साप्ताहिक राशीभविष्य weekly horoscope

साप्ताहिक राशीभविष्य weekly horoscope

30 जुलै ते 5 ऑगस्ट 2020

ज्यो. श्री रवींद्र भगवान पाठक,(ठाणे, मुंबई) 9869575547

मेष-संकल्पना राबविण्यात यशस्वी व्हाल

आठवड्याचा सुरुवातीचा काळ साधारण आहे. काही प्रमाणामध्ये मनाची चलबिचल राहील. वाहन चालविताना काळजी घ्यायची आहे. कोणत्याही धोकादायक किंवा उंच जागेवर जाण्याचा प्रयत्न करू नका. राजकारणात आपल्या सोबत अन्याय होऊ शकतो. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. भाग्य उदयासाठी अपेक्षित प्रमाणात आपल्याला सहकार्य करणारे मंडळी भेटतील. कामकाजासाठी नवीन संकल्पना राबविण्यात यशस्वी व्हाल .

शुभ तारखा : 1, 2, 3, 4, 5

वृषभ-उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील

मित्र परिवाराकडून उत्तम प्रकारे सहकार्य मिळेल. भागीदारीमध्ये व्यवसाय करू इच्छित असाल तर यश मिळेल. आरोग्यविषयक काळजी घेण्याची आवश्यकता आहे. गुडघेदुखी किंवा कमरेपासून खालच्या भागास पीडा होऊ शकते. परदेशस्थ व्यवहार सुरळीत होण्यासाठी हा काळ अत्यंत सकारात्मक आहे. भावंडांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. न्यायालयीन कामकाजात यश संपादन कराल. प्रचलित उद्योग व्यवसायांमध्ये अनपेक्षित धनलाभ होतील. शुभ तारखा 30, 3, 4

मिथुन-कलाकौशल्याची आवड निर्माण होईल

अचानक धनलाभ होऊ शकतील. लॉटरीसारख्या व्यवसायामध्ये फायदा होऊ शकतो. भागीदाराकडून सहकार्याची भूमिका घेतली जाईल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. घरातील वयोवृद्ध मंडळींच्या आरोग्याची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. . आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. कलाकौशल्यची आवड निर्माण होईल. गायन-वादन करमणुकीच्या शिक्षणात रुची वाढेल. जुने येणे वसूल होऊ शकेल. या आठवड्यात वाहन चालवणे टाळा.

शुभ तारखा 30, 3, 4, 5

कर्क-मित्रमंडळीकडून उचित सहकार्य मिळेल

नवनवीन संकल्पना सुचतील. त्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न करा. विघ्नसंतोषी लोकांपासून आपण सावध राहवे. आर्थिक सुबत्ता येण्यासाठी या आठवड्यातील घडामोडी महत्त्वपूर्ण आणि निर्णायक ठरतील. तसेच सावकारी व्यवसाय किंवा पैशाच्या देवाणघेवाण व्यवहारात आपण जर काम करत असाल तर त्यात आपणास यश संपादन होईल. त्यातून आर्थिक उन्नती होऊ शकेल. जुने शरीरविकार असतील तर ते डोकेदुखी वाढवू शकतील. अशा विकारावर योग्यवेळी उपचार करणे आवश्यक आहे. मित्रमंडळीकडून उचित सहकार्य मिळेल. शुभ तारखा : 30, 3, 4

सिंह-शिक्षणासाठी योग्य काळ

घरगुती व्यवहाराकडे लक्ष द्यावे लागेल. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील. आपण घर घेण्याचा विचार करत असाल तर त्या कामी प्रगती दिसून येईल. वाहन खरेदीसाठी सध्या अनुकूल स्थिती नाही. शिक्षणासाठी योग्य काळ आहे. विद्यार्थी दशेतील मुलांना नवीन शिक्षण पद्धती सहज आणि सुलभ होईल. हितशत्रूंच्या विळख्यात अडकणार नाहीत याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात अत्यंत टोकाची भूमिका घेणे घातक ठरेल. जीवघेणी स्पर्धा टाळा. शुभ तारखा 1, 2, 5

कन्या-केलेल्या कामाची पोचपावती मिळेल

नोकरीमध्ये पदोन्नती संभवते. आपण केलेल्या कार्याची स्तुती होईल. उच्चपदस्थ व्यक्तींना सन्मानाने वागणूक मिळेल. आपण केलेल्या कामाची पोचपावती म्हणून सन्मान प्राप्त होऊ शकेल. परीक्षार्थी विद्यार्थ्यांना तारेवरची कसरत करावी लागेल. हितशत्रूंवर सहज मात करून त्यांच्या कल्पनेतील विश्वाला सहज कडा पाडू शकाल. आपण मांडलेल्या संकल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी अथक प्रयत्नांची आवश्यकता आहे. शुभ तारखा 1, 2, 5

तूळ-अचानक धनलाभ होऊ शकेल

कौटुंबिक सुखाची प्राप्ती होईल. कुटुंबातील महत्त्वाच्या जबाबदार्‍या अंगावर पडतील. छोट्यामोठ्या विकाराने मानसिक स्थैर्य ढासळू शकते. नवीन कामाचा निर्णय घेताना थोडं सांभाळून विचार करून घ्यावा. वाढीव कामाची जबाबदारी घेताना आपली शारीरिक क्षमता, आर्थिक क्षमता यांचा जरूर विचार करावा. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक उन्नती होईल. अचानक धनलाभ होऊ शकेल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरण्यासाठी अनुकूल वातावरण आहे. त्यासंबंधी सकारात्मक चर्चा होईल. शुभ तारखा 30, 31, 1, 2, 5

वृश्चिक-कर्ज घेण्याचे टाळावे

शेतकर्‍यांसाठी अत्यंत आनंददायी काळ राहील. शेतामध्ये अन्नधान्य चांगल्या पद्धतीने उगवल्याने चेहर्‍यावर आनंद उन्मळून येईल. हॉटेल व्यवसायात तेजी आणून देणारा हा आठवडा असेल. कर्ज घेण्याचे टाळावे. या आठवड्यामध्ये कोणत्याही प्रकारची गुंतवणूक रण्यासाठी अनुकूल स्थिती नाही. कौटुंबिक जीवनातील वातावरण आनंदी राहील. घरासाठी आवश्यक अशा नवीन चीजवस्तूंची खरेदी करू शकाल. आठवड्याच्या उत्तरार्धात आरोग्यविषयक काळजी घेणे आवश्यक आहे. छोटी मोठी शस्त्रक्रिया ठरली जाऊ शकते. शुभ तारखा - 30 जुलै ते 4 ऑगस्ट

धनू-सहलीचे आयोजन टाळा

सुरक्षित ठेवलेली रक्कम नित्य उपयोगासाठी खर्च करावी लागेल. पारिवारिक स्नेहसंबंध सुधारण्यास मदत होईल. नयनरम्य ठिकाणच्या सहलीचे आयोजन कराल, मात्र आत्ताच्या महामारी सारख्या भयंकर रोगाचा प्रसार टाळण्यासाठी याबाबतीत मनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक वाटते. सरकार दरबारी सन्मानाने सन्मानित होण्याचे योग आहेत. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. परदेशांत जाण्यासाठी प्रयत्नशील असाल तर या आठवड्यात आपल्या कामात प्रगती दिसून येईल. घर खरेदी सारखे विषय लवकरच मार्गी लागतील. शुभ तारखा 31 जुलै ते 5 ऑगस्ट

मकर-संततीविषयक समस्यांवर मात कराल

आर्थिक सुबत्ता येण्याचेे दिवस आहेत. वडिलोपार्जित धनदौलतीविषयी सुरू असलेली चर्चा सकारात्मक दिशेने पुढे जाईल. वडीलधार्‍या मंडळींसाठी आपणाकडून दिलासादायक कार्य घडेल. त्यांच्या वयाच्या सन्मान वाढेल असे कर्म घडू शकते. संततीविषयक असलेल्या समस्यांवर सहज मात करू शकाल. तीर्थक्षेत्राच्या यात्रा करण्याविषयी चर्चा होईल. वैज्ञानिक क्षेत्रामध्ये नवा किर्तीमान स्थापन करू शकाल. कुटुंबातील महत्त्वाच्या व्यक्तींची काळजी घ्यावी. शुभ तारखा 30, 3, 4, 5

कुंभ-आठवड्याचा उत्तरार्ध दिलासादायक

कामाचा तणाव अधिक राहू शकतो. आपण घेतलेल्या जबाबदार्‍या यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागतील. राजदरबारामध्ये किंवा आपल्या वरिष्ठांकडून आपल्या विचारांची पायमल्ली केली जाऊ शकते. आर्थिक विवंचना यामुळे पैशाची लालसा वाढू शकते. अशावेळी चुकीचे पाऊल पडणार नाही याबाबत काळजी घ्यावी. आठवड्याचा उत्तरार्ध दिलासादायक राहील. शिक्षणासाठी परदेशांत जाण्यासाठी प्रयत्न केल्यास त्यात यश संपादन होईल . रोगप्रतिकारशक्ती उत्तम राहील. शुभ तारखा 30, 31, 1, 2, 5

मीन-महत्त्वाचे निर्णय घेण्यास विलंब

उत्तम कल्पक-संशोधक बुद्धी वाढेल. मात्र विलासी वृत्ती वाढणार नाही याबाबत काळजी घ्यावी. लेखन, काव्य, गायन, वादन अशाप्रकारच्या शिक्षणासाठी अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये नवीन पदभार मिळण्याची शक्यता आहे. प्रेमीयुगुलांना मनावर संयम ठेवण्याची आवश्यकता आहे. हा काळ पर्यटन क्षेत्राशी संबंधित आपला व्यवसाय वाढविणारा असेल. प्रवासी वाहतूक किंवा तत्सम क्षेत्रांमध्ये आर्थिक लाभ होतील. आपण जर पदोन्नतीसाठी प्रयत्नशील असाल तर त्यासाठी मध्यस्थी किंवा तत्सम स्नेह वाढविणे गरजेचे वाटते. शुभ तारखा 30 जुलै ते 4 ऑगस्ट

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com