साप्ताहिक राशीभविष्य

21 ते 27 एप्रिल 2022
साप्ताहिक राशीभविष्य
साप्ताहिक राशीभविष्यweekly horoscope

मेष- नशीबाची साथ मिळेल

पारिवारिक संबंधांमध्ये तणाव येण्याची शक्यता आहे. नशिबाचा साथ मिळणार आहे. कामे सहज होतील. राजकारणी लोकांना पाठिंबा मिळेल. मन उल्हसित होईल. मुलांवर खर्च होईल. कौटुंबिक प्रश्नांची उत्तरे मिळतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. एखाद्या विशिष्ट व्यक्तीशी आपले संबंध चांगले राहतील. महत्त्वाकांक्षा पूर्ण करू शकाल. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. समाजात प्रतिष्ठित पद मिळू शकतो. नोकरदार कामात व्यस्त राहतील. स्त्री पक्षाचा आधार राहील. आई वडिलांचे आरोग्य उत्तम असल्यामुळे तुमच्या मनाला बरं वाटेल.

शुभ तारखा : 22, 23

वृषभ - स्वप्न साकार होतील

जीवनात थोडे ताण तणाव राहण्याची शक्यता आहे. तुमचे सर्व स्वप्न या आठवड्यात साकार होणार आहे, असे संकेत दिसून येत आहे. घरगुती बाबतीत अधीरता टाळा. यथायोग्य विचार करून कार्य करा. निष्कारण प्रश्नांचा त्रास राहील. आरोग्याची काळजी घ्या. व्यापार व्यवसायात वेळ साधारण राहील. देवाण-घेवाण टाळा. व्यवसायात शत्रुपक्ष वर्चस्व साधण्याचा प्रयत्न करेल. उत्पादनाच्या गुणवत्तेत कुठल्याही प्रकारचा करार करू नये. व्यवसायात व्यस्ततेमुळे तुम्ही कुटुंबाला पूर्ण वेळ देऊ शकणार नाही. या वेळेस शासकीय विभागाकडून तुम्हाला व्यवसाय संबंधी नोटिस मिळू शकतो. नोकरी करणार्‍या लोकांची तर्क शक्ती बरीच चांगली राहणार असल्यामुळे उच्च अधिकारी देखील प्रभावित होतील.

शुभ तारखा ः 24, 25, 26

मिथुन-आर्थिक लाभ होण्याची शक्यता

स्वतःच्या भावनांवर काबू ठेवण्याचा प्रयत्न करा.मजा मस्तीत धन खर्च कराल. आठवड्याच्या सुरुवातीत तुम्ही कौटुंबिक बाबींवर तुम्ही जास्त लक्ष्य देऊ शकणार नाही. देश किंवा परदेशातील यात्रा घडू शकते. वाहन चालवताना सावधगिरी बाळगणे गरजेचे. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम नसल्याने त्याचा परिणाम तुमच्या कार्यक्षमतेला प्रभावित करू शकते. दीर्घकाळापासून चालणार्‍या आजारांपासून त्रस्त असलेल्या लोकांसाठी हा आठवडा फारसा चांगला नाही आहे. भागीदारीच्या कार्यांमध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

शुभ तारखा : 25, 26

कर्क- कामांमध्ये प्रगती

आवेश आणि राग याचे प्रमाण जास्त महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पूर्ण होतील. शत्रू पराभूत होतील. कौटुंबिक सुख वाढेल. वेळ अनुकूल आहे. कामांमध्ये प्रगती होईल. आरोग्य उत्तम राहील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. इंजिनियरिंग, रिसर्च आणि उच्च शिक्षण घेत असलेल्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. काही प्रेमपूर्ण अनुभव यंदा येऊ शकतात. हा वेळ आपण आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर घालवू शकता. वैवाहिक जीवनासाठी आठवडा साधारण राहणार असून इतर संबंधांमध्ये गैरसमज निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या.

शुभ तारखा ः 18, 19, 20

सिंह- घेवाण देवाणीत सावधगिरी बाळगा

व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती सुखद. सामाजिक स्थितीत सुधारणा होईल. दृष्टिकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर ेपरिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. शेअर बाजार, कमिशन आणि बँकिंग क्षेत्राशी निगडित लोकांना प्रगतीसाठी नवीन संधी मिळेल. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. आर्थिक घेवाण देवाणीच्या बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. मोठ्या फायद्याची उमेद करू नका.

शुभ तारखा : 22, 23, 24

कन्या - भरपुर धनलाभ होणार

अधिक साहस वृत्ती राहणार आहे. व्यापार क्षेत्रात यश मिळेल. आवश्यक कार्य पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल. विशिष्ट व्यक्तींचा संपर्क सुखद वाटेल. वरिष्ठांकडून सहयोग मिळेल. स्त्री पक्षाची स्थिती संतोषजनक राहील. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. व्यापार व्यवसायात सावध राहणे आवश्यक. शत्रूंपासून सावध राहा. सोने चांदी, फर्निचर,कपडे, कागद, मशीनरी, हॉटेल आणि रेस्टोरेंट इत्यादी व्यवसायाशी निगडित लोकांना या आठवड्यात भरपूर धनलाभ होणार आहे. जे लोकं उच्च शिक्षा प्राप्त करत आहे, त्यांच्यासाठी हा आठवडा फारच शुभ संकेत देत आहे. विरासत मालमत्ता, गुप्तधन मिळाल्याने आर्थिक सशक्त बनाल.

शुभ तारखा : 23, 24, 25

तूळ- आर्थिक विषयांत सावधगिरी बाळगा

आर्थिक ओढताण राहण्याची शक्यता आहे. शांत राहण्याचा प्रयत्न करा. इतरांवर चुकीचा प्रभाव पडू शकतो. पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातून मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्मसंयमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे लागेल. आर्थिक विषयांमध्ये सावधगिरी बाळगा. या आठवड्यात कुठल्याही प्रकारचा नवीन धैर्य दाखवू नका. शेअर बाजार, कमिशन, दलाली इत्यादी कार्यांमध्ये आंशिक लाभ मिळण्याची उमेद तुम्ही ठेवू शकता.

शुभ तारखा : 22, 25, 26

वृश्चिक- बॉसशी संबंध उत्तम राहणार

स्वास्थ्य संबंधी लहान सहानं तक्रारी राहतील. भाऊ बहिणींबरोबर तुमचे संबंध अनुकूल राहण्याची शक्यता. व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनात सर्वांची मदत मिळणार आहे. नोकरी करणार्‍या लोकांचे त्यांच्या बॉसशी संबंध उत्तम राहणार आहे. शासकीय कार्यात यश मिळेल. जमीन,घर व स्थावर मालमत्ता खरेदी करताना जास्त गोंधळून जाऊ नका. परदेश किंवा एखाद्या दूर जागेवर जाण्याचा योग आहे.

शुभ तारखा : 26, 27

धनू- आरोग्याकडे विशेष लक्ष द्या

भाग्याचा साथ कमीच मिळेल. पण दरीदेखील लाभ मिळण्याची शक्यता आहे. इतरांनी दिलेले मदतीचे आश्वासन ते पूर्ण करण्यास समर्थ स्थितीत राहतील. स्थगित व्यवहार गतिमान होऊन पूर्ण होण्याच्या मार्गी राहतील. सर्वत्र यशाचा मार्ग खुलाच राहू शकेल. यश मिळविण्यासाठी अथक परिश्रम वाढवावे करावे लागतील. इतरांवर अधिक विश्वासून राहणे अहितकारक ठरण्याची दाट शक्यता आहे. आरोग्याकडे विशेष लक्ष्य द्यावे लागणार आहे.

शुभ तारखा : 24, 26, 27

मकर- न्यायालयीन कामकाजात काळजी घ्या

व्यावसायिक आणि करियरशी निगडित जातक व्यस्त राहतील आणि त्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. स्थायी मालमत्तेत गुंतवणूक करू शकाल. भाऊ बहिणींच्या नात्यात आधीच्या तुलनेत गोडवा येण्याची शक्यता आहे. करियरसंदर्भातील नवी संधी मिळण्याची शक्यता. त्यामुळे घरांत उत्साहाचे वातावरण होईल. ठरविलेले पूर्ण करण्यासाठी असे प्रसंग प्रेरणादायी ठरतील.

शुभ तारखा : 21, 22, 23

कुंभ- कुटुंबात वादविवाद टाळा

शुभ कार्य होण्याची शक्यता आहे. व्यवहारावर विशेष लक्ष्य द्यावे लागणार आहे, आणि स्वतःवर संयम ठेवणे फारच गरजेचे आहे. आर्थिक बाबतीत हा आठवडा फारसा उत्तम नाहीे. वायफळ खर्च करणे टाळावे. काळजीपूर्वक काम करा. कोणतेही काम एखाद्यावर विसंबून राहून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. कामाचा भार अधिक राहील. महत्त्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा.

शुभ तारखा : 20, 22, 23

मीन- गुंतवणुकीमुळे लाभ मिळतील

आर्थिक स्थितीत निरंतर चढ उतार आहे. प्रकृतीची काळजी घ्या. करदारांनी कामात लक्ष द्यावे. अधिकार्‍यांशी वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. जमीन, घर, वाहन, दागिने व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या खरेदीचा योग आहे. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. अत्यंत व्यस्त राहाल. व्यापार व्यवसायात सावध राहणे आवश्यक. वाहने काळजीपूर्वक चालवा. गुंतवणुकीमुळे लाभ मिळतील.

शुभ तारखा : 23, 25

Related Stories

No stories found.