साप्ताहिक राशीभविष्य

22 ते 28 डिसेंबर 2022
साप्ताहिक राशीभविष्य
साप्ताहिक राशीभविष्य weekly horoscope Bhavishyavedh

मेष- आर्थिकदृष्ट़्या अनपेक्षित फळ

व्यावसायिक भागीदारीत फायदा होईल. मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. थोड्या प्रमाणात वैचारिक घालमेल होऊ शकते. नोकरीसाठी प्रयत्न करीत असाल तर यशस्वी व्हाल. आर्थिकदृष्ट़्या अनपेक्षित असे फळ मिळेल. राजकीय क्षेत्रात वर्चस्व राहील. सामाजिक स्तरावरील बदल लक्षात घ्या. ओळखीचा फायदा करून घ्याल. मित्रांसोबत वेळ घालवाल. नातेवाईकांशी सलोखा वाढेल घर खरेदी करू शकाल. भावनांना ठेच लागू शकेल. कर्ज वाढणार नाही याची काळजी घ्या. नेत्रविकार होऊ शकतात.

शुभ तारखा : 26, 27

वृषभ -स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागेल

शारीरिक स्थिती नाजूक बनेल. वैद्यकीय उपचार घेतल्याने बरे वाटेल. हितशत्रूंच्या कारवाया त्रस्त करतील. भागीदारीत विचारपूर्वक गुंतवणूक करा. राजकीय क्षेत्रात सतर्क रहावे लागेल. वैचारिक मतभेद दूर ठेवा. प्राकृतिक कारणाने आत्मसंयम ढासळण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही विषयांवर व्यक्त केलेले मत फायदेशीर मार्गावर घेऊन जाणारे ठरेल. संततीविषयक प्रश्न मार्गी लागतील. शिक्षण क्षेत्रात उन्नती कराल. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील. आरोग्याच्या तक्रारीत वाढ होईल. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल. अनुकूल काळ आहे. न्यायालयीन कामकाजात यश मिळेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच चांगले ठरेल. अंतिम चरणात सभोवतालीन परिस्थिती थोडी प्रतिकूल राहील. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. द्विधा मनस्थिती होईल. मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल.

शुभ तारखा : 25, 26, 28

मिथुन- अतिविश्वास घातक ठरेल

संततीविषयक प्रश्न मार्गी लागतील. शिक्षणक्षेत्रात उन्नती कराल. व्यापार उद्योगात फायदा होईल. संततीविषयक प्रश्न मार्गी लागतील. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल. चांगले विचार जीवनात प्रगतीकडे घेऊन जातील. कौटुंबिक जीवनात आनंदी व्हाल. अडकलेले धन अथवा तत्सम व्यवहार सुरळीत होण्यासाठी अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये संधी उपलब्ध होतील. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिध्द होऊन मानसिक आनंद वाढीस लागू शकेल. शैक्षणिक क्षेत्रात यशाकडे वाटचाल कराल. राजकीय क्षेत्रात अतिविश्वास घातक ठरेल. न्यायालयाची पायरी चढणे धोक्याचे ठरेल.

शुभ तारखा : 23, 24

कर्क- कौटुंबिक वातावरण आनंदी

नोकरीमध्ये संधी उपलब्ध होतील. घरातील शोभेच्या अथवा चैनीच्या वस्तू खरेदी कराल. जवळचे प्रवास घडतील. शैक्षणिक क्षेत्रात यशाकडे वाटचाल कराल. आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. न्यायालयाची पायरी चढणे धोक्याचे ठरेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. शैक्षणिक जीवनात उत्तमप्रकारे यशाच्या वाटेेने वाटचाल सुरू कराल. वाणीवर प्रभुत्व वाढेल. आर्थिक टंचाईचा सहसा सामना करावा लागणार नाही. इतरांवर अवलंबून कोणतीही गोष्ट साध्य होत नाही हा अनुभव विसरू नका.

शुभ तारखा : 23, 24, 25

सिंह- मिळते जुळते घ्या

सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक व्यवहार सांभाळून करावेत. नेत्र विकार वाढू शकतात. पारिवारिक संबंध सुधारतील. वाहन खरेदीचे योग आहेत. गायन कलाविषयक स्वारस्य अधिक वाढेल. कौटुंबिक विषय चव्हाट्यावर येणार नाहीत याची काळजी घ्या. मनातील विचारांना योग्य दिशा मिळाल्याचा मनोमन आनंद उपभोगाल. धर्मप्रचारक किंवा धार्मिक विषयाचा अभ्यास या दोन्ही गीष्टींकडे कल वाढेल. स्पर्धात्मक गोष्टींच्या मागे लागू नका. नोकरदार वर्गाला कामाच्या बाबतीत मिळतेजुळते घ्यावे लागेल. व्यवसायाच्या माध्यमातून अनेक व्यक्तींशी संपर्क वाढेल.

शुभ तारखा : 27, 28

कन्या - विचारपूर्वक खर्च करा

दीर्घकाळासाठी फायदा होईल असे निर्णय घ्याल. वैचारिक पातळीवर मनस्वी आनंदी रहाल. कौटुंबिक जीवनात चढ उतार अनुभवायला मिळतील. मित्रांकडून जास्त अपेक्षा करणे घातक ठरेल. न्यायालयीन कामकाजात यश मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. द्विधा मनस्थिती होईल. मित्रांचा सल्ला उपयोगी ठरेल. विवाह इच्छूकांचे विवाह ठरतील. कौटुंबिक जीवनात आनंदी व्हाल. जे काही करायचे असेल, ते स्वत:च्या निर्णयावर करा. इतरांनी दिलेले मदतीचे आश्वासन ते पूर्ण करण्यास असमर्थ स्थितीत असाल. आर्थिकदृष्ट़्या खर्च करताना विचारपूर्वक पाऊल उचलले पाहिजे. कौटुंबिक वाद टाळा. आरोग्याकडे लक्ष द्या.

शुभ तारखा : 24, 27

तूळ- आर्थिक आवक वाढेल

ठोस निर्णय घेण्यात अग्रेसर राहाल. तात्विक मतभेद दूर ठेवावेत. इतरांनी केलेल्या आरोपापासून स्वतःचा सहज बचाव करू शकाल. व्यवसायात विविध उत्पादने विक्री करून फायदा वाढवू शकाल. परदेश गमन योग संभवतो. हितसंबंध जोपासण्यात यशस्वी व्हाल. आनंदी रहाल. शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी बजावाल. क्रीडा क्षेत्रात यश संपादन कराल. वातावरण उत्साहवर्धक राहील. सामाजिक मान-सन्मान वाढेल. प्रत्येकवेळी मन मारून मर्यादित गोष्टी कराव्या लागत होत्या, त्या आता कराव्या लागणार नाहीत.

शुभ तारखा : 26, 27

वृश्चिक - आर्थिक स्थितीचा चढता आलेख

आर्थिक खर्च वाढेल. काही प्रमाणात चुकीचे निर्णय होऊ शकतात. आठवड्याच्या मध्यात मानसिक स्थिती सुधारेल. भागीदाराकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. पारिवारिक संबंध सुधारतील. नोकरदार वर्गाला महत्त्वाची जबाबदारी स्वीकारताना फार कष्ट करावे लागणार नाहीत. आर्थिक स्थितीत चढता आलेख अनुभव कराल. संततीकडून समाधान मिळेल वडिलोपार्जित परंपरांचा सन्मान राखल्याने आत्मिक समाधान प्राप्त होईल.

शुभ तारखा : 23, 24, 26

धनू- संततीविषयक प्रश्न मार्गी लागतील

आर्थिक बाजू कमजोर होण्याची शक्यता आहे, काळजीपूर्वक नियोजन करावे. प्राकृतिक कारणाने अस्वस्थता जाणवेल. हितशत्रूंचा त्रास मनाला बेचैन करील. व्यावहारिक जगापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. कामामध्ये प्रगती होईल. व्यापार उद्योगात फायदा होईल. संततीविषयक प्रश्न मार्गी लागतील. वडिलोपार्जित परंपरांचा मान राखाल. जवळचे प्रवास घडतील. शिक्षण क्षेत्रात उन्नती कराल. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागेल.

शुभ तारखा : 22, 23

मकर- आर्थिक लाभ वाढतील

सौख्य प्राप्तीचा काळ आहे. कामकाजाला नवीन दिशा मिळतील. घर खरेदीचा निर्णय होऊ शकेल. वडीलधार्‍या व्यक्तींकडून प्रशंसा होईल. आर्थिक लाभ वाढतील. शैक्षणिक ध्येयधोरणे ठरवू शकाल. कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रयत्नशील रहा. नवीन व्यवसाय सुरु करणार्‍या मंडळींचा आत्मविश्वास वाढेल अशी ग्रहस्थिती आहे. कौटुंबिक जीवनात वातावरण आनंदाचे राहील.

शुभ तारखा : 24, 27

कुंभ - इतरांना मदतीचा हात द्याल

परदेश गमन योग्य संभवतात. भाग्योदयासाठी उपयुक्त वातावरण तयार होईल. भावंडाची योग्य साथ मिळेल. नवीन कामकाज सुरु करण्यासाठी अनुकूल काळ आहे. ठोस निर्णय घेऊ शकाल. मनातील विचार साकार करण्यात यशस्वी व्हाल. मनातील विचारांना योग्य दिशा मिळाल्याचा मनोमन आनंद उपभोगाल. नकारात्मक विचार प्रदर्शित केल्याने नुकसान वाढू शकते.

शुभ तारखा : 26, 28, 29

मीन- थोरांचे निर्णय लाभदायक

मानसिक विचलितपणा जाणवेल. चुकीचे निर्णय होणार नाहीत याची काळजी घ्या. दूरचे प्रवास टाळा. न्यायालयीन कामकाजात यश मिळेल. वैवाहिक जीवनात आनंद प्राप्त होईल. व्यावसायिक वृद्धी होऊ शकेल. थोरांचे निर्णय लाभदायक ठरतील. पोटदुखीसारखे विकार त्रासदायक ठरतील. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेचे प्रश्न मार्गी लागतील.

शुभ तारखा : 26, 28

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com