Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधसाप्ताहिक राशीभविष्य

साप्ताहिक राशीभविष्य

मेष- जुन्या आजारापासून सुटका

महिन्याची सुरूवात तर चांगली असेल, पण महिन्याच्या शेवटी काही समस्या भेडसावू शकतात. शत्रू त्रास देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतील पण त्यांना यश येणार नाही. खर्च अधिक होईल, ज्यामुळे धनसंचयात अडचण निर्माण होईल. नशीब बलवत्तर आहे. नवे वाहन खरेदी करू शकता. एखाद्या जुन्या मित्राची अचानक भेट होणे शक्य आहे. ही भेट फायदेशीर ठरेल. जुन्या दुर्धर आजारापासून सुटका मिळण्याचा योग आहे. कोणालाही उधार देण्यापासून सावध राहा नाहीतर ते परत मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.

- Advertisement -

शुभ तारखा : 23, 24, 25

वृषभ – मंगलकार्य ठरेल

व्यवहारांची माहिती, महत्त्वाची कागदपत्रे षष्ठात शनी राहू असल्याने जाहीर करू नका. शत्रूंपासून दूर ठेवा. यामधून प्राप्ती ते प्रतिष्ठा यामधील प्रश्न वेगाने सोडवता येतील. अचानक मंगलकार्य ठरेल. गुरू हर्षल केंद्रयोगातील चमत्कारिक प्रतिक्रियांनी विचलित होऊन कार्यमार्ग बदलण्याची आवश्यकता नाही. नोकरी उद्योगाचे नवे वेळापत्रक तयार होईल. पैसा मिळेल, नवे परिचय, नव्या उपक्रमांत उपयुक्त ठरतील. ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे लागेल. विद्यार्थ्यांनी शॉर्टकट टाळावा. आरोग्याची काळजी घ्या. व्यापारी व्यवसायात वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा.

शुभ तारखा : 25, 26

मिथुन- संगीतकलेतून अर्थप्राप्ती होईल

राजकारण, शिक्षण, कला प्रांत, व्यापारी सौदे, दूरचे प्रवास, महत्त्वाचे करार यांचा समावेश या सप्ताहात करता येईल. आरोग्याकडे मात्र दुर्लक्ष करू नका. काही प्रांतातील प्रभाव प्रगतीच्या नव्या प्रवासाला उपयुक्त ठरू शकतो. पराक्रमी शुक्र कला संगीतात उत्साहाचा आहे. त्यातून अर्थप्राप्ती वाढते. रवी हर्षल नवपंचम योगामुळे अवघड प्रकरण मार्गी लावता येतात. परंतु विचार ते कृती यांना प्रलोभनापासून मात्र दूर ठेवा. कोणावरही विसंबून न राहता स्वत: कंबर कसून काम करावे लागेल. विद्यार्थ्यांनी तणावातही आपले मन शांत ठेवावे.

शुभ तारखा : 26, 27

कर्क- शेतीतून चांगले उत्पन्न

भौतिक साधनांवर निरर्थक पैसे खर्च होण्याची चिन्हे दिसत आहेत. लक्षात असू द्या, क्रोध सगळ्यात आधी तुमचे नुकसान करतो, म्हणून रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. बाहेर खाणे टाळा, नाहीतर आरोग्यावर याचे वाईट परिणाम दिसून येतील. तुमच्या हुकूमशाही वागण्यामुळे तुम्हाला विरोधाचा सामना करावा लागेल. काही नवे सुरू करणे टाळा. वरिष्ठ अधिकारी तुमच्यावर नाराज होऊ शकतात. गुंतवणूक करण्याआधी जाणकारांचा सल्ला घ्या.

शुभ तारखा : 24, 25, 26

सिंह- अडकलेले धन परत मिळेल

नव्या लोकांच्या ओळखी होतील, ज्या पुढे लाभदायक ठरतील. नोकरीसाठी एखाद्या नव्या शहरात जाऊ शकता. अकलेले धन परत मिळेल. जोडीदार तुमच्यासाठी पर्वतासमान सिद्ध होईल. जोडीदाराचे तुमच्याप्रतीचे वागणे साहाय्यकारी असेल. स्पर्धेला घाबरू नका, त्याचा आनंद लुटा. मग पाहा काम करताना किती मजा येते ती. धार्मिक कृत्यांप्रती रूची वाढवा. कोणीतरी जुना साथीदार किंवा नातेवाईक सुदैवाने भेटू शकतील. बदलत्या वातावरणाने आजारी पडण्याची लक्षणे आहेत, सावध राहा. चिकित्सकाजवळ जाणे तुमच्यासाठी उत्तम ठरेल. जोडीदाराचे तुमच्याप्रतीचे वागणे सहाय्यकारी असेल.

शुभ तारखा : 24, 25, 26

कन्या – मिळकतीचे नवे मार्ग उघडतील

जीवनात काहीतरी नवे होणार आहे. वाटेत काही अडचणी येतील पण तुम्ही त्या पार कराल. कुटुंबात वातावरण ठीकठाक राहील. यात्रेचा लाभ होईल. नव्या संबंधांचा फायदा होईल. ऑफिसमध्ये सह-कर्मचारींचे वागणे सहाय्यभूत ठरेल. कुठे तरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. जोडीदारासोबत खास क्षण घालवू शकाल. विदेश प्रवासाचा योग आहे. मिळकतीचे नवे मार्ग खुलतील. तुमचे शांत चित्त तुम्हाला अनेक त्रासांपासून वाचवेल. जोडीदाराची साथ मिळेल. अपत्यांकडून चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागेल.

शुभ तारखा : 27, 28

तूळ- मिळकतीचे नवे मार्ग उघडतील

जीवनात काहीतरी नवे होणार आहे. वाटेत काही अडचणी येतील पण तुम्ही त्या पार कराल. कुटुंबात वातावरण ठीकठाक राहील. यात्रेचा लाभ होईल. नव्या संबंधांचा फायदा होईल. ऑफिसमध्ये सह-कर्मचारींचे वागणे सहाय्यभूत ठरेल. कुठे तरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. जोडीदारासोबत खास क्षण घालवू शकाल. विदेश प्रवासाचा योग आहे. मिळकतीचे नवे मार्ग खुलतील. तुमचे शांत चित्त तुम्हाला अनेक त्रासांपासून वाचवेल. जोडीदाराची साथ मिळेल. अपत्यांकडून चांगली बातमी समजेल. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागेल.

शुभ तारखा : 27, 28

वृश्चिक- कौटुंबिक वाद टाळा

स्वास्थ्य ठीक-ठाक राहील. जोडीदाराची साथ मिळेल. तुमच्या बोलण्याचा मान राखला जाईल. धार्मिक कार्यात आवड वाढेल. तब्येत ठीक करण्यासाठी सकाळी फिरायला जावे. विद्यार्थ्यांसाठी प्रतिकूल वेळ. मनासारखी स्थळं न मिळाल्याने निराशा राहील. वडील आणि भावाशी वाद होतील. वाहन चालवताना अति-दक्ष राहण्याची आवश्यकता आहे. मद्यपान करताना संयम ठेवा. यश टिकवण्यासाठी आळसाचा त्याग करणे आवश्यक आहे.

शुभ तारखा : 23, 24, 25

धनू- जास्त भांडवलआर्थिक बाजू ठीक राहील

मेहनतीचे आणि चिकाटीचे फळ तुम्हाला नक्की मिळेल. नवे वाहन किंवा घर वगैरे खरेदी करु शकता. मित्र प्रत्येक अडचणीत तुमची साथ देतील. सासरच्या लोकांकडून साहाय्य मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील. कम्प्यूटर व्यवसायाशी संबंधित लोकांसाठी वेळ चांगली असणार आहे. शत्रूंची प्रत्येक चाल अयशस्वी ठरेल. विद्यार्थ्यांसाठी चांगली वेळ आहे. मनासारखे फळ मिळेल. शत्रू प्रयत्न करतील, पण त्यांना तुमचे नुकसान करता येणार नाही.

शुभ तारखा: 27, 28

मकर- भौतिक सुखांमध्ये वृद्धी

भौतिक सुखांमध्ये वृद्धी होईल. मिळकतीचे नवे मार्ग उघडतील. नोकरी किंवा व्यवसाय संबंधाने शहराच्या बाहेर जाण्याचे योग आहेत. जुन्या समस्या निरोप घेण्याच्या मार्गावर आहेत. नव्या संपर्कांचा फायदा होईल. भौतिक सुखांमध्ये वृद्धी होईल. मिळकतीचे नवे मार्ग उघडतील. नोकरी किंवा व्यवसाय संबंधाने शहराच्या बाहेर जाण्याचे योग आहेत. जुन्या समस्या निरोप घेण्याच्या मार्गावर आहेत.

शुभ तारखा : 24, 26

कुंभ- धनप्राप्तीचे योग

शत्रू तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करतील. व्यापार-संबंधित लोकांना नुकसान होऊ शकते. असे झाले तरी तुम्हाला वरिष्ठ लोकांचे आणि कुटुंबातील मोठयांचे भरपूर साहाय्य मिळेल. नकोसे खर्चही वाढू शकतात. नव्या जबाबदार्‍या मिळू शकतात. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मिळकतीचे स्त्रोत वाढतील. धनप्राप्तीचे योग आहेत. सामाजिक कार्यात तुम्ही सतत तत्पर राहाल.

तारखा : 23, 25, 26

मीन- स्वास्थ्य उत्तम राहील

आई-वडीलांच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष द्या. स्वास्थ्य उत्तम राहील. कोणतेही नवे काम करण्याआधी त्याच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करा. नोकरीत त्रास होईल. आर्थिक स्तरावर त्रासात राहू शकता, रागात स्वतःचे नुकसान करुन घ्याल. जुना साथीदार किंवा नातेवाईक सुदैवाने भेटू शकतील. इतर लोक तुमचा राग तुमच्या विरुद्धच हत्यारासारख्या वापरण्याची शक्यतो आहे.

शुभ तारखा : 25, 28

- Advertisment -

ताज्या बातम्या