साप्ताहिक राशीभविष्य

14 ते 20 ऑक्टोबर 2021
साप्ताहिक राशीभविष्य

मेष- आर्थिक हानीची शक्यता

डोळ्याच्या समस्या त्रास देऊ शकतात. आर्थिक हानी होऊ शकते. कुठलाही निर्णय घाई-गर्दीत न घेता विचारपूर्वक घ्या. या आठवड्यात अचानक घरी पाहुणे येण्याची अपेक्षा आहे. जे कौटुंबिक वातावरणात शांतता आणेल. या सप्ताहात तुम्हाला सामान्यपेक्षा कमी मेहनत करावी लागेल कारण, या वेळात तुम्हाला आपल्या मेहनतीचे उत्तम परिणाम मिळण्याचे योग बनतील यामुळे तुमची स्थिती उत्तम होईल. असा कुठला ही निर्णय घेऊन नका ज्यासाठी तुमचे मन सहमती देत नसेल.

शुभ तारखा : 17, 18, 20

वृषभ- मानसिक समाधान लाभेल

पारिवारीक आनंद वाढविणारे समाचार हाती येतील. कौटुंबिक वातावरण उत्साहवर्धक राहील. इतरांकडून अपेक्षित स्वरूपाचे मदतकार्य वेळेवर मिळेल. कोणतेही काम सहसा अपूर्ण स्थितीत राहणार नाही. अंतिम चरणात स्पर्धा परीक्षेसह सर्व प्रकारच्या परीक्षेमध्ये मनोनुकूलरीत्या यश मिळेल. विरोधक मंडळीचा ससेमिरा व त्रास काही प्रमाणात दूर होऊन मानसिक समाधान लाभेल. महिला जबाबदारी समर्थपणे पार पाडतील. तरुणांनी महिन्यात विवाहाच्या प्रश्नावर शिक्कामोर्तब करावे.विद्यार्थ्यांना स्पर्धा व शर्यतीत आघाडीवर राहता येईल. यंदा नवीन वास्तूचा, स्थावरचा विचारही यशस्वी होईल. वरिष्ठ व घरातील अनुभवी व्यक्तींशी संघर्ष करू नये. तुमच्या हातून काही घरगुती जबाबदार्‍या पार पडतील.

शुभ तारखा : 18, 19.

मिथुन- तुमचे सहकार्य इतरांना बहुमोल असेल

सभोतालीन परिस्थिती अनुकूल व चांगली राहील. दीर्घकालपर्यंत स्मरणात राहील अशी एखादी घटना घडून येऊ शकेल. अपयशाचा सामना करावा लागणार नाही. अंतिम चरणात सहकुटुंब सहपरिवार यात्रा योग जुळून येईल. पारिवारीक सदस्य मंडळीबरोबर असणारे सर्व प्रकारचे मतभेद मिटतील व परिस्थिती पूर्वपदावर येईल. आपले सहकार्य इतरांना बहुमोल उपयोगी सिद्ध होऊ शकेल. ज्या मुलांना उच्च शिक्षणाकरिता किंवा नोकरीनिमित्त परदेशात जायचे आहे, त्यांना हा महिना विशेष चांगला आहे

शुभ तारखा : 19, 20

कर्क- अतिश्रमामुळे प्रकृतीवर परिणाम होईल

आर्थिक आवक अस्थिर स्वरूपात राहील. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी अनुभवीचे मार्गदर्शन घेणे आवश्यक व उचित ठरेल. भावी काळात होणारे नुकसान काही प्रमाणात टळू शकेल. यश समोर दिसेल. अंतिम चरणात क्रीडा अगर पराक्रम क्षेत्रातील कामगिरी नेत्रदीपक यश मिळवून देणारी राहील. नोकरदार व्यक्तींच्या बर्‍याच वर्षाच्या इच्छा-आकांक्षा साकार करणारा महिना आहे. सहकारी वर्ग अपेक्षेइतके सहकार्य करण्यास तत्पर स्थितीतच राहू शकतील व यश मिळेल.

शुभ तारखा : 15, 17, 20

सिंह- नवीन वास्तूचा विचार यशस्वी

अनावश्यक व मनाविरुद्ध खर्च वाढेल. कर्ज व्यवहार प्रकरणे विलंबाखाली व अडचणीच्या मार्गावरच राहू शकतील. सर्व बाबतीत दगदग व त्रास वाढण्याची शक्यता आहे. शांतता ठेवणेच उचित ठरू शकेल. अंतिम चरणात परिस्थिती थोडी अनुकूलतेच्या स्थितीत राहील व मनाला दिलासा मिळेल. महत्त्वपूर्ण कामाच्या बाबतीत मनोनुकूल व चांगल्या घडामोडी घडून येतील. अपेक्षेप्रमाणे यश दृष्टिक्षेपात राहील. वरिष्ठ व घरातील अनुभवी व्यक्तींशी संघर्ष करू नये. तुमच्या हातून काही घरगुती जबाबदार्‍या पार पडतील. विद्यार्थ्यांना स्पर्धा व शर्यतीत आघाडीवर राहता येईल.

शुभ तारखा : 16, 17

कन्या- आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करणे

महत्त्वपूर्ण स्वरूपाच्या कामासाठी करावा लागणारा प्रवास कार्यसाधक ठरेल. सर्वत्र अनुकूल व चांगल्या घडामोडी घडून येतील. यशाचा मार्ग खुलाच राहून यश मिळेल. अंतिम चरणात आर्थिक स्थिती कमजोर राहून इतरांनी दिलेले आर्थिक मदतीचे आश्वासन ते पूर्ण करण्यास असमर्थ राहतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वकच करणे अन्यथा भावी काळाचा दृष्टीने व्यवहार अडचणीचे ठरतील. रुण-तरुणींनी प्रेमसंबंधात अति घाई संकटात नीेईल हे लक्षात ठेवावे. विवाहोत्सुक तरुणांना हा महिना अनुकूल आहेत, पण त्यांनी निर्णय घाईने घेऊ नये.

शुभ तारखा : 18, 19, 20

तूळ - अचानक धनलाभ योग

बहुतेक स्वरूपाच्या मनोकामना पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात येतील. अचानक धनलाभ योग संभवतो. त्यामुळे लॉटरी वगैरे सारख्या माध्यमातून नशिबाची परीक्षा घेण्यास हरकत नाही. धनलाभ होऊ शकतो. अंतिम चरणात परिस्थिती थोडी प्रतिकूल ईाहे. त्यामुळे सावधानता ठेवूनच वाटचाल करणे उचित ठरेल व भावी काळात होणारा मनस्ताप टळेल. इतरांवर अधिक प्रमाणात विश्वासून राहणे नुकसानकारक ठरू शकेल.

शुभ तारखा : 9, 10, 12

वृश्चिक- अपेक्षित यश दृष्टिक्षेपात

प्रकाशक व लिखाण क्षेत्रातील लोकांना उद्योग-व्यवसाय क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहील. नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत व अपेक्षित यश दृष्टिक्षेपात ठेवणारी ग्रहस्थिती आहे. दूर गेलेले यश पुन्हा जवळ येऊन उत्साह वाढीस लागू शकेल. अंतिम चरणात सहजरीत्या केलेले प्रयत्न यशस्वी होतील. दूर निवासी प्रिय व्यक्तीचे चांगले दूरध्वनी येतील. इतरांनी दिलेले मदतीचे आश्वासन ते पूर्ण करण्यास सर्मथ स्थितीतच राहतील.

शुभ तारखा : 18, 19

धनू- आनंददायी घटना घडेल

धार्मिक यात्रायोग घडेल व सर्वत्र नशिबाची साथ पाठीमागे राहील. अल्पशा प्रयत्नाने व सहजरीत्या केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. यश दृष्टिक्षेपात राहील. मनाप्रमाणे यश मिळून उत्साह वाढेल. अंतिम चरणात नोकरीत बढतीजनक बदल घडून येण्याचे संकेत व सूचना मिळतील. अधिकारी वर्गाची मर्जी राहून त्यांनी सोपविलेली कामगिरी आपल्या हातून यशस्वीरीत्या पूर्ण होण्याच्या दृष्टिक्षेपात राहील.

शुभ तारखा : 14, 15, 19

मकर- काळजीचे सावट दूर होईल

वाहन पीडायोग संभवतो. त्यामुळे वाहन चालविताना सर्व रस्ता आपलाच आहे असे समजून वाहन चालविणे धोकादायक स्वरूपाचे ठरू शकेल. इतरांवर अधिक प्रमाणात विश्वासून राहू नये. अंतिम चरणात शुभ कार्यानिमित्त प्रवास योग जुळून येईल. महत्त्वपूर्ण कामाबाबत अनुकूल व चांगले वार्तापत्र येईल. मनावर असलेले काळजीचे सावट मिटेल.

शुभ तारखा : 17, 18

कुंभ- समस्यात वाढ होईल

भागीदारीमधून चांगल्या प्रकारे लाभ घडेल व भागीदारी क्षेत्र समस्यामुक्त स्थितीतच राहू शकेल. नवीन भागीदारीचा प्रस्ताव समोर आल्यास तो जरूर स्वीकारावा. अंतिम चरणात विविध प्रकारच्या अडचणी व समस्या वाढतील. काही बाबतीत परिश्रम करूनही तितकेसे यश मिळणे अवघड स्थितीत राहील. कोणत्याही बाबतीत इतरांचा सल्ला व मार्गदर्शन फक्त ऐकणेच उचित ठरेल.

शुभ तारखा : 17, 18, 19

मीन- बदली आणि बढतीची शक्यता

आरोग्य चांगले राहील व आरोग्याच्या सर्व समस्या मिटण्याच्या मार्गावर राहतील. विरोधक मंडळी गुप्तरीतीने सहकार्य करण्याचा पवित्रा ठेवूनच वाटचाल करतील. कार्यक्षेत्रात आपला प्रभाव व वर्चस्व वाढेल. वस्तुस्थितीचा आढावा घेऊन घेतलेला निर्णय भावी काळाच्या दृष्टीने लाभाचाच ठरेल. भागीदारीत असणारा वाद मिटेल व भागादीरामधून विशेष प्रकारे फायदा घडून येईल.

शुभ तारखा : 18, 19

Related Stories

No stories found.