साप्ताहिक राशीभविष्य

18 ते 24 नोव्हेंबर 2021
साप्ताहिक राशीभविष्य
साप्ताहिक राशीभविष्यWeekly Horoscope

मेष - मतभेदाची स्थिती संयमाने हाताळा

मेष राशीच्या जातकांना या आठवड्यात मानसिक निराशा आणि असंतोषाचा सामना करावा लागत आहे. कुटुंबात मात्र शांतीचे वातावरण आहे. विरोधकांच्या कारवायांवर मात कराल. परिवारातील एखाद्या महिलेकडून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. भावंडांसोबत मतभेद होणार आहेत. संयमाने स्थिती हाताळा. बोलण्यातील कडवटपणा कमी ठेवावा. आर्थिक खर्च वाढणार आहे. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. महत्त्वाच्या कामाच्या निमित्ताने प्रवास होणार आहे. मात्र हा प्रवास पुढील काळात फायद्याचा ठरणार आहे.

शुभ तारखा : 25, 28

वृषभ- बढतीचे योग

हा आठवडा आपल्यासाठी मानसिक शांतीचा ठरणार आहे. आत्मविश्वास वाढणार आहे. मात्र काही बाबतीत समाधानी असलेले बरे. भावनांवर नियंत्रण ठेवा. आईकडून धनप्राप्तीचे योग आहेत. वैवाहिक जीवनात आनंद वाढीस लागणार आहे. मित्रांच्या मदतीने नोकरीसाठी केलेल्या प्रयत्नांना यश येणार आहे. कमाईत भर पडेल मात्र त्यासाठी स्थानबदल संभवतो. खर्च वाढणार आहेत. नोकरीपेशा लोकांना वरिष्ठांकडून सहकार्य मिळणार आहे. बढतीचे योग आहेत. भेट टळत असल्याने प्रेमी अस्वस्थ होतील. आरोेग्याकडे दुर्लक्ष करू नका. जुने दुखणे डोके वर काढण्याची शक्यता आहे.

शुभ तारखा : 26, 29

मिथुन- मित्रांची भेट आनंददायी

हा आठवडा आपल्यासाठी कमालीचा व्यस्त ठरणार आहे. नोकरी अथवा व्यवसायात अचानक काम वाढणार आहे. मात्र अपेक्षीत यशही मिळणार आहे. आठवड्यात एखाद्या मंगलकार्यात सहभागी व्हाल. खूप दिवसांनी होणारी मित्रांची भेट आनंद देणारी ठरणार आहे. युवकांसाठी हा आठवडा मौज-मस्तीचा ठरेल. एखाद्या ओळखीच्या प्रभावी व्यक्तीच्या मदतीने कमाईच्या नव्या वाटा सापडतील. स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍यांना चांगली बातमी मिळेल. प्रेम संबंध अधिक दृढ होतील. वैवाहिक आयुष्यात मधुरता असेल. शुभ तारखा : 25, 1

शुभ तारखा : 19, 21

कर्क- किरकोळ व्यवसायात फायदा

भावनांच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका, हाच या आठवड्याचा आपल्यासाठी संदेश आहे. वारंवार कामाची प्राथमिकता बदलणे यशावर परिणाम करणारे ठरेल. पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करताना आर्थिक बाबी स्पष्ट ठेवा. अन्यथा वाद आणि नुकसान वाट्याला येईल. किरकोळ व्यवसायात असलेल्यांना हा आठवडा फायदा देणार आहे. भावंडांसोबत मतभेद होतील. संवादाने मतभेदांवर मात करा. प्रेम प्रकरणात प्रपोज करण्यासाठी हा आठवडा योग्य ठरेल. मात्र त्यासाठी एखाद्या मैत्रिणीची मदत नक्की घ्या. कौटुंबिक आयुष्यात आनंदाचे वातावरण राहील.

शुभ तारखा : 25, 27

सिंह- प्रेमसंबंधांना पाठबळ

कमालीच्या धावपळीचा आठवडा असला तरी हाती घेतलेली कामे मार्गी लागणार आहेत. वरिष्ठ किंवा एखाद्या मार्गदर्शकाच्या मदतीने कुटुंबातील समस्येवर मार्ग निघणार आहे. ही आपल्यासाठी दिलासादायक बाब ठरेल. वरिष्ठ आणि सहकार्‍यांच्या मदतीने कार्यक्षेत्रात ठरवलेले उद्दिष्ट गाठणार आहात. विदेशात व्यवसाय असणार्‍यांना फायदा होईल. व्यवसायात प्रगती साधणार आहात. प्रेमसंबंधात आपसातील विश्वास दृढ होईल. कुटुंबातून आपल्या प्रेमसंबंधांना पाठबळ मिळेल. मुलांकडून सुवार्ता मिळेल.

शुभ तारखा : 28, 29

कन्या-उत्साहात निर्णय नको

या आठवड्यात नोकरी किंवा व्यवसायात प्रत्येक पाऊल टाकताना काळजी घ्यावी. नोकरीत बदलाच्या विचारात असाल तर एकदा मित्र किंवा कुटुंबाचा सल्ला नक्की घ्या. अति उत्साहात कोणताही निर्णय घेऊ नका. अन्यथा त्याचे दुष्परिणाम भविष्यात उमटतील. घरातील एखाद्या ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्याची चिंता भेडसावणार आहे. घराच्या डागडुजीसाठी खर्च होणार आहे. त्यामुळे या आठवड्यात बजेट बिघडणार आहे. प्रवासाचे योग आहेत. प्रवासात आरोग्य आणि साहित्य सांभाळा. कुटुंबात आनंदी वातावरण असेल. प्रेम संबंधात आत्मियता वाढणार आहे.

शुभ तारखा : 29, 1

तूळ - अपेक्षीत राजकीय पद मिळणार

आपल्या अपेक्षेपेक्षा अधिक आनंद देणारा आणि लाभदायक आठवडा ठरणार आहे. प्रिय व्यक्तीच्या आगमनाने घरात आनंदाचे वातावरण असेल. परिवारासोबत उत्साही क्षण लाभणार आहेत. धार्मिक किंवा मंगलकार्यात सहभागी होणार आहात. आर्थिक लाभाचे नवे मार्ग गवसतील. राजकीय व्यक्तींना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले पद मिळणार आहे. प्रेमसंबंध विवाहापर्यंत पोहचणार आहेत. जोडीदारासोबत धार्मिक पर्यटनाचे योग आहेत. पालकांचे आरोग्य चिंता वाढवेल.

शुभ तारखा : 27, 29

वृश्चिक - दोन पावले मागे घेण्यात संकोच नको

या आठवड्यात संयमाशी मैत्री करा. जोशात होश गमावणे टाळा. नोकरी किंवा व्यवसायासंबंधी कोणताही निर्णय पूर्ण विचारांती घ्या. दोन पावले मागे आल्याने भविष्यात दोन पावले पुढे जाण्याची संधी मिळणार असेल तर आता दोन पावले मागे घेण्यात संकोच बाळगू नका. संपत्तीचा वाद कोर्टात पोहचण्याआधी आपसात मिटवणे फायदेशीर ठरेल. प्रेमसंबंधात जरा जपून. प्रेमसंबंधात अनावश्यक विवाद टाळा. कोणताही प्रश्न हाताळताना अन्य व्यक्तीच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका.

शुभ तारखा : 26, 27

धनू - कामाचे कौतुक होईल

अनेक दिवसांपासून पाहिलेले स्वप्न या आठवड्यात पूर्ण होताना दिसत आहे. रोजगाराच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळेल. व्यवसायात अपेक्षेनुसार लाभ होतील. ठेकेदारीत असलेल्यांना सत्ताधार्‍यांच्या मदतीने मोठे काम मिळणार आहे. कार्यालयात वरिष्ठ आणि सहकारी मदत करतील. आपल्या कामाचे कौतुक होईल. प्रेमसंबंध अधिक मजबूत होतील. जोडीदारासोबत भटकंतीसाठी वेळ मिळणार आहे. युवकांचा वेळ मौज-मस्तीत जाणार आहे. शुभ तारखा : 27, 1

मकर - जोडीदार पाठीशी

आपल्या राशीसाठी हा आठवडा काहीसा उतार-चढावांचा ठरणार आहे. कुटुंबातील एखादी समस्या आपली चिंता वाढवणारी ठरणार आहे. कुटुंबातील निर्णय घेताना भावंडांकडून साथ न मिळाल्याने मन उदास होईल. कोणतीही समस्या किंवा वादावर संवादाने मार्ग काढण्याचा प्रयत्न करा. प्रेमसंबंधातील अडचणींवर मात करताना स्वकीयांच्या भावनांकडेही लक्ष द्या. जोडीदार पाठीशी खंबीरपणे उभा आहे.

शुभ तारखा : 25, 27

कुंभ - दोघांत तिसर्‍यामुळे अडचण

या आठवड्यात आपल्याला नव्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. वरिष्ठांचे सहकार्य आणि आपल्या कार्यक्षमतेच्या बळावर या आव्हानांचा आपण यशस्वी सामना करणार आहात. व्यवसायात गुंतवणूक करण्याआधी हितचिंतकांचा सल्ला घ्या. योजनेवर काम करण्याआधीच त्यासंबंधीचा खुलासा करणे टाळा. अन्यथा विरोधक खोडा घालण्याचा प्रयत्न करतील. प्रेमसंबंधात दोघांत तिसरा काही अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. प्रकरण सावधपणे हाताळा.

शुभ तारखा : 26, 29

मीन - अडकलेल्या कामाला गती

या आठवड्यात आपल्याला सकारात्मक उर्जा लाभणार आहे. सुख, आनंद आणि भाग्य भरभरून मिळणार आहे. प्रिय व्यक्तीसंबंधी चांगली बातमी कानावर पडेल. नोकरी आणि व्यवसायात इच्छापूर्तीचे योग आहेत. रोजगाराच्या शोधात असलेल्यांना काम मिळणार आहे. अनेक दिवसांपासून अडकलेल्या कामाला गती मिळणार आहे. व्यवसायात फायदा होणार आहे. प्रेमसंबंधांतील गैरसमज दूर होतील. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण वाट्याला येतील.

शुभ तारखा : 26, 1

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com