साप्ताहिक राशीभविष्य Weekly horoscope
साप्ताहिक राशीभविष्यweekly Horoscope

साप्ताहिक राशीभविष्य Weekly horoscope

22 ते 28 जुलै 2021

मेष - आर्थिक फायद्यात वाढ

या आठवड्यात कामाची गती साधारण राहणार आहे. त्यामुळे संयम आणि आत्मविश्वास कायम ठेवण्याची गरज आहे. नवीन कामकाजात दिरंगाई झाल्याने मनाला तीव्र वेदना होऊ शकतात. आरोग्यविषयक छोट्यामोठ्या तक्रारी येत असल्या तरी प्रतिकारशक्ती उत्तम राहील. आर्थिक फायद्यात वाढ होऊन भविष्यासाठी तरतूद करून ठेवणे हिताचे ठरेल. कौटुंबिक जीवनात उत्तम साथ लाभेल. वाहन खरेदी किंवा तत्सम खरेदी तूर्तास लांबणीवर टाकणे हिताचे ठरेल. शुभ तारखा ः 23, 24, 27

वृषभ - प्रवास करावा लागेल

या आठवड्यात घर/वाहन खरेदी विषय विषयांना चालना देण्याचा प्रयत्न करावा. शारीरिक कमाजोरी जाणवेल. कारणांनिमित्ताने प्रवास करावा लागेल. आध्यात्मिक विषयातील रुची वाढेल.परदेश व्यवहारात प्रगती दिसून येईल. आपण जर बदलीसाठी प्रयत्न करीत असाल तर तुमच्या प्रयत्नांना यश येईल. आर्थिक व्यवहारात होणार्‍या उलाढालीचा आलेख चढता असेल. तुम्हाला तुमच्यावर विश्वास ठेवणारी मंडळी देखील भेटतील. मित्रमंडळींचा उत्तम सहयोग लाभेल. आर्थिक व्यवहाराबाबत व्यवस्थापन आवश्यक आहे. उधार देऊ नका आणि घेऊही नका. कोणत्याही व्यवहारात गुप्तता राखणे हिताचे ठरेल. येऊ घातलेल्या संकटांवर मार्ग निघेल. अकारण होणार्‍या दोषारोपामुळे मानसिक संतुलन ढळण्याची शक्यता आहे. व्यसनांकडे वळत तर नाही ना याबाबत सतर्क रहा. शुभ तारखा : 23, 25

मिथुन - भाग्योदयातील अडथळे दूर होतील

आठवड्याच्या सुरुवातीच्या काळात आपणास आत्मिक समाधान लाभेल अशी घटना ऐकायला मिळेल. सहकारी मंडळींकडून अभूतपूर्व मदत मिळू शकेल. भाग्योदयातील अडथळे दूर होतील. घरातील थोर मंडळींच्या आरोग्यविषयक बाबतीत महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतील. आर्थिक व्यवहाराबाबत चलबिचल निर्माण होऊन कामाची गती मंदावली जाऊ शकते. आठवड्याच्या अखेरीस सामाजिक क्षेत्रात केलेल्या कामगिरीबाबत नैराश्यजनक स्थिती निर्माण होऊ शकेल. जमिनीपासून फायदा होईल. वाहन खरेदी करू शकाल. सद्गुरू मंत्राचा जप करावा. शुभ तारखा : 23, 24, 27,

कर्क - नवीन पाऊल उचलताना काळजी घ्या

पारिवारिक सुखाचा लाभ मिळेल. नयनरम्य ठिकाणच्या सहलीला जाण्याचे योग आहेत, मात्र आपत्कालीन स्थितीचा अभ्यास करूनच याबाबत निश्चय करावा. नोकरदारांसाठी उत्तम काळ आहे. तुम्ही केलेल्या कामाची वाहवा होईल. प्राकृतिक स्थिती नाजूक बनून राहील. कोणत्याही कामी नवीन पाऊल उचलताना काळजीपूर्वक उचलावे. या आठवड्यात स्थानांतर शक्य आहे. विद्यार्थ्यांना नवीन विषयाचा अभ्यास सुरू करण्यासाठी अत्यन्त शुभ काळ आहे. शुभ तारखा : 23,24, 25, 26

सिंह - आर्थिक व्यवहार पूर्वपदावर

शेती, दूध किंवा तत्सम व्यवसायात कार्यरत असाल, तर अत्यंत लाभदायक काळ आहे. विविध प्रकारचे पदार्थ खाण्याविषयीची रुची देखील वाढेल. पारिवारिक कार्यात महत्त्वाची जबाबदारी पडेल. चित्रपट, चित्रकला क्षेत्रातील लोकांसाठी नावीन्यपूर्ण वातावरणात सुंदर कलाकृतीचा आविष्कार सादर करण्यासाठी अत्यन्त लाभदायक काळ आहे. आर्थिक व्यवहार मध्यम गतीने पूर्वपदावर यायला सुरुवात होईल. काहीतरी कारणाने अचानक उदभवणार्‍या प्रसंगाला सामोरे जाताना खर्च वाढण्याची शक्यता आहे. स्वधर्मावर निष्ठा वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. अचानक येणार्‍या जबाबदार्‍या सहज पेलवू शकाल. शुभ तारखा : 23 ते 28

कन्या - अनुभव हा सर्वात मोठा गुरू

सरकारी खात्यात काम करणार्‍या मंडळींना स्वकर्र्तृत्वाने अधिकाराची प्राप्ती होईल. संततीविषयक काही समस्या असतील तर त्याबाबतीत समाधानकारक मार्ग निघेल. स्वामीनिष्ठा राखण्याचा प्रयत्न जरूर करा. अनुभव हा सर्वात मोठा गुरू असतो. त्यामुळे केवळ आर्थिक लालसा न ठेवता मिळणार्‍या संदेशाचा प्रत्यक्ष जीवनात पुरेपूर फायदा करून घेण्याचा प्रयत्न करा. उष्ण शरीर प्रकृतीचे दुष्परिणाम दिसण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच उपचार करावेत. घर खरेदी सारखे व्यवहार सुरळीत होतील. आर्थिक व्यवहारात नियोजन करावे लागेल. संगती संग दोष: हे वचन सिद्ध आहे. आपण कुणाच्या संगतीत वावरत आहोत त्याचे शुभाशुभ परिणाम नक्की मिळणार, त्यामुळे कोणतेही पाऊल टाकताना काळजीपूर्वक टाका. शुभ तारखा : 23, 27, 28

तूळ - फायदा वाढविणारे निर्णय घ्याल

हा आठवडा महत्त्वपूर्ण उलाढालीचा राहील. मोठमोठ्या व्यवहारात प्रत्यक्ष सहभाग घेऊन फायदा वाढविणारे निर्णय कराल. कौटुंबिक जीवनात काही प्रमाणात तारेवरची कसरत करावी लागेल. राजकारणात कार्यरत असाल तर नावलौकिक वाढेल. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवल्याने समाजमनात सकारात्मक संदेश जाईल. स्वतःतील उणिवा दूर करण्याचा केलेला प्रयत्न जीवनाला दिशादर्शक आणि इतरांना आदर्श घेण्यासारखा असेल. शुभ तारखा : 23, 24, 27,

वृश्चिक - कौटुंबिक सौख्य उत्तम राहील

बर्‍याच काळापासून निर्माण झालेली अस्थिरता काही प्रमाणात संपुष्टात यायला सुरुवात होईल. कौटुंबिक सौख्य उत्तम राहील. आर्थिक विवंचना कमी होऊ शकेल. हातात आलेला पैसा कसा कुठे फिरवता येईल याबाबत तज्ज्ञांशी सल्लामसलत करा. अचानक वाढणार्‍या खर्चाच्या प्रमाणामुळे मनस्थिती काही प्रमाणात दोलायमान होऊ शकेल. शेतकर्‍यांसाठी सकारात्मक वातावरण तयार होण्यासाठी हा काळ अनुकूल राहील. आपण घेतलेले निर्णय आपणास फायदा मिळवून देतील. शुभ तारखा : 23 ते 26

धनू- कामाला न्याय द्या

आपण ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्याच कामात मन गुंतविण्याचा प्रयत्न करा अथवा त्याच कामाला न्याय द्या. विद्यार्थ्यांसाठी हस्ताक्षर स्पर्धा किंवा चित्रकला स्पर्धा यासारख्या विषयात भाग घेतल्यास अतुलनीय यशप्राप्ती होऊ शकेल. धार्मिक कार्यात सहभागी होऊन मंत्रमुग्ध वातावरणाचा सुखद आनंद प्राप्त होण्यासारखा काळ आहे. विद्यार्जनासोबतच जोड व्यवसाय करता येऊ शकेल. मंगल कार्याच्या तारखा निश्चित होतील. शुभ तारखा : 23 ते 28

मकर - प्रलंबित कामांना गती देण्याचा प्रयत्न

गेल्या काही काळापासून शोधत असलेला मार्ग सापडेल. धोकादायक परिसरातील प्रवास टाळावा. समाजसेवा करताना जास्त अपेक्षा ठेवणे मनस्तापास कारणीभूत ठरू शकेल. सरकार दरबारी प्रलंबित कामांना गती देण्याचा प्रयत्न करा. आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल स्थिती नाही. त्यामुळे कोणतेही व्यवहार करताना काळजीपूर्वक करा. कौटुंबिक सौख्य साधारण राहील. शुभ तारखा : 25 ते 28

कुंभ - दागिने वापरताना काळजी घ्या

या आठ्वड्यात आपण केलेल्या कामाला यश प्राप्त होईल. आपण जर कोणत्या संस्थेवर कार्यरत असाल तर तिथं तुमची सन्मानाच्या पदावर नियुक्ती होऊ शकेल. प्रवासाने दगदग वाढेल. आपणास जाणवणारा विकार फारसा हानिकारक नसला तरी त्याची दाहकता मात्र सहन करण्याची तयारी ठेवावी. अकारण कोणाविषयी केला गेलेला गैरसमज आत्मोन्नतीस बाधक ठरेल. दागिने किंवा आभूषण वापरताना त्याची काळजी घेण्याची आवश्यकता वाटते. आपल्या बाबतीत वस्तू गहाळ होणे किंवा चोरी होणे असे प्रकार घडू शकतात. शुभ तारखा : 23, 24, 27, 28

मीन - वागण्यात बोलण्यात समतोल राखा

या आठवड्यात देण्याघेण्याचे व्यवहार, सावकारी सारखे व्यवहार तेजीत चालतील. विरोधकांवर प्रभावी वक्तृत्वाने मात कराल. उत्पनाची नवनवीन साधने उपलब्ध होतील. मित्रपरिवाराकडून उत्तम सहकार्य मिळेल. विवाह इच्छुकांची विवाह विषयक सकारात्मक बोलणी होतील. सुवर्णाची खरेदी करू शकाल. आपण आपल्या वागण्यात बोलण्यात समतोल राखण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक विषयात तोलून मापून घेण्याची सवय असल्याने महत्त्वाच्या कामात निर्णय करण्यास विलंब होऊ शकतो. शुभ तारखा : 25, 26, 28

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com