साप्ताहिक राशीभविष्य

26 जानेवारी ते 1 फेब्रुवारी 2023
साप्ताहिक राशीभविष्य
साप्ताहिक राशीभविष्यweekly Horoscope

मेष- आशादायक परिस्थिती जाणवेल प्रकृतीच्या तक्रारींकडेही लक्ष ठेवावे लागेल. नियोजनबद्धतेने प्रगती करता येईल.

कोणत्याही कामाचा दबाव न घेता ते काम तुम्ही हसत खेळत पार पाडाल. सभोवतालची परिस्थिती खूप आशादायक वाटेल. पण प्रत्यक्षात मात्र तुमची दगदग, धावपळ कमी होणार नाही. तुम्हाला करीयर, नोकरी व्यवसाय अथवा व्यक्तिगत जीवनात बरेच वेगवेगळे अनुभव येण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत सावधगिरी बाळगा. सकाारात्मक विचारांना मनात स्थान द्या. कोणतीही महत्त्वाकांक्षा न बाळगता जर काम मर्यादेत राहून केलेत तर त्रास होणार नाही.

शुभ तारखा : 28, 29, 30

वृषभ - परदेशात जाण्याची संधी कौशल्याला बराच वाव मिळाल्याने तुमचा भाव वधारेल. कलाकार खेळाडू व्यक्तींचा उदोउदो होईल. नोकरीत इतरांना न मिळणारी एखादी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. कामानिमित्त परदेशात फेरफटका करण्याची संधी मिळेल. व्यापार धंद्यात अपेक्षित व्यक्तींकडून तुमच्या विचारांना आणि योजनांना साथ मिळाल्याने कामाचा वेग अपेक्षेपेक्षा वाढेल. पैशाची आवक सुधारल्याने बाजारातील प्रतिष्ठा उंचावण्यासाठी विशेष प्रयत्न कराल. जमीन आणि इमारतीशी संबंधित कोणताही वाद न्यायालयात नेण्याऐवजी तो वाटाघाटीने सोडवण्याचा प्रयत्न करा. वैयक्तिक जीवनासोबतच नोकरी-व्यवसायातही सावधपणे पावले टाकावी लागतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर हे पाऊल उचलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करा.

शुभ तारखा : 30, 31, 1

मिथुन- आर्थिक लाभ होईल नोकरीमध्ये आवडत्या कामात सहभागी करून घेतले जाईल. विवाहाच्या प्रश्नात संदिग्धता असेल तर ती दूर होईल. चालत्या गाडीला खीळ बसल्यासारखी झाली असेल तर पुन्हा एकदा त्यात वेग येईल. आपले ग्रहमान सुधारले की सभोवतालच्या व्यक्तींचा आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही सुधारतो याचा अनुभव येईल. ्य वसायधंद्यातील नवे बेत आकार घेतील. जनसंपर्क आणि प्रसिद्धीमाध्यमांचा मुबलक वापर करून उलाढाल वाढवू शकाल. आरोग्यही सामान्य राहील. मात्र, आईच्या तब्येतीबाबत मन थोडे चिंतेत राहू शकते.

शुभ तारखा : 27, 28, 29

कर्क- नवीन कामाची सुरुवात मोठ्या व्यक्तींच्या ओळखींचाही उपयोग होईल. नोकरीमध्ये बेचव वाटणारे काम संपुष्टात आल्याने हायसे वाटेल. नवीन कामाची सुरुवात होईल. तुमच्या आनंदी आणि उत्साही स्वभावावर ज्या मर्यादा आल्या होत्या त्या संपल्याने तुमच्यात नवी उर्मी निर्माण होईल. प्रचंड वेगाने काम करण्याची इच्छा असेल. व्यवसाय धंद्यात तुमच्या मालाची किंवा सेवेची जाहिरात जर व्यवस्थितपणे केलीत तर फायदा वाढवता येईल. विवाहोत्सुक तरुणांना मनपसंत व्यक्तींची जीवनसाथी म्हणून निवड करता येईल.

शुभ तारखा : 30, 31

सिंह- उत्पन्नाची नवी साधने शोधा प्रकृतीच्या जुन्या तक्रारींवर उपाय मिळू शकेल. घरामध्ये पूर्वी लांबलेल्या शुभकार्याची नांदी होईल. ज्यांनी तुम्हाला सहकार्याचे ओशासन देऊन निराशा केली होती त्यांच्याकडून आता थोडीशी का होईना मदत मिळेल. बुडत्याला काडीचा आधार असे समजून त्याचा फायदा घ्या. व्यापार उद्योगात उत्पन्नाचे नवीन साधन शोधण्याचा विचार कराल. नोकरीमध्ये बराच तणाव देणारे काम आटोक्यात येईल. प्रवासादरम्यान तुम्हाला तुमच्या आरोग्याची आणि सामानाची खूप काळजी घ्यावी लागेल. या दरम्यान वाहन जपून चालवा, अन्यथा इजा होण्याची शक्यता आहे.

शुभ तारखा : 28, 30

कन्या - सर्वांना खूष ठेवाल नोकरीव्यवसायापेक्षा घरगुती जबाबदारीवर तुमचे लक्ष केंद्रीत होईल. जीवनाचा आनंद घ्याल. जीवन गतिमान बनेल. गुरू राशीच्या षष्ठस्थानात प्रवेश करेल. या स्थानातील गुरू प्रकृती आणि स्पर्धा या दोन्ही गोष्टींकडे लक्ष द्यायला भाग पाडतो. जर त्यासंबंधी काळजी घ्या. पुढील वर्षभर व्यापारीवर्गाने स्वत:ची मर्यादा सोडू नये. नोकरीत वरिष्ठांच्या आज्ञेत राहणे चांगले. घरगुती जीवनात सर्वाना खूश ठेवण्याची मनीषा पूर्ण होईल. घरातील नैतिक जबाबदार्‍या पूर्ण कराव्या लागतील. परदेशात नोकरी किंवा व्यवसाय करणार्‍यांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील. पैसा बाजारात किंवा सरकारी योजनेत अडकला असेल तर महिन्याच्या सुरुवातीला येऊ शकतो.

शुभ तारखा : 29

तूळ- व्यवसाय धंद्याचा विस्तार होईल नेहमीच्या कामाबरोबर कर्तव्यपूर्तीचा आणि जीवनाचा आस्वाद घेण्याचा आनंद अनुभवू शकाल. नोकरीमध्ये पगारवाढ आणि बढती मिळेल. ्याबरोबर कामाचा व्यापही वाढेल. व्यवसाय धंद्याचा विस्तार होईल. सांसारिक ीवनातील सुखद प्रसंगाची नांदी होईल. तरुणांचे विवाह जमून पार पडतील. नवविवाहितांच्या घरात पाळणा हलेल. विद्यार्थ्यांना चांगले यश मिळेल. अपत्यप्राप्तीमुळे तुमचा सन्मान वाढेल. आरोग्याच्या बाबतीत तुम्ही खूप सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हंगामी आजार टाळा

शुभ तारखा : 29, 30, 31

वृश्चिक - विद्यार्थ्यांनी आळस टाळा मनाप्रमाणे वागण्याचे समाधान लाभेल.घरामध्ये शुभकार्याच्या निमित्ताने पाहुण्यांची ये-जा राहील. कोणत्याही गोष्टीचा अतिविचार न करता येणार्‍या क्षणाचा जास्तीत जास्त फायदा कसा घेता येईल याचा विचार कराल. तरुणांना स्थिरता लाभून सांसारिक जीवनात पदार्पण होईल. नोकरी व्यवसायातील कामकाज सुरळीत चालल्याने शांतचित्ताने काम करू शकाल. स्वत:च्या वास्तूत राहावयास जाण्याचा योग येईल. विद्यार्थ्यांनी मात्र आळस करून चालणार नाही.

शुभ तारखा : 28, 30

धनू- परदेशात जाण्याचा योग नोकरीमध्ये नवीन जबाबदारीकरिता निवड होईल. त्याचे चांगले फायदेही मिळतील. परदेशात जाण्याचा योगही येईल. जबाबदारी आणि कामाचा तणाव इतका प्रचंड असेल की कधीकधी नको त्या सवलती असे वाटेल. घरामध्ये एखादी मोठी नैतिक जबाबदारी पार पाडावी लागेल. या आठवड़लात अनेक लांबलेली कामे तुम्ही संपवाल. अवघड उद्दिष्ट पार कराल.व्यापारातील कामाचा व्याप वाढेल.

शुभ तारखा : 30, 1

मकर- शुभकार्य ठरेल वास्तविक सहसा कोणतेही नवीन प्रयोग करून पाहणे तुमच्या तत्त्वात बसत नाही. पण या आठवड़लात अधिक यश अधिक पैसा मिळविण्याच्या इच्छेने काही नवे प्रयोग करून पहावेसे वाटतील. पूर्वीही तुमच्या आर्थिक आणि इतर स्वास्थ्यात त्याने चांगली भर टाकली होती. या आठवड़लात व्यापार उद्येगात खर्च वाढले तरी नवीन मोठे काम मिळण्याची आशा निर्माण होईल. घरामध्ये शुभकार्य ठरेल/पार पडेल.

शुभ तारखा : 26, 27

कुंभ-आर्थिक चिंता कमी होतील तुमच्यामध्ये एक रसिक व्यक्ती किंवा कलाकार दडलेला असतो. एखाद्या निमित्ताने ते तुम्ही प्रदर्शित करता तेव्हाच इतरांना त्याची जाणीव होते. या आठवड़लात अशी संधी मिळेल. व्यवसाय धंद्यात आर्थिक किंवा इतर चिंता निर्माण झाली असेल तर हितचिंतकांच्या मदतीमुळे ती कमी होईल. गरजा भागवण्याइतके पैसे हातात पडतील. पण फार मोठी मनोरथे रचू नका. गृहसौख्यात भर पडेल.

शुभ तारखा : 29, 30 , 1

मीन- मर्यादेत राहून काम करा प्रत्येक बाबतीत स्वत:वर निर्बंध ठेवणे आवश्यक आहे. त्यात चूक झाल्यास त्याचा आर्थिक आणि इतर स्वरूपात भुर्दंड सहन करावा लागेल. व्यक्तीगत जीवनातही सर्व काही चांगले दिसत असून एकप्रकारचे मानसिक असमाधान राहील. आपल्या मर्यादेत राहून काम करा. नोकरीमध्ये कामाचा वेग या आठवड़लात उत्तम राहील. आवडत्या छंदामुळे मजा येईल.

शुभ तारखा : 27, 29

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com