साप्ताहिक राशीभविष्य

साप्ताहिक राशीभविष्य
साप्ताहिक राशीभविष्य weekly horoscope Bhavishyavedh

मेष- आर्थिक सुबत्ता येईल

आठवड्याच्या पहिल्या दिवशी अप्रिय बातम्या ऐकायला मिळू शकतात, मात्र त्यातून लवकरच सावरले जाल. पारिवारिक स्नेह वाढेल. आर्थिक सुबत्ता येईल. आत्मिक समाधान प्राप्त होईल. न्यायप्रविष्ठ विषयावर उचित दिशेने वाटचाल सुरू कराल. कौटुंबिक जीवनात आनंद प्राप्त होईल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. रागावर नियंत्रण ठेवा. स्वास्थ्य ठीकठाक राहील. दिशाहीन विषयावर वाटचाल होणार नाही याची काळजी घ्या. दूरच्या नातेवाईकांकडून सहकार्य प्राप्त होईल.

शुभ तारखा : 2, 5

वृषभ -मित्रांचा सहवास लाभेल

पदासाठी प्रयत्न करीत असाल तर त्यात यश मिळेल. रक्तदाब किंवा तत्सम विषयावर वैद्यकीय उपचार करून घेणे हिताचे ठरेल. छोट्या मोठ्या शस्त्रक्रिया देखील होऊ शकतात. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. मंगल कार्यात सहभागी व्हाल. भागीदारीत व्यवसाय करण्याच्या संधी उपलब्ध होतील दूरचे प्रवास टाळावेत. मिळकतीचे नवे स्त्रोत उपलब्ध होतील. कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रयत्नशील रहा नवीन व्यवसाय सुरू करणार्‍या मंडळींचा आत्मविश्वास वाढेल अशी ग्रहस्थिती आहे. कौटुंबिक जीवनात वातावरण आनंदाचे राहील मित्रांचा सहवास लाभेल. सामाजिक कार्यात कार्यमग्नता वाढेल. विद्यार्थी मंडळींचा आत्मविश्वास वृद्धिगंत होईल. परीक्षार्थींना यश मिळेल.

शुभ तारखा : 5,6,

मिथुन- मिळकतीची नवी साधने उपलब्ध

घर खरेदी करण्यासाठी अनुकूल काळ आहे. नोकरदारांसाठी पदोन्नती होण्यास अनुकूल वातावरण निर्माण होत आहे. शैक्षणिक क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी अनुकूल ग्रहस्थिती आहे. सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असाल तर तुम्हाला सन्मानित केले जाईल. आरोग्यविषयक किरकोळ तक्रारी वाढू शकतात. संगती संग दोष: ही बाब ध्यानात घेऊन सोबत अथवा मैत्रीत जवळीक वाढवावी. वैवाहिक जीवनात कटू अनुभव येण्याची शक्यता. प्रकृतीविषयक काळजी घेणे आवश्यक आहे. शब्दाला सन्मान मिळेल. भागीदाराकडून योग्य सहकार्य मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंदी व्हाल.

शुभ तारखा 4,5

कर्क- व्यवसायात गुंतवणूक फायदेशीर

आठवड्याची सुरुवात उत्साहवर्धक राहील. थांबलेली कामे महत्त्वपूर्ण टप्यात येतील. वाहन खरेदी करण्यासाठी अनुकूल ग्रहमान आहे. नवीन उद्योग व्यवसाय सुरू करणे किंवा चालू व्यवसायात अधिक गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. संततीकडून अपेक्षा पूर्ण झाल्याचा आनंद प्राप्त होईल. वादापासून दूर रहा. धंद्याला काळ अनुकूल आहे. नवे व्यवहार लाभदायक असतील. ट्रान्सपोर्टशी संबंधित व्यावसायिकांसाठी विशेषकरुन चांगली वेळ आहे. तुमच्याजवळ धन येईल, पण राहणार नाही.

शुभ तारखा : 3, 4, 6

सिंह- शुभ वार्ता ऐकायला मिळतील

दगदग -धावपळीचा आठवडा आहे. स्नेह वाढेल. सामाजिक बांधिलकी जपताना आर्थिक झळ सहन करावी लागेल. न्यायालयातील प्रलंबित प्रकरण मार्गस्थ होण्याची शक्यता आहे. भावडांची साथ मिळेल. परदेशात जाण्यासाठी संधी उपलब्ध होतील. नोकरीत बदल संभवतो. संतती योग संभवतात. दुर्जनांचा संग घातक ठरू शकतो. सुखद घटनांचा सिलसिला चालू राहिल्याने मन प्रसन्न राहील. व्यवसायाच्या ठिकाणी शुभ वार्ता ऐकायला मिळतील. मामा मावशी किंवा आजोळच्या लोकांच्या भेटीचे योग संभवतात. कामानिमित्त न्यायालयाची पायरी चढावी लागेल.

शुभ तारखा 3,4,5

कन्या - अर्थार्जन उत्तमप्रकारे कराल

चांगले विचार सुचतील. मित्रांची साथ लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अर्थार्जन उत्तम प्रकारे कराल. गुंतवणूक केल्यास फायदेशीर ठरेल. नेत्रदीपक यश मिळेल. कलागुणांना संधी उपलब्ध होतील. पायाला इजा होण्याची शक्यता आहे. खोल पाण्यात जाणे टाळावे. सैनिक अथवा संरक्षण क्षेत्रात उत्तम कामगिरी कराल. सामाजिक प्रबोधन करण्यात यशस्वी व्हाल. सावधान राहा. फालतू गोष्टींमध्ये वेळ दवडू नका. कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. विविध क्षेत्रातील व्यावसायिक मातब्बर लोकांच्या अनुभवाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग होईल.

शुभ तारखा : 5, 6,

तूळ- ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा

आरोपाने व्यथीत होऊ नका. संयम पाळावा. मोठे निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला घ्यावा. आपल्या बोलण्याने कोणी दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी . स्वावलंबी बनावे लागेल. धन प्राप्ती होईल. डोळ्याचे विकार जाणवतील. सन्मान प्राप्त होतील. न्याय हक्कासाठी लढलेला लढा सफल यशस्वी होईल. परदेशात जाण्याचे योग जुळून येत आहेत कौटुंबिक जीवनात आनंदी व्हाल. भागीदाराकडून योग्य सहकार्य मिळेल. विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील.

शुभ तारखा - 4, 5

वृश्चिक- अनपेक्षित लाभ होतील

अतिशय उत्साह वाढवणारा सप्ताह्. अनपेक्षित लाभ होतील त्यामुळे मन प्रसन्न राहील. एखाद्या सामूहिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. आप्तेष्टांच्या भेटी होतील. परदेश गमनाचा योग आहे. त्यासंबंधी अडून पडलेले प्रश्न निकाली निघतील. कुटुंबाकरिता वेळ द्यावा लागेल. सप्ताहाच्या शेवटी आत्मविश्वास वाढेल. स्वप्नपूर्तीचा काळ आहे. घर खरेदीविषयक बोलणी मार्गी लागतील. प्रेमात यश मिळेल. मित्रांचा सहवास लाभेल. सामाजिक कार्यात कार्यमग्नता वाढेल.

शुभ तारखा - 1,2, 4,

धनू- कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण

कामाच्या ठिकाणी तुमच्यावर पडलेल्या सर्व जबाबदारी तुम्ही सहजपणे पार पाडून वरिष्ठांकडून कौतुकाची थाप मिळवाल. वडीलधारी माणसांचा सहवास लाभेल. पारंपरिक रूढी परंपरांचा सन्मान वाढेल असे कृत्य हातून घडले. जुन्या मित्र मैत्रिणी यांच्यासोबत फिरायला जाण्याचे बेत आखाल. प्रेमी युगुलासाठी आनंदाचा काळ आहे. खर्चाचे प्रमाण वाढेल.

शुभ तारखा : 4, 5

मकर- स्वप्नाची पूर्तता होण्याचा काळ

भाग्योदय होण्यासाठी अनुकूल फलदायी ग्रहस्थिती आहे. अनेक दिवसांपासून पाहत असलेल्या स्वप्नांची पूर्तता होण्याचा काळ आहे. तिर्थक्षेत्राच्या सहलीला जाल. सद्गुरूंचा सहवास लाभेल. तीर्थाटनाकरिता प्रवास करावा लागेल. कामाच्या ठिकाणी उच्च पद व अधिकार प्राप्त होईल. आप्तस्वकीयांच्या भेटी होतील. वडिलांचा सल्ला मोलाचा ठरेल. मित्रांच्या भेटीगाठी होतील.

शुभ तारखा : 31, 2, 4

कुंभ- खर्चाचे प्रमाण वाढेल

शारीरिक व्याधी निर्माण होईल. आजाराचे निदान लवकर होणार नाही. भागीदारीत नुकसान होऊ शकते. खर्चाचे प्रमाण वाढेल. प्रवास करावा लागेल. कलह निर्माण होण्याची शक्यता आहे. सत्पुरुषांचा सहवास मिळेल. सप्ताहाच्या उत्तरार्धात कामाच्या ठिकाणी शुभ वार्ता मिळतील. नियोजित कार्यामध्ये अडथळे निर्माण होतील. इष्टगती मिळण्यासाठी काळभैरवाची उपासना करावी. पीडितांना अन्नदान करावे.

शुभ तारखा : 5, 6

मीन- अचानक धनलाभ

उत्साह वाढविणारा सप्ताह. विवाहाची बोलणी अंतिम टप्प्यात येईल. अचानक धनलाभ होईल. प्रलंबित प्रश्न सुटतील. धार्मिक स्थळाला भेट द्याल. प्रवास दरम्यान शारीरीक काळजी घ्यावी. सप्ताहाच्या शेवटी शारीरिक चिंता. वैद्यकीय उपचाराची आवश्यकता भासेल. कामात कुचराई होणार नाही याबाबत दक्षता घ्याल. कुलदेवतेची उपासना फलदायी.

शुभ तारखा : 2, 3, 4

Related Stories

No stories found.