साप्ताहिक राशीभविष्य : २० ते २६ जुलै २०२३

साप्ताहिक राशीभविष्य : २० ते २६ जुलै २०२३

मेष : आर्थिक बाबतीत सावध रहा

आपल्या इच्छेवर आणि मनःस्थितीवर संयम ठेवा. कौटुंबिक समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत सावध राहा. आपणास यावेळी काही प्रेमळ अनुभव येऊ शकतात आपल्या आवडीच्या व्यक्तीबरोबर वेळ घालवू शकता. आपल्या सर्जनशील व कलात्मक विशेषतांना देखीेल प्रेरणा मिळणार आहे. इतर लोकांना आपल्या स्वतःच्या आवश्यकता व इच्छा सांगण्यासाठी ही उत्तम वेळ आहे. आपल्या जुन्या लोकांबरोबर किंवा आधार देणार्‍या मित्रांना जोडणे यावेळी आपल्यासाठी फलदायी आहे.

शुभ तारखा : 21, 22,23

वृषभ : व्यवहारात पारदर्शकता ठेवा

पैसे मिळवण्याचा एखादा मार्ग आपल्या स्वतःच्या घरातूनच मिळू शकतो. आपणास काही अधिक जबाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे पण आपल्या आत्म-संयमाचा परिणाम इतरांवर होऊ शकेल. घरात आरोप-प्रत्यारोप किंवा वादविवाद टाळा. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. जुन्या ठरवलेल्या योजना पूर्ण होतील. प्रॉपर्टीचे काम मार्गी लागेल. स्थावर मालमत्तेत वाढ होण्याचे योग आहेत. कुटुंबाचे चांगले सहकार्य मिळेल. आर्थिक कामकाज चांगले राहील. व्यवहारात पारदर्शकता ठेवा. आत्मविश्वास वाढेल. नवीन सहकारी भेटतील. जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्याने मन प्रसन्न राहील. अनेक जुन्या कटु आठवणी पुन्हा त्रास देण्याची शक्यता असल्याने वर्तमानाचा विचार करा. नौकरीत आणि व्यापारात उत्साह दिसून येईल. शुभ तारखा : 20, 21, 24

मिथुन : नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता

वेळ अनुकूल राहील. व्यापार-व्यवसायासाठी वेळ अनुकूल ठरेल. कुटुंब आनंदाचे कारण बनेल. स्वतःला इतर लोकांसामोर सादर करण्याचे सामर्थ्य आणि इतर लोकांसाठी आपले विचार अत्यंत चांगले आहेत. महत्त्वाच्या एखाद्या सामुदायिक योजनेत इतर लोकांबरोबर आपले सहकार्य आपली उत्तम राजकीय जाण दाखवते. जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्याने मन प्रसन्न राहील. अनेक जुन्या कटु आठवणी पुन्हा त्रास देण्याची शक्यता असल्याने वर्तमानाचा विचार करा. नोकरीत आणि व्यापारात उत्साह दिसून येईल. नोकरीत प्रमोशन होण्याची शक्यता आहे.

शुभ तारखा : 24, 25, 26

कर्क : कौटुंबिक वातावरण आनंदी राहील

इच्छित कार्यात यश मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. आरोग्य उत्तम राहील. शुभ वार्ता मिळतील. शेअरमध्ये गुंतवणूक करू नका. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. आरोग्य देखील चांगले राहील. एखाद्या महत्त्वाच्या प्रोजेक्टमध्ये यश मिळेल.आर्थिक योग उत्तम असतील.खर्च करताना विचार करा. विक्री करताना समोरच्या व्यक्तीची चौकशी करून निर्णय घ्यावा. कौटुंबिक समस्या निर्माण झाल्याने मनात असंख्य विचार घर करतील. मनातील कोलाहल जिभेवर येऊ देऊ नका. मनावर रागावर संयम ठेवा.

शुभ तारखा : 22,23, 24

सिंह : महत्त्वाच्या कार्यात यश

वरिष्ठ लोकांचे महत्वपूर्ण कामात सहकार्य मिळेल. आपले अधिकारी देखील आपणास सहयोग देतील. आपले विरोधक पराभूत होतील. देवाण-घेवाण काळजीपूर्वक करा. आरोग्य नरम-गरम राहील. पत्नीच्या आरोग्याची चिंता होईल. प्रवास काळजीपूर्वक करा. स्थिती अनुकूल राहील. महत्त्वाच्या कार्यात यश मिळेल. व्यसनांपासून दूर रहा. मानसिक अस्वस्थता कायम राहील. घेतलेल्या निर्णयावर ठाम रहा. जुन्या मित्रांच्या भेटीने मनास प्रसन्न वाटेल. वयोवृद्धाची काळजी घ्या. तुमच्यातील सहनशिलता या महिन्यात फायद्याची ठरेल. रखडलेले काम मार्गी लागेल.

शुभ तारखा : 22, 23, 24

कन्या : वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा

वेळेकडे लक्ष ठेवा. कार्यात अत्यंत व्यस्त राहाल. आर्थिक खर्च वाढेल. कार्यक्षेत्रात मानसिक ताण होण्याची शक्यता आहे. आनंदाचे वातावरण असल्यामुळे कार्य सुरळीत होतील. महत्त्वपूर्ण कार्यांमध्ये यश मिळेल. मित्रांचा पाठिंबा राहील. जास्त परिश्रम केल्यानंतर थोडे यश मिळेल. आरोग्य मध्यम राहील. वाद-विवाद टाळण्याचे प्रयत्न करा. वाहने काळजीपूर्वक चालवा. आर्थिक व्यवहार करताना त्यात पारदर्शकता ठेवा. व्यक्तीगत स्वार्थापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. प्रवास योग संभावतो. आर्थिक योग उत्तम. कर्ज, खर्च, करार यांना प्राथमिकता द्या. संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. मनाला अस्वस्थ करणारी घटना घडेल. शुभ तारखा : 20, 21

तूळ : खरेदी करताना बजेटचा विचार करा

प्रवासाचा चांगला योग संभवतो, परंतु त्यासाठी आपणास फार मोठी किंमत द्यावी लागू शकते. या प्रवासाच्या खर्चात काटकसर करण्याचे मार्ग शोधा. अनुभवी लोकेांची मदत घ्या. आपल्या वेळेचा योग्य उपयोग करा. आपल्या महत्वाकांक्षा पूर्ण होतील. शत्रूंवर प्रभाव वाढेल. परदेशी नातेवाईकांच्या भेटी होतील. आनंदाची बातमी मिळेल. व्यापार-व्यवसायात काळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांनी आळस टाळून अभ्यास करण्याची गरज आहे. महिलांनी खरेदी करताना आपल्या आपल्या बजेटचा विचार करावा.

शुभ तारखा: 22, 23

वृश्चिक : आरोग्याची काळजी घ्या

योजनाबद्धरित्या आपले काम करण्याचा प्रयत्न करा. छोट्या-छोट्या अडचणी आपणास त्या कामाला मुहूर्तमेढ देण्यात येऊ शकतात. ज्या बर्‍याच दिवसांपासून आपल्या डोक्यात आहे. काळजीपूर्वक कार्य करा. कोणतेही कार्य एखाद्यावर विसंबून करू नका. आरोग्य नरम-गरम राहील. नोकरीपेशा व्यक्तींनी काळजीपूर्वक कार्ये करा. जुन्या मित्रांची पुन्हा भेट झाल्याने मन प्रसन्न राहील. आपल्या सर्जनशील व कलात्मक विशेषतांना देखीेल प्रेरणा मिळणार आहे.

शुभ तारखा : 20, 24, 25

धनू : वाहनसुख मिळेल

मनोरंजनावर खर्च होईल. पत्नीपासून उत्तम सुख मिळेल. प्रेमसंबंधात यश मिळेल. अपत्यांपासून आनंदाची प्राप्ती होईल. वाहनसुख मिळेल. कार्याचा ताण आणि नवीन जबाबदार्‍या आपल्यासाठी ताण आणि काळजीचे कारण बनू शकतात. थंड आणि शांत राहाण्याचा प्रयत्न करा. मनावर रागावर संयम ठेवा. नोकरीत आणि व्यापारात उत्साह दिसून येईल. कुटुंबासाठी छोट्या मोठ्या सहलीचे आयोजन कराल. मित्रांच्या भेटी गाठी होतील.

शुभ तारखा : 24, 26

मकर : व्यवहारात सावधगिरी बाळगा

आर्थिक स्थितीमध्ये हळू-हळू सुधारणा येईल. आपल्या कौटुंबिक सभासदांच्या आरोग्याची काळजी घ्या. आज आपणास नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. आपण त्यांचा योग्यरीत्या वापर केल्याने आपणास चांगले यश मिळू शकते. आपल्या कार्यक्षेत्रातील किंवा आपल्या व्यापारातील इतर लोकांशी व्यवहार करताना सावधगिरी बाळगा.

शुभ तारखा : 26

कुंभ : धनाचा व्यय होईल

स्वभावात नम्रता आणण्याचा प्रयत्न करा कटु शब्दांचा उपयोग आपल्यासाठी अडचणी निर्माण करू शकतात. मानसिक स्थिती आल्हाददायक राहील. वरिष्ठांबरोबर संपर्कात आल्याने प्रसन्नतेचे वातावरण राहील. प्रवासयोग संभवतो. प्रवासातून अर्थार्जनही होण्याचा योग आहे. नवीन संधी मिळतील. आरोग्याची काळजी घ्या. व्यस्तता जास्त राहील. कौटुंबिक विषयांमध्ये धनाचे व्यय होईल. व्यापार-व्यवसायात स्थिती मिश्रित राहील.

शुभ तारखा : 26

मीन : शत्रू पराभूत होतील

मोठ्यांचा आधार मिळाल्याने कार्य पूर्ण होतील. वैवाहिक जीवनात स्थिती अनुकूल राहील. अधिकारी वर्गाचे पाठबळ मिळेल. शत्रू पराभूत होतील. मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. आईकडील नातेवाईकांचा सहयोग मिळेल. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील. मित्रांची मदत मिळेल. आरोग्याची काळजी बाळगणे आवश्यक राहील.

शुभ तारखा : 23, 25

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com