साप्ताहिक राशीभविष्य

18 ते 24 ऑगस्ट 2022
साप्ताहिक राशीभविष्य
साप्ताहिक राशीभविष्यWeekly Horoscope

मेष- यशस्वी व्हाल

महत्त्वाचे ग्रह अनुकूल आहेत. त्यामुळे सर्व कामात यश मिळेल. केलेल्या कष्टाचे चीज होईल. हितचिंतकांकडून तुम्हाला जी मदत मिळेल तीच उपयोगी पडणार आहे. व्यवसायधंद्यात हाताबाहेर गेलेल्या समस्येला पूर्ववत करण्यात वेळ जाईल. घरात पूर्वी लांबलेले कार्यक्रम पार पडतील. मित्रांसोबत मिळून नव्या कामाची सुरुवात करू शकता. द्रवपदार्थांच्या व्यवसायात विशेष फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीतही आपल्याला पदोन्नती मिळू शकते. कौटुबिक प्रश्न भेडसावू शकतात.

शुभ तारखा : 19, 20, 21

वृषभ - आर्थिक बाबतीत सावध रहा

स्पष्ट बोलण्यामुळे किंवा वागण्यामुळे कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो मिटवण्यात वेळ जाईल. व्यवसायात माणसांची पारख मोलाची ठरेल. आर्थिक व्यवहारात गाफील राहू नका. सरकारी नियम आणि अनपेक्षित खर्चामुळे तात्पुरता त्रास सहन करावा लागले. न्यायालयीन प्रकरणात अडकू शकता त्यासाठी खबरदारी घ्या. कामाचा भार अधिक राहील. महत्त्वाचे काम टाळा. दृष्टिकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. शेअर बाजार, कमिशन आणि बँकिंग क्षेत्राशी निगडित लोकांना प्रगतीसाठी नवीन संधी मिळेल. आर्थिक दृष्टिकोनातून हा आठवडा शुभ राहील. मनाप्रमाणे गुंतवणूक केल्यास चांगले परिणाम मिळतील. आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

शुभ तारखा : 20, 21, 22

मिथुन- खर्चावर नियंत्रण ठेवा

कार्य करत असलेल्या क्षेत्रात मानमरातब मिळवाल. कामाचा ताण कमी होईल. नित्यकामात सामधान मानणारी तुमची रास आहे. विनाकारण कोणत्याच गोष्टींचा तुम्ही विचार करीत नाही. मात्र एखादी बाब तुमच्या मनात शंकाकुशंका निर्माण करेल. घरात खर्चावर नियंत्रण ठेवा. मालमत्तेच्या बाबतीत थोडा खर्च होऊ शकतो. आरोग्य थोडे नरम गरम राहील आणि लक्ष देणे आवश्यक आहे. व्यावसायिक प्रवासाची चांगली शक्यता आहे, संतुलन राखून काम केल्यास यश मिळेल.

शुभ तारखा : 22, 23

कर्क- सुख-समृद्धी नांदेल

आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहील आणि धनवृद्धी होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तब्येतीत सुधारणा होईल. कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि भागीदारीत केलेल्या प्रकल्पांचे चांगले परिणाम मिळू शकतील. कुटुंबात सुख-समृद्धी नांदेल. व्यवसायात कामाचा ताण वाढेल. व्यक्तिगत कारणाकरिता कोणाशी उधार उसनावर केली असेल तर त्या बाबतीत काटेकोर राहा. व्यापारी वर्गाला धावपळ करावी लागेल. प्रकृतीच्या बाबतीत हेळसांड करून चालणार नाही.

शुभ तारखा : 13, 14, 17

सिंह- संधीचा फायदा घ्या

जुने कोर्ट व्यवहार अथवा सरकारी कामे यात लक्ष घालावे लागेल. पडती बाजू घ्यावी लागेल. व्यवसायात मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या. नोकरीत गाफील राहून चालणार नाही. अतिविश्वास टाळा. नवीन जागेत राहावयास जाण्याचे योग येतील. गुंतवणुकीबाबत मनात काहीशी द्विधा मनस्थिती राहील. तसेच, मोकळ्या मनाने गुंतवणूक करा आणि भविष्यात याचा फायदा होऊ शकतो. पदभार स्वीकारून पुढे जाणे आवश्यक आहे. वाद विवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. परदेश किंवा एखाद्या दूर जागेवर जाण्याचा योग आहे.

शुभ तारखा : 19, 20, 22

कन्या - प्रवासातून चांगले परिणाम

कौटुंबिक सहवासात आनंददायी वेळ घालवा. तुम्ही तुमचे घर सजवण्यासाठी खर्च करू शकता. कार्यक्षेत्रात हळूहळू प्रगती होईल. प्रेमसंबंध दृढ होतील आणि मन प्रसन्न राहील. या आठवड्यात प्रवासातून चांगले परिणाम मिळू शकतात. आठवड्याच्या शेवटी अचानक रखडलेली कामे पूर्ण होतील. वतीभवतीच्या माणसांशी तुमहई कसे हितसंबंध ठेवता यावर बर्‍याच गोष्टी अवलंबून असणार आहेत, म्हणून त्याल विशेष महत्व द्या. व्यवसायात कामाचा व्याप वाढेल. हितशत्रूंवर बारीक नजर ठेवणे गरजेचे होईल. नोकरीत वरिष्ठ महत्त्वाच्या कामाची जबाबदारी तुमच्यावर सोपवतील.

शुभ तारखा : 21, 22,23

तूळ- परदेशगमनासाठी योग्य वेळ

ग्रहमान जरी तुम्हाला चांगले असेल तरी पूर्वीच्या चुकांचा परामर्श घेण्याची वेळ आली आहे. तुमच्या सभोवताली असणारी माणसे त्यांच्या वागण्या बोलण्यातून त्यांची नाराजी व्यक्त करतील. नोकरीत कामानिमित्त प्रवास घडेल. अधिकार्‍यांशी संबंध उत्तम राहणार आहे. परदेशगमनासाठीही योग्य कालवधी आहे. कार्यक्षेत्रात प्रगती होईल आणि भागीदारीत केलेली कामे यशस्वी होतील. मात्र, एखाद्या प्रकल्पामुळे मन उदास होऊ शकते.तब्येत सुधारेल.

शुभ तारखा : 22, 23, 24

वृश्चिक- अचानक धनलाभाचा योग

ज्या कामात तुम्ही इतरांवर अवलंबून आहात त्यात त्यांच्याच शब्द फिरवण्यामुळे तुमची गैरसोय आणि धावपळ होईल. नोकरीत अर्धवट कामे मार्गी लागतील. घरातील वाद संपुष्टात येतील. भावनिकदृष्ट्या आनंदी असाल. आर्थिक संपत्ती वाढीचा योगायोग आणि आनंद द्विगुणीत होईल. अचानक धनलाभ योग आहे. वडिलांसारख्या व्यक्तीबद्दल मनात चिंता वाढू शकते. आठवड्याच्या शेवटी चांगली बातमी मिळू शकते.

शुभ तारखा : 18, 19

धनू- घरात उत्साहाचे वातावरण

आवकेपेक्षा जावक वाढेल. परंतु ती चांगल्या कारण्यासाठी असेल. व्यवसायात नवीन कामांना गती द्या. एखादी चांगली संधी तुमच्यापुढे असेल, ती हातातून निसटण्याची शक्यता आहे. व्यापारीवर्ग आणि कारखानदारांनी स्पर्धकांच्या हालचालींवर नजर ठेवावी. नोकरीत तुमचेच सहकारी प्रगतीच्या आड येण्याची शक्यता आहे. आठवड्याच्या शेवटी मन भावूक राहील.

शुभ तारखा : 21, 23, 24

मकर- आरोग्याकडे लक्ष द्या

व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरेल परंतु अपेक्षेपेक्षा कमी फायदा होईल. या आठवड्यात आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. आठवड्याच्या शेवटी आयुष्य खूप बदलू शकते. जीवनात नवीन दृष्टीकोन घेऊन पुढे जाण्याची शक्यता आहे. कुटुंबातील मुलांशी संबंधित समस्या असू शकतात. नोकरीत सहकारी तुमची खुशामत करतील. आर्थिक स्थिती सामाधानकारक राहिल्याने आनंद वाटेल. महत्त्वाकांक्षा वाढेल.

शुभ तारखा : 22, 23

कुंभ- कठोर परिश्रमाने फलप्राप्ती

व्यवसायात अडचणींवर मात कराल. प्रवास करताना अनोळखी व्यक्तींवर जास्त विसंबून राहू नका. तसेच स्वत:चे सामान संभाळा. व्यापारधंद्यातील लांबलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. नोकरीमध्ये तुमच्या अत्यावश्यक मागण्या आठवड्याच्या शेवटी वरिष्ठांसमोर ठेवा. कामाच्या ठिकाणी आळस सोडून कठोर परिश्रम केल्यास चांगले परिणाम मिळतील. व्यवसायिक प्रवास या आठवड्यात आनंददायी ठरू शकतो.

शुभ तारखा : 20, 21, 22

मीन- आर्थिक स्थितीत बदलत राहणार

व्यवसायासंबंधी प्रवासात तुम्हाला यश मिळेल आणि एखाद्या चांगल्या ठिकाणी जावेसे वाटेल. तब्येत सुधारेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीबद्दल मन अस्वस्थ होऊ शकते. या आठवड्यात आर्थिक खर्चाची स्थिती बदलत आहे. नवीन जागा किंवा वाहन खरेदीसारखे निर्णय शक्यतो घेऊन नका. व्यवसाय व घर दोन्ही ठिकाणी सतर्क राहावे लागेल.

शुभ तारखा : 22, 23

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com