साप्ताहिक राशीभविष्य

7 ते 13 ऑक्टोबर 2021
साप्ताहिक राशीभविष्य

मेष

नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील

पूर्वी घेतलेली कर्जे, कामगारांचे प्रश्न आणि बाजारातील घडामोडी यावर मात करण्यासाठी वर्षभर सतर्क राहावे लागेल. स्वत:ची मर्यादा ओलांडू नका. कामानिमित्ताने नवीन हितसंबंध प्रस्थापित होतील. प्रवास घडेल. परदेशवारीही करण्याची शक्यता आहे. गुरूचे पाठबळ चांगले लाभल्यामुळे छंद व व्यासंग जोपासून घरात खेळकर वातावरण ठेवता येईल. इतर ग्रहांची फारशी साथ नसल्यामुळे त्याचा तुम्हाला पुरेपूर आनंद घेता येणार नाही कर्जाचा बोजा वाढवू नका. मुलांकडून सुखद वार्ता कळेल.

शुभ तारखा : 8,9,10

वृषभ

अधिकारात वाढ

नोकरदार व्यक्तींना एखादी चांगली संधी उपलब्ध होईल. त्यांच्या कौशल्याला मागणी राहील, पण मोबदल्याविषयी खात्री नसल्यामुळे कामात फारसे लक्ष नसेल. त्यानंतर एखादी मोठी जबाबदारी किंवा प्रकल्प हाताळण्याची संधी मिळेल. त्याचा चांगला उपयोग होईल. त्यानिमित्ताने विशेष सवलती मिळतील. आर्थिकदृष्टया जरी महिना साधारण गेला तरी तुमच्या अधिकारात वाढ होईल. इंजिनियर, शास्त्रीय शाखेत काम करणार्‍या मंडळींना एखादी सुंदर कल्पना सुचून ते आपले नैपुण्य सिद्ध करतील. प्रकृतीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे. महिलांना हाडांशी संबंधित समस्या असू शकतात. रागावर नियंत्रण ठेवा. महिला धार्मिक कार्यात अधिक वेळ घालवतील.

शुभ तारखा : 8, 9, 12

मिथुन

नोकरीत अपेक्षित कामे होतील

कारखानदारांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पैसे किंवा गुंतवणूक करावी लागेल. जादा पैशाच्या मोहाने अयोग्य व्यक्तींशी संगत करून नका आणि बेकायदेशीर कामांपासून लांब रहा. नोकरीत अपेक्षित कामे होतील. पगारवाढ, बढतीची शक्यता आहे. जुनी आर्थिक येणी वसूल होतील. तुमच्याच कामाच्या व्यवधानामुळेच सांसारिक जीवनाला म्हणावा तसा न्याय देऊ शकणार नाही. या दरम्यान घरात नवीन बालकाचे आगमन होण्याची शक्यता आहे. प्रकृतीची कुरबूर राहील. मुलांकडून सुर्वाता कळेल. एकंदरीत सकारात्मक दृष्टिकोन राहील. आर्थिक चिंता मिटेल.

शुभ तारखा : 10, 12, 13

कर्क

अतिश्रमामुळे प्रकृतीवर परिणाम होईल

देशात किंवा परदेशात नवीन शाखा उघडून कामात नोकरदार व्यक्तींना त्यांचे कौशल्य पणाला लावून उत्तम कामगिरी करता येईल. संस्थेच्या गरजेनुसार वेगवेगळ्या पद्धतीचे काम हाताळण्याची संधी मिळेल. अतिश्रमामुळे प्रकृतीवर परिणाम होईल. महिला आपली जबाबदारी उत्तम पार पाडू शकतील. विद्यार्थ्यांना उत्तम यश मिळेल. कौटुंबिक सुखाच्या दृष्टीने वर्ष चांगले आहे. लांबचा प्रवास, घरातील शुभकार्य, खरेदी यातून जीवनाचा एक वेगळा आनंद मिळेल.

शुभ तारखा : 10, 11

सिंह

नवीन वास्तूचा विचार यशस्वी

वाढत्या खर्चामुळे पैसे हातात शिल्लक राहणार नाही. त्यानंतर पैसे मिळतील, पण ते नवीन गुंवणुकीकरिता वापरावे लागतील. सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील व्यक्तींना अधिक मान, प्रतिष्ठा प्राप्त होईल. विवाहोत्सुक तरुणांना हा महिना अनुकूल आहेत, पण त्यांनी निर्णय घाईने घेऊ नये. महिला जबाबदारी समर्थपणे पार पाडतील. तरुणांनी महिन्यात विवाहाच्या प्रश्नावर शिक्कामोर्तब करावे. यंदा नवीन वास्तूचा, स्थावरचा विचारही यशस्वी होईल. वरिष्ठ व घरातील अनुभवी व्यक्तींशी संघर्ष करू नये. तुमच्या हातून काही घरगुती जबाबदार्‍या पार पडतील.

शुभ तारखा : 11, 13

कन्या

करिअरमधील प्रगती उत्तेजित करेल

मुलांची अभ्यासातील प्रगती चांगली असेल. उच्च शिक्षणाकरिता किंवा कामाकरिता ज्यांना देशात अथवा परदेशात जायचे असेल त्यांना संपूर्ण महिना चांगला आहे. तरुणांना करिअरमधील प्रगती उत्तेजित करीत राहील. कौशल्य वाढविण्याकरिता त्यांना प्रशिक्षण घ्यावेसे वाटेल. गुरुचे भ्रमण दशमस्थानात आणि लाभस्थानात असल्यामुळे वैवाहिक जीवनातील गृहसौख्याच्या कल्पना दिवसेंदिवस वाढतच राहणार आहेत. घरातील वयोवृद्ध व अनुभवी मंडळीबरोबर संघर्ष न करता खेळकर दृष्टिकोन ठेवून मिळेल ते पदरात पाडून घ्याल.

शुभ तारखा: 8, 9, 10

तूळ

मनपसंत जीवनसाथी मिळेल

नवीन करार करताना बेसावध राहू नका. नोकरदार व्यक्तींच्या बर्‍याच वर्षाच्या इच्छा-आकांक्षा साकार करणारा महिना आहे. हात आखडता घेणे चांगले. ज्या मुलांना उच्च शिक्षणाकरिता किंवा नोकरीनिमित्त परदेशात जायचे आहे, त्यांना हा महिना विशेष चांगला आहे. विवाहत्सुक तरुणांना मनपसंत जीवनसाथी निवडता येईल, त्याचे विवाहत रुपांतर एप्रिल महिन्यात होईल. नवविवाहितांच्या घरी एखादी सुखद बातमी कळेल. नवीन व्यक्तींशी मैत्री झाल्यामुळे जीवनामध्ये बहार येईल. शुभ तारखा: 9, 10, 12

वृश्चिक

व्यवसायात अपेक्षित नफा

प्रकाशक व लिखाण क्षेत्रातील लोकांना चांगली प्रसिद्धी मिळेल. घरामध्ये शांतता टिकवून ठेवण्यासाठी सारासर विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे. नवीन लोकांच्या संपर्कांचा फायदा मिळेल. कामाच्या ठिकाणी महत्वपूर्ण आणि अनुभवी व्यक्तीच्या मदतीने आपण चांगले उत्पादन देऊ शकाल. मित्राशी किंवा कुटूंबाबद्दल असलेला कायमचा असंतोष दूर होईल. आठवड्याच्या मध्यभागी आपण आपल्या स्वभावात चिडचिडेपणा आणि एखाद्या गोष्टीबद्दल ताणतणावात रहाल. शुभ तारखा : 12, 13

धनू

आनंददायी घटना घडेल

नोकरदार व्यक्ततींना ज्यांना पदोन्नती किंवा जादा पगारवाढ पाहिजे असेल, त्यांना मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल. महिला शिक्षण व कला क्षेत्रात आघाडीवर राहतील. आला दिवस हसून साजरा कराल. याच दरम्यान घरातील सदस्य आणि त्यांच्या जीवनातील काही चांगले क्षण बघायला मिळतील. एखादी चांगली घटना घडल्याने घरात वातावरण प्रसन्न राहील. घरात नव्या पाहुण्याची भर पडेल. विद्यार्थ्यांना स्पर्धा व शर्यतीत आघाडीवर राहता येईल. शुभ तारखा : 8, 12, 13

मकर

मानसिक अस्वस्थता जाणवेल

या आठवड्यात परदेशात जायचे आहे अशा मुलांकरिता आईवडिलांना पैशाची बरीच मोठी तरतूद करावी लागेल. तरुण-तरुणींनी प्रेमसंबंधात अति घाई संकटात नेईल हे लक्षात ठेवावे. विवाहोत्सुक तरुणांना हा महिना अनुकूल आहेत, पण त्यांनी निर्णय घाईने घेऊ नये. या महिन्यात प्रकृतीच्या तक्रारी अगर अन्य कारणाने मानसिक अस्वस्थता जाणवेल. मात्र, काळजीचे कारण नाही. शुभ तारखा : 8, 10, 12

कुंभ

वृद्धांच्या अनुभवाचा फायदा घ्या

नोकरीमद्ये संस्थेकडून या महिन्याच्या सुरुवातीला बरेच प्रोत्साहन मिळेल. पगारवाढ किंवा नवीन भत्ते मिळतील. चांगल्या प्रोजेक्टकरिता निवड होईल, परंतु त्यानंतर मात्र कामाचा तणाव खूपच वाढेल. प्रॉपर्टी किंवा घरामधले बराच काळ रेंगाळत पडलेले प्रश्न असतील तर तडजोडीतून सुवर्णमध्य काढा. विवाहोत्सुकांना कौटुंबिक जीवनात पदार्पण करता येईल. यंदा तुमच्या हातून काही घरगुती जबाबदार्‍या पार पडतील. वृद्धांच्या अनुभवाचा फायदा करून घ्यावा. शुभ तारखा : 11, 12, 13

मीन

बदली आणि बढतीची शक्यता

महत्त्वाकांक्षी व धाडसी तरुण मंडळींनी आपले बस्तान नीट बसवून घ्यावे. त्यांना व्यवसायाची नवीन दालने खुली होतील. फायदा करून घ्यावा. बदली आणि बढतीची शक्यता आहे. कौटुंबिक सौख्याचा दृष्टीने वर्ष आव्हानाचे आहे. वास्तूची कल्पना साकार व्हावी. विवाहेच्छूक, होतकरू तरुण मंडळींचे शुभमंगल ठरावे. विद्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती मात्र साधारण राहील. शुभ तारखा : 8, 9, 10

Related Stories

No stories found.