साप्ताहिक राशीभविष्य
भविष्यवेध

साप्ताहिक राशीभविष्य

6 ते 12 ऑगस्ट 2020

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

ज्यो. श्री रवींद्र भगवान पाठक,(ठाणे, मुंबई) 9869575547

मेष - चांगल्या गुणांमध्ये वाढ

मनाला प्रसन्न असे वातावरण अनुभवायला मिळेल. चांगल्या गुणांमध्ये वाढ होईल, तसेच विलासी वृत्ती देखील वाढण्याची शक्यता आहे. आपल्या मित्र परिवारापासून सतर्क असले पाहिजे. आर्थिक दृष्टीने केलेले नियोजन व्यवहार चालवण्यासाठी उपयुक्त ठरेल. जुने देणे परत करण्याचा प्रयत्न करा. साठवून ठेवलेली रक्कम असेल तर त्यामध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. जर गुंतवणूक करून ठेवली असेल तर जिथे गुंतवणुक आहे तिथली व्यवस्था तपासून पहावी. शुभ तारखा 6,10,11,12

वृषभ - अस्वस्थता जाणवू शकेल

आत्मिक समाधान लाभेल. सरकार दरबारी सन्मान प्राप्त होऊ शकेलं. किर्तीमध्ये वाढ होईल. जनसामान्यात आपल्याबद्दल आदर निर्माण होईल. आपण विकसित करत असलेल्या कामकाजास लोक मान्यता प्राप्त होईल. दुसर्‍यावर विसंबून कोणतेही काम ठरवू नका. स्वतःची जबाबदारी स्वतः पार पाडण्याचा प्रयत्न करा. मित्र परिवाराकडून जास्त अपेक्षा ठेवणे म्हणजे आपण आपल्या कामात स्वतःहून केलेला विलंब , असा त्याचा अर्थ लागू शकतो. शारीरिक विकारामुळे काही प्रमाणात अस्वस्थता जाणवू शकेल. शुभ तारखा : 6,7,8,12

मिथुन - सामाजिक प्रतिष्ठा वाढेल

हरीकथा श्रवणाविषयी अत्यंत आदर निर्माण होईल. कौटुंबिक सुखाने युक्त जीवन जगण्याची संधी प्राप्त होईल. तीर्थक्षेत्राच्या यात्रा घडून येतील. आपले आचरण इतरांना मार्गदर्शक ठरेल. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. क्रीडा विषयात लौकिक वाढेल. सरकार दरबारी मानसन्मान प्राप्त होतील. आपल्या कर्तृत्वाची नोंद सर्व सामान्यांमध्ये घेतली जाईल. डोळ्याचे विकार वाढण्याची शक्यता आहे. शुभ तारखा 6 ते 11

कर्क - विचारपूर्वक निर्णय घ्या

या आठवड्यात आर्थिक चणचण भासू शकते. अकारण कोणाचेही शत्रुत्व वाढणार नाही याबाबत काळजी घ्या. रक्तदाब नियंत्रित राहील यासाठी प्रयत्न करा. शारीरिक कमजोरी हे विकार वाढीचे लक्षण ठरू शकेल. तुमच्या व्यवहारिक वागण्यामुळे बरेच लोक नवनवीन विचार घेऊन, तुमच्या व्यवसायात मदत करू शकतात. मात्र संगती संग दोष: या उक्तीप्रमाणे, कोणाशी किती जवळीक साधायची याबाबत आपण विचारपूर्वक निर्णय घ्यायला हवेत.शुभ तारखा : 7 ते 12

सिंह - भागीदारी व्यवसायात फायदा

जीवलग असा नवीन मित्र परिवार जोडला जाईल. भागीदारीत व्यवसाय करीत असाल तर त्याच्यात फायदा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मानसिक उद्विग्नतेमुळे हातात घेतलेल्या कामाला विलंब होण्याची शक्यता आहे. पायाच्या संबंधित विकारावर उपचार करणे भाग पडेल. शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता असल्यास त्वरित निर्णय घ्यावा. घरच्या मंडळींकडून अपेक्षित सहयोग मिळेल.

शुभ तारखा : 6,10, 11 ,12

कन्या - आत्मविश्वास कमी पडेल

विचलित मनस्थिती निर्माण होऊन मनामध्ये अनेक विचारांचे काहूर माजेल. कोणत्याही कामी निर्णय करण्यास आत्मविश्वास कमी पडेल. वैवाहिक जीवनातं अडचणी येऊ शकतात. भागीदारावर विसंबून कोणतेही कार्य हाती घेऊ नका. वाहन अपघाताची भिती संभवते. न्याय-निष्ठा-कर्तव्य या त्रिसूत्रीची आठवण ठेवून पुढील पाऊल टाकावे.शुभ तारखा : 7,8,9,12

तूळ - अतिविश्वासूपणा घातक ठरेल

नवीन बदल स्वीकारून केलेल्या कामकाजात लगबग दिसून येईल. आर्थिक बाजू बळकट होईल. कोणत्याही विषयावर केलेल्या चर्चेतून ठोस काहीतरी निष्पन्न होईल. शारीरिक स्थिती कमजोर राहील. जुने विकार त्रासदायक ठरू शकतात. कोणावरही अतिविश्वास टाकणे घातक ठरेल. भविष्यासाठी सूचक वातावरणात तयार होऊन, सुयोग्य पद्धतीने वाटचाल सुरु कराल. राजकीय क्षेत्रात सन्मान मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील. शुभ तारखा : 6,10,11

वृश्चिक - मित्र साथ देतील

कुटुंबातील लोकांशी स्नेहवर्धन होईल. या आठवड्यात वाहन खरेदीचे व्यवहार पूर्ण कराल. आपल्या कार्यक्षेत्रात जबाबदार्‍या स्वीकाराव्या लागतील. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक स्थिती उत्तम राहील. कर्ज घेण्यासाठी मागणी केली असेल तर ते प्राप्त होऊ शकेल. संतती इच्छूकांचे संतती विषयक प्रश्न मार्गी लागतील. विरोधकास जशास तसे उत्तर द्याल. आत्मविश्वासाने कोणताही निर्णय घ्या. जवळचे मित्र साथ देतील. मित्र मैत्रिणींचा व्यवहार आनंददायी राहील. शुभ तारखा : 7,8,9,12

धनू - वागण्यामागील हेतू शुद्ध ठेवा

समाजामध्ये आदराचे स्थान निर्माण होईल. आपण आपल्या वागण्यामागील हेतू शुद्ध ठेवावा. व्यवहारात आर्थिक नुकसान वाढण्याची शक्यता आहे. नेत्र विकाराने त्रस्त व्हाल. पारिवारिक स्नेह वाढत असला तरी काही महत्वाच्या व्यक्तीकडून साथ मिळेलच याबाबत शक्यता कमी आहे. उद्योगाकडे दुर्लक्ष होणार नाही याबाबत काळजी घ्या. राजदरबारात सन्मान मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. आपल्या मधुर वाणीने इतरांवर सहज प्रभाव टाकू शकाल. शुभ तारखा : 6, 11,12

मकर - अपेक्षित ठिकाणी बदली होऊ शकेल

आपण ठरवलेले संकल्प सिद्धीस जातील. समाजात तुमच्या मताला महत्व प्राप्त होईल. मांगल्य उत्पन्न होईल अशा धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. आपणाकडून परिवारातील व्यक्तींच्या अपेक्षा वाढतील. अडकून पडलेले आर्थिक येणे वसूल करण्यासाठी प्रयत्न करा, त्यात यश संपादन होईल. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. नोकरदारांना नोकरीमध्ये पदोन्नती अथवा अपेक्षित ठिकाणी बदली होऊ शकेल. लाभाच्या पदावर नियुक्ती होण्यासाठी अनुकूल काळ आहे. शुभ तारखा : 6 ते 9, 12

कुंभ - न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागेल

इतरांनी दाखवलेली दिशा समजून घेण्याची आवश्यकता आहे. प्रसंगी आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे. तुमचे निर्णय दुसर्‍यावर लादण्याचा अट्टाहास करू नका. आर्थिक बाबतीत नियोजन करण्याची आवश्यकता आहे. व्यापार उद्योगातील तुम्ही बांधलेले आडाखे यशस्वी होतील . आप्तेष्टांकडून सहकार्य होईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. दूरचे प्रवास टाळावेत. न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागेल. शुभ तारखा : 6 ते 11

मीन - हितशत्रूंच्या कारवायांनी त्रस्त व्हाल

आधारभूत संकल्पनांना सार्थ आणि योग्य दिशेने चालना मिळेल. नवीन कामकाजाचे उत्तम नियोजन करू शकाल. संस्था चालकांसाठी हा काळ उत्साहवर्धक असेल. शैक्षणिक स्थितीत सुधारणा होईल. पारंपरिक रूढीपरंपरांचा आदर कराल . अचानक खर्च वाढू शकतात. हितशत्रूंच्या कारवायांनी त्रस्त व्हाल. इष्ट देवतेची उपासना करणे लाभप्रद ठरेल. शर्थीचे प्रयत्न केल्याने ध्येय पूर्तीकडे वाटचाल सुरु होऊ शकेल. शुभ तारखा : 7 ते 12

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com