साप्ताहिक राशीभविष्य

11 ते 17 नोव्हेंबर 2021
साप्ताहिक राशीभविष्य
साप्ताहिक राशीभविष्यweekly horoscope

मेष

अप्रिय बातमी मिळू शकते

आठवड्याची सुरुवात काही प्रमाणात ओढाताण करणारी ठरेल. जवळच्या लोकांमध्ये मतमतांतरे दिसून येतील मात्र आपण आपल्या निर्णयावर ठाम रहाल. ठोस भूमिका मांडल्यामुळे समाजात सकारात्मक संदेश जाईल. दुरावलेली मंडळी पुन्हा जवळ येतील. पारिवारिक प्रेम वाढेल. आर्थिक सुबत्ता येईल. दूरच्या नातेवाईकाबद्दल अप्रिय बातमी ऐकायला येऊ शकतेे. प्राकृतिक स्थिती मध्यम राहील. साथीदाराबरोबर किंवा जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना चांगली बातमी मिळू शकेल. शुभ तारखा : 12, 15, 16

वृषभ

अपेक्षित यशाकडे वाटचाल

आठवड्याची सुरुवात सन्मानाने होईल. कीर्ती वाढेल. शैक्षणिक जीवनात अपेक्षित यशाकडे वाटचाल कराल. आध्यात्मिक उपासना -ध्यानधारणा याविषयीची ओढ तीव्र होईल. आर्थिक व्यवस्थापन करणे हिताचे ठरेल. कोणत्याही विषयाची शहनिशा केल्याशिवाय मत प्रकट करू नका. दीर्घकालीन परिणामांचा विचार -अभ्यास करूनच कोणतेही निर्णय करणे हिताचे ठरेल. प्रशिक्षणासाठी लाभदायक काळ आहे. आपल्या वाणीने कुणाच्या मर्मावर घाव तर घातला जात नाही ना याबाबत जागृत असावे. सात्विक भाव जागृत होईल. जमीन किंवा स्थावर मालमत्ता खरेदी करताना कागदपत्रांची नीट पडताळणी करूनच पुढील निर्णय घ्या. राजदरबारात मानमान्यता मिळेल. शुभ तारखा : 11, 12, 14

मिथुन

अनेक प्रश्न मार्गी लागतील

सकारात्मक वातावरण होत आहे. मनाला आनंद देणार्‍या गोष्टी ऐकायला मिळतील. सामोपचाराने अनेक प्रश्न मार्गी लागतील. श्रेयवादाच्या लढाईत बाजी मारून जाल. वडिलोपार्जित रूढी परंपरांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न करा. संततीविषयक प्रश्न मार्गी लागतील. नवा कीर्तिमान स्थापन करण्यात यशस्वी व्हाल. हितशत्रूंच्या कारवाया मानसिक तणाव वाढवणार्‍या ठरतील. न्यायालयीन कामकाजात प्रगती दिसून येईल. घर खरेदीसारख्या विषयात संयमाची आवश्यकता आहे.शुभ तारखा : 14, 15, 16

कर्क

परदेश वारी कराल

अडलेल्या कामांना गती मिळेल. सहकार्‍यांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. परदेश वारी कराल. नोकरी-व्यवसायात उंच भरारी घेण्यास सिद्ध व्हाल. कामाच्या पद्धतीमुळे जनसामान्यांच्या अपेक्षा वाढतील. काही कठोर निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. घर खरेदीसारखे निर्णय अंतिम टप्प्यात येतील. घरच्या सुशोभीकरणाच्या वस्तू खरेदी करू शकाल. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक आलेख चढता राहील.

शुभ तारखा : 16, 17

सिंह

भावंडांची साथ मिळेल

नवीन वर्षाच्या सुरुवातील वाहन चालवण्याचा अट्टाहास टाळा. मनातील विचारांना नियंत्रित ठेवण्याचा प्रयास करा. शाब्दिक चुका टाळण्याचा प्रयत्न करा. न्यायालयीन क्षेत्रात यशाच्या दिशेने वाटचाल कराल. वाहन खरेदीचे योग संभवतात. भावंडांची अपेक्षित साथ मिळेल. दैवी शक्तीवरील भाव दृढ करण्याची आवश्यकता आहे. पदोन्नतीसाठी प्रयत्न करीत असाल अथवा नवीन नोकरीच्या शोधात असाल तर लवकर यशस्वी व्हाल. मोलाचा सल्ला लाभल्याने मोठी हानी टाळली जाईल.शुभ तारखा : 13, 14, 15

कन्या

भागीदारीत फायदा

विवाह इच्छूकांसाठी अपेक्षित स्थळ येईल. विवाह नक्की होण्याची शक्यता आहे. भागीदारीत फायदा होईल. जवळच्या मित्रांच्या सहयोगाने अडकून पडलेल्या कामांना गती मिळू शकेल. कोणतेही नवीन पाऊल उचलताना काळजीपूर्वक उचला. आर्थिक गुंतवणूक करताना व्यावहारिक गणित मांडा. उसनवारी टाळा. राजदरबारात मानमान्यता मिळेल. जवळचे प्रवास कराल. सहलीला जाण्याचे योग आहेत. तीर्थयात्रा किंवा मंगल कार्यात सहभागी व्हाल. घरच्या सुशोभीकरणाच्या वस्तू खरेदी करू शकाल. जोडीदाराबरोबर चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल शुभ तारखा: 12, 15, 17

तूळ

मित्रांकडून साथ मिळेल

मनातील विचारास मूर्त रूप देण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. वडिलोपार्जित रूढी परंपरांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न करा. विरोधकांचा प्रतिकार करताना शाब्दिक युद्धजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. मित्र परिवाराकडून सहजभावाने साथ मिळेल. वृद्धांची काळजी घ्या. जुने आजार डोके वर काढण्याची शक्यता असल्याने काळजी घ्या. जुने येणे वसूल होण्याचे योग आहेत मात्र आलेला पैसा योग्य ठिकाणी गुंतवा.

शुभ तारखा: 15, 17

वृश्चिक

हितशत्रूंपासून सावध रहा

विविध विचारांना सोबत घेऊन यशस्वी वाटचाल कराल. हित शत्रूंपासून सावध असावे. कामकाजातील गुप्तता यशाच्या वाटेवर चालण्यास मदतगार ठरेल. आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल काळ नाही. सामाजिक स्थितीचे भान ठेवण्याची गरज आहे. मित्रपरिवाराचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवन आनंदी होईल. अतिविश्वास घातक ठरेल. शुभ तारखा : 14, 17

धनू

सात्विक भाव जागृत होईल

कौटुंबिक वातावरण सुखद राहील. मंगल कार्य ठरू शकतील. वाहन खरेदीचे योग संभवतात. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुकूल काळ आहे. अधिकारात वाढ होऊ शकेल. प्रशिक्षणासाठी लाभदायक काळ आहे. विद्यार्थ्यांंसाठी प्रगतिशील काळ आहे. आपल्या वाणीने कुणाच्या मर्मावर घाव तर घातला जात नाही ना याबाबत जागरूक असावे. सात्विक भाव जागृत होईल. शुभ तारखा : 13, 16

मकर

कागदपत्रांची पडताळणी करा

या आठवड्यात तुमच्या शौर्य आणि पराक्रमाच्या सर्वत्र चर्चा होतील. कीर्ती वाढेल. राजदरबारात सन्मान प्राप्त होतील. सामाजिक स्तरावर ेकेलेल्या कामाची पावती मिळाल्याचं आनंद प्राप्त होईल. दैवी शक्तीवरील भाव दृढ करण्याची आवश्यकता आहे. जमीन किंवा स्थावर मालमत्ता खरेदी करताना कागदपत्रांची नीट पडताळणी करूनच पुढील निर्णय घ्या. संततीकडून अपेक्षा पूर्ण झाल्याने आनंद द्विगुणित होईल. शुभ तारखा : 15

कुंभ

अर्थार्जनाच्या संधी मिळतील

पारिवारिक स्नेह वाढवणारा आठवडा आहे. अर्थार्जनाच्या संधी उपलब्ध होतील. नयनरम्य स्थळांच्या सहलीला जाण्याचे योग आहेत. नोकरीत पदोन्नती होईल. अधिकारी वर्गाकडून स्तुती केली जाईल. राजदरबारात मानसन्मानाने सन्मानित केले जाण्याची शक्यता आहे. न्यायालयीन कामकाजात प्रगती दिसून येईल. घर खरेदीसारख्या विषयात संयमाची आवश्यकता आहे. शुभ तारखा : 16, 17

मीन

आर्थिक स्थिती उत्तम

उच्च विचार सुचतील. हाती घेतलेल्या कामास सहकार्य करणारी मंडळी उभे राहतील. भागीदारांकडून साथ मिळेल. अनाकलनीय विचारांनी मन व्यतीत होण्याची शक्यता आहे. दिलेला शब्द पाळण्याची जबाबदारी टाळता येणार नाही. आर्थिक स्थिती उत्तम राहील. कर्तव्य पार पडताना पदाची गरीमा राखण्यासाठी भावना आडव्या येणार नाहीत याची काळजी घ्या. शुभ तारखा : 15, 17

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com