणीने कुणाच्या मर्मावर घाव घातला जात नाही ना याबाबत जागृत असावे. कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त ऐकण्यापुरतेच मयादित ठेवणे उचित स्वरूपाचेच ठरू शकेल. सात्विक भाव जागृत होईल. शुभ तारखा : 7, 8, 10
मकर- कागदपत्रांची पडताळणी करा
या आठवड्यात तुमच्या शौर्य आणि पराक्रमाच्या सर्वत्र चर्चा होतील. कीर्ती वाढेल. राजदरबारात सन्मान प्राप्त होतील. सामाजिक स्तरावर केलेल्या कामाची पावती मिळाल्याचं आनंद प्राप्त होईल. दैवी शक्तीवरील भाव दृढ करण्याची आवश्यकता आहे. खर्च करावा लागेल. जमीन किंवा स्थावर मालमत्ता खरेदी करताना कागपत्रांची नीट पडताळणी करूनच पुढील निर्णय घ्या. शुभ तारखा : 10, 11
कुंभ-व्यवसायासाठी नवीन संधी
पारिवारिक स्नेह वाढवणारा आठवडा आहे. अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध होतील. नयनरम्य स्थळांच्या सहलीला जाण्याचे योग आहेत. नोकरीत पदोन्नती होईल. अधिकारी वर्गाकडून स्तुती केली जाईल. राजदरबारात मानसन्मानाने सन्मानित केले जाण्याची शक्यता आहे. न्यायालयीन कामकाजात प्रगती दिसून येईल. घर खरेदीसारख्या विषयात संयमाची आवश्यकता आहे. व्यवसायासाठी नवीन संधी चालून येतील. शुभ तारखा : 5, 8, 9
मीन- आर्थिक स्थिती उत्तम राहील
उच्च विचार सुचतील. हाती घेतलेल्या कामास सहकार्य करणारी मंडळी उभे रहातील. भागीदारांकडून साथ मिळेल. अनाकलनीय विचारांनी मन व्यथित होण्याची शक्यता आहे. दिलेला शब्द पाळण्याची जबाबदारी टाळता येणार नाही. आर्थिक स्थिती उत्तम राहील. मोलाचा सल्ला लाभल्याने मोठी पाहणी टाळली जाईल. कर्तव्य पार पडताना पदाची गरीमा राखण्यासाठी भावना आडव्या येणार नाहीत याची काळजी घ्या. शुभ तारखा : 8, 9