साप्ताहिक राशीभविष्य

20 ते 26 ऑक्टोबर 2022
साप्ताहिक राशीभविष्य
साप्ताहिक राशीभविष्यweekly Horoscope

मेष- गुंतवणूक करताना काळजी घ्या

सप्ताहाच्या प्रथम चरणात आर्थिक आवक मंदावेल व आर्थिक अस्थिरता निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे. आर्थिक गुंतवणूक काळजीपूर्वक करणे चांगले ठरेल व होणारे नुकसान टळू शकेल. शांतता प्रस्थापित राहील. अंतिम चरणात पराक्रम अगर क्रीडा क्षेत्रातील नवनवीन डावपेचाचे केलेले प्रयोग यशस्वी ठरतील. नवीन वाहन खरेदी करू शकता. या आठवड्यात तुमचे बँक बॅलन्स वाढणार आहे. बक्षीसपात्र स्थिती कायम राहून इतरांचे सहकार्य वेळेवर मिळेल व यश समोर दिसेल.

शुभ तारखा : 21, 22

वृषभ - अपेक्षेप्रमाणे यश

सप्ताहाच्या प्रथम चरणात मानसिक समाधान लाभेल व मनावर असलेले काळजीचे सावट मिटेल. महत्त्वपूर्ण कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल व सर्वत्र अपेक्षेप्रमाणे यश मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. अंतिम चरणात आर्थिक चढ-उतार स्थिती राहील. कुटुंबातील सुरू असलेले विवादित प्रकरण संपुष्टात येणार आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहणार आहे. आर्थिक क्षेत्रातील बहुतेक अंदाज चुकतील. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी भावी काळात होणार्‍या परिणामाचा अंदाज घेणे उचित. बर्‍याच दिवसांपासून लांबणीवर असलेले काम पुढे सरकत नसल्याने मानसिक त्रास होईल. आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच इतर कार्यांवर आपले लक्ष केंद्रित कराल. त्याचा परिणाम तुमच्या कामाच्या प्रदर्शनावर पडेल.

शुभ तारखा : 20, 22,23

मिथुन- समाधानकारक स्थिती

सप्ताहाच्या प्रथम चरणात अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च वाढेल. कर्ज व्यवहार प्रकरणामधून मनस्ताप संभवतो. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच श्रेयस्कर ठरेल. भावी काळात होणारा मनस्ताप टळेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूल राहील व मनाला दिलासा मिळवून देणारी ग्रहस्थिती आहे. सर्वत्र परिस्थिती थोडी समाधानकारक स्थितीत राहून यश मिळण्यात प्रारंभ होऊ शकेल. कुठल्याही प्रकारची समस्या असेल तर ती देखील या आठवड्यात संपुष्टात येईल.

शुभ तारखा : 23, 24, 25

कर्क- शांतता व संयम ठेवा

आर्थिक स्थिती मजबूत राहील व आर्थिक टंचाईचा सामना करावा लागणार नाही. इतरांकडून येणे असलेला पैसा वेळेवर हाती येईल. अचानक धनलाभ योग संभवतो त्यामुळे लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. अंतिम चरणात परिस्थिती प्रतिकूल आहे. त्यामुळे दगदग व त्रास वाढेल. मानसिक काळजी दूर होईल. संपूर्ण आठवडा कामात गुंतलेले असाल. फारच धावपळ होणार असली तरी केलेल्या मेहनतीचे फळ तुम्हाला या आठवड्यात नक्कीच मिळणार आहे.जवळ आलेले यश दूर जाण्याची दाट शक्यता आहे. शांतता व संयम ठेवणेच उचित ठरू शकेल.

शुभ तारखा : 24, 25,26

सिंह- काळजीचे सावट दूर होईल

उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील घडामोडी अनुकूल लाभाच्या ठरतील व व्यवसाय क्षेत्र सुरळीतपणाच्या मार्गावर राहील. जवळचा प्रवास योग जुळून प्रवास कार्यसाधकच ठरेल. बाजारात सुरू असलेल्या स्पर्धेमुळे पूर्ण आठवडा अस्वस्थ्य असाल. तुमच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि कार्याप्रती समर्पण भाव ठेवल्याने त्यात यश मिळवाल काळजीचे सावट काही प्रमाणात दूर होऊन उत्साह वाढीस लागेल. अंतिम चरणात सर्व क्षेत्रात यश मिळेल व अपयशाचा सामना सहसा करावा लागणार नाही. अचानक घरात पाहुणे येण्याचे योग आहेत. अपेक्षेप्रमाणे यश मिळवून देणारी ग्रहस्थिती अनुकूल आहे.

शुभ तारखा : 23, 24, 25

कन्या - उसमस्यांपासून मुक्तता होण्याची शक्यता

धार्मिक यात्रायोग घडेल व सर्व क्षेत्रात नशिबाची साथ पाठीमागे राहील. नियोजित कामे ठरविलेल्या वेळेवर पूर्ण होऊन उत्साह वाढीस लागेल व यशाचा मार्ग खुलाच राहील. बर्‍याच दिवसांपासून लांबणीवर असलेले काम पुढे सरकत नसल्याने मानसिक त्रास होईल. तसेच इतर कार्यांवर आपले लक्ष केंद्रित कराल. अंतिम चरणात नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत मिळतील. नवीन जागा, इंडस्ट्रियल पार्क, रिअल एस्टेट, संयंत्रासाठी शेड किंवा नवीन दुकानासाठी तुम्ही गुंतवणूक करू शकता. नवीन नोकरीसाठी होणारी मुलाखत भावी काळाच्या दृष्टीने आशा पल्लवीत करणारी ठरेल व सर्व समस्यांपासून मुक्तता होण्याची दाट शक्यता आहे.

शुभ तारखा : 20, 21, 22

तूळ- प्रवास कार्यसाधक ठरेल

वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचेच ठरेल. शांतता व संयमाचे धोरण स्वीकारणेच उचित ठरेल. अंतिम चरणात महत्त्वपूर्ण कामासाठी तातडीचा प्रवास योग जुळून येईल व प्रवास कार्यसाधक ठरेल. जुन्या आरोग्याच्या व्याधी दूर होण्याच्या मार्गी राहतील. इतरांचे सहकार्य वेळेवर मिळेल व कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही. उत्पादनांची गुणवत्ता आणि कार्याप्रती समर्पण भाव ठेवल्याने यश मिळवाल. मानसिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील.

शुभ तारखा : 21, 22, 24

वृश्चिक- त्रासदायक ग्रहस्थिती

भागीदारीमधून विशेष करून लाभ घडेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास त्याचा विचार जरूर करावा भावी काळासाठी लाभप्रद ठरेल. अंतिम चरणात विविध प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागेल व यश मिळविण्यासाठी केलेले अथक परिश्रम वाया जातील. आर्थिक अस्थिरता जाणवेल. दगदग व त्रास निर्माण करणारी ग्रहस्थिती आहे.

शुभ तारखा : 22, 23,24

धनू- मानसिक आनंद वाढीस लागेल

आरोग्याच्या सर्व समस्या मिटतील. विशेष करून जुन्या आरोग्याच्या व्याधी दूर होण्याच्या मार्गी राहतील. इतरांचे सहकार्य वेळेवर मिळेल व कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही. अंतिम चरणात भागीदारीत असणारा वाद मिटण्याच्या मार्गावर राहील व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त राहील. आपले सहकार्य इतरांच्या बहुमोल उपयोगी स्वरूपाचे सिद्ध होऊन मानसिक आनंद वाढीस लागू शकेल.

शुभ तारखा : 24, 25, 26

मकर- विरोधकांचा ससेमिरा कमी होईल

विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसह सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये यश मिळवून देणारी आजची ग्रहस्थिती आहे. संततीबाबत आनंदवार्ता व समाचार हाती येतील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे चांगले दूरध्वनी येऊन उत्साह वाढेल. अंतिम चरणात विरोधक मंडळींचा ससेमिरा व त्रास कमी होऊन विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करतील. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी चांगली घटना घडून येऊ शकेल.

शुभ तारखा : 25, 26

कुंभ- ठोस उपाययोजना कराल

पारिवारिक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील व पारिवारिक सदस्य मंडळींबरोबर असणारे मतभेद मिटतील. परिस्थिती पूर्वपदावर येऊन उत्साह वाढीस लागेल. आर्थिक चढ-उतार स्थिती राहील. कुटुंबातील सुरू असलेले विवादित प्रकरण संपुष्टात येणार आहे. अपूर्ण व स्थगित व्यवहार सुरळीत होतील. अंतिम चरणात सभोतालीन परिस्थिती चांगली राहील व कार्यक्षेत्रात आपला शब्द अंतिम प्रमाण स्वरूप मानला जाईल. कोणतेही काम विना विलंब पूर्ण होण्याच्या मार्गी राहील.

शुभ तारखा : 24,26

मीन- मनावरील दडपण दूर होईल

क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रात वर्चस्व वाढेल व सहकारी वर्ग मनोनुकूलरित्या सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवूनच वाटचाल करतील. नेत्रदीपक यश दृष्टिक्षेपात राहून यश मिळेल. अंतिम चरणात पारिवारिक आनंद वाढविणारे समाचारपत्र हाती येईल. कौटुंबिक सदस्य मनोनुकूलरित्या सहकार्य करतील. मानसिक आनंद वाढून मनावर असलेले काळजीचे सावट व दडपण दूर होऊन शांतता प्रस्थापित राहील.

शुभ तारखा : 20, 21, 22

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com