
मेष- गुंतवणुकीतून अपेक्षित लाभांश
व्यापारी लोकांसाठी महत्वपूर्ण उलाढालीचा हा आठवडा आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा अपेक्षित लाभांश मिळू शकेल. तात्विक स्वरूपात केलेल्या कोणत्याही चर्चांना सकारात्मक प्रतिसाद मिळेल. पारिवारिक स्थिती उत्तम राहील. कामकाजात उत्तम प्रगती दिसून येईल. जुने मित्र मैत्रिणींच्या भेटी होण्याचे योग. विविध वैविध्यपूर्ण गोष्टींमध्ये समरस होण्याची सवय फायदेमंद ठरेल. प्रतिकूल परिस्थितीत यशस्वी होण्यासाठी, सतत यश मिळविण्यास सक्षम असल्याचे दिसून येईल.
शुभ तारखा : 14, 15, 16
वृषभ - हुशारीने पैशांची गुंतवणूक करा
पूर्वी केलेले व्यवहार मार्गी लागण्यासाठी अनुकूल वातावरण तयार होत आहे. परिवारासाठी वेळ द्यावा लागेल. डोळ्याचे विकार त्रासदायक ठरू शकतात. नोकरी व्यवसायात अनपेक्षित लाभ होतील. समव्यावसायिकांची साथ मिळेल. सामूहिक कार्यात जबाबदारी घ्यावी लागेल. सामाजिक प्रतिष्ठा मानसन्मान मिळू शकतील. दगदग-धावपळीचा आठवडा आहे. स्नेह वाढेल. सामाजिक बांधिलकी जपताना आर्थिक झळ सहन करावी लागेल. न्यायालयातील प्रलंबित प्रकरण मार्गस्थ होण्याची शक्यता आहे पण संयम बाळगणे गरजेचे आहे. नोकरीमध्ये अधिक जबाबदारी स्वीकारावी लागेल. सरकार दरबारी अडकून पडलेल्या कामांना गती मिळेल. अत्यंत हुशारीने निर्णय घेत, पैशाची गुंतवणूक करा. दूरचे प्रवासाबाबत नियोजन होण्याची शक्यता आहे.
शुभ तारखा : 16, 17
मिथुन- नोकरीत पदोन्नती होईल
उच्च वैचारिक पातळीमुळे कोणत्याही निर्णयातील फायद्या तोट्याचे परिणाम किंवा त्याचे अंदाज मांडण्यात मोलाची कामगिरी बजावाल. मित्रपरिवाराची अपेक्षित साथ मिळेल. विवाह इच्छुकांसाठी आनंदाची बातमी देणारा हा आठवडा आहे. भागीदारीतील व्यवसाय फायद्यात राहतील. शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कामगिरी कराल. वाडवडिलांनी करून ठेवलेली तरतूद या काळात प्रत्यक्ष उपयोगास पडेल. नोकरीत पदोन्नती होईल. विवाहाची बोलणी अंतिम टप्प्यात येईल. आपल्या वडिलांचा सल्ला आणि अनुभव आपली आर्थिक स्थिती सुधारण्यात भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. अचानक धनलाभ होईल. प्रलंबित प्रश्न सुटतील.
शुभ तारखा : 13, 14
कर्क- आर्थिक स्थिती मजबूत होईल
आरोग्याच्या बाबतीत हा आठवडा चांगला आहे. योग आणि व्यायामाला कमी पडू देऊ नका आणि शक्य तितक्या हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा. अनेक गोष्टी आपल्यासमोर उभे राहतील तेव्हा जेव्हा आपले कुटुंब आणि आपले मित्र आधारस्तंभांसारखे उभे असतील. प्रलंबित प्रश्न सुटतील. धार्मिक स्थळाला भेट द्याल. प्रवास दरम्यान तब्येतीची काळजी घ्यावी. आर्थिक स्थिती मजबूत होईल. मित्र आणि कुटुंबाचा पाठिंबा देईल. कौटुंबिक वातावरणात आनंदाची लाट दिसेल. नवीन वाहन खरेदीचा विचार कराल.
शुभ तारखा ः 15, 16, 17
सिंह- अकारण वादात उडी घेऊ नका
महत्वाच्या कामाबाबत गुप्तता बाळगणे हिताचे राहील. अकारण दुसर्याच्या वादात उडी घेऊ नका. न्यायालयीन कामकाजात अडथळा निर्माण होईल असे वागणे संकटाला आमंत्रण ठरू शकेल. जवळच्या नातेवाईकांची साथ मिळेल. भागीदारीत नवीन व्यवसाय करण्याची संधी चालून येईल. सत्पुरुषांचा सहवास मिळेल. उत्तम आर्थिक फायदा मिळेल . तिर्थक्षेत्राच्या सहलीला जाल. मानसिक संतुलन ढासळल्याने आपत्तीजन्य स्थितीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. खोल पाण्यात जाणे टाळावे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी येण्याची शक्यता आहे.
शुभ तारखा : 18, 19
कन्या - कर्तव्यात कसूर करू नका
जमिनीचे व्यवहार करण्यासाठी अत्यंत शुभ आठवडा आहे. घरातील सुभोभिकरणाच्या अथवा गृहउपयोगी वस्तू खरेदी करु शकाल. प्राकृतिक कारणाने विचलितपणा निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकार दरबारी अडकून पडलेल्या कामांना गती मिळेल छोट्यामोठ्या शस्त्रक्रिया देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्तव्यात कसूर रहाणार नाही याची दक्षता घ्या. हितशत्रूंपासून सावध रहा. त्यांच्या कारवायांवर लक्ष ठेवा. वडिलांचा सल्ला आणि अनुभव आपली आर्थिक स्थिती सुधारण्यात भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. लाभाचे पद मिळण्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होईल. वडिलोपार्जित संस्कारांचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग होईल.
शुभ तारखा : 15, 16, 17
तूळ- कामाचा उत्साह वाढेल
मनाला आनंद देणारा सुखद अनुभव येईल. प्रसन्न वातावरणात आठवड्याची सुरुवात झाल्याने कामाचा उत्साह अधिक वाढेल. नवविवाहीतांना आनंदाची बातमी समजेल. वातावरण बदलल्याने होणारे साथीचे रोग तापदायक ठरू शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उत्तेजन मिळेल. धार्मिक स्थळाला भेट द्याल. संततीविषयक प्रश्न मार्गी लागतील. आर्थिक स्थिती सुधारण्यात भविष्यासाठी उपयुक्त ठरेल. कौटुंबिक जीवनासाठी सप्ताह चांगला असेल. बेपवाई, बेशिस्त, योजनेच्या कार्यवाहीत खोळंबा निर्माण करू शकते. ठरावीक वेळेत पूर्ण करण्याचे प्रयत्न करा.
शुभ तारखा : 16, 17
वृश्चिक- ध्येयपूर्तीस विलंब लागू शकतो
ठरविलेल्या दिशेने वाटचाल सुरु होण्यास मदतगार ग्रहस्थिती आहे. स्वतःच्या कर्तबगारीने कार्यपूर्तीस नेण्याची संधी उपलब्ध होईल. मन विचलित झाल्याने इष्ट ध्येय पूर्तीत विलंब लागू शकतो. प्राकृतिक स्थिती कमजोर रहाण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये अधिक जबाबदारी स्वीकारावी लागेल. कामकाजात काही प्रमाणात स्थित्यंतरे दिसून येण्याची शक्यता आहे. घर खरेदीचे व्यवहार मार्गस्थ होऊ शकतील.
शुभ तारखा : 15, 16, 17
धनू- नेत्रदीपक यशाकडे वाटचाल
चांगल्या मित्रांच्या सहाय्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. मानसिक स्थिती उत्तम राहील. प्रसन्न मनाने घेतलेले हाती घेतलेल काम यश प्राप्त करण्यास मदतगार ठरेेल. विद्यार्थी दशेत नेत्रदीपक यशाकडे वाटचाल होईल अशा प्रकारच्या मानसिकतेने अभ्यास कराल. इष्ट ध्येय साध्य करण्यासाठी पूरक ग्रहस्थिती आहे. उत्तम आर्थिक फायदा मिळेल. आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक मजबूत होतांना दिसेल.
शुभ तारखा : 13, 14, 17
मकर- न्यायालयीन कामकाजात काळजी घ्या
आठवड्याची सुरुवात धावपळीच्या जीवनाने होत आहे. ठरवलेला मुकाम हस्तगत करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करावे लागतील. विरोधकांची मनधरणी करावी लागेल. अतिविश्वासाने कोणतेही निर्णय घेऊ नका. आठवड्याचा मध्यंतर काही प्रमाणात दिलासा देणारा असेल. न्यायालयीन विभागाशी संबंधित व्यवहार हाताळताना काळजी घ्या. डोकेदुखीसारखे विकार त्रस्त करतील. प्रवास टाळले हितकारक ठरतील.
शुभ तारखा : 14, 16
कुंभ-हितशत्रूंपासून दूर रहा
खर्चावर काबू ठेवण्याची आवश्यकता मंद गतीने का होईना अपेक्षित दिशेने वाटचाल सुरु राहील. विद्यार्जनासाठी अत्यंत दिशादर्शक काळ आहे. नोकरीमध्ये प्रशिक्षणासाठी जाण्याचे योग संभवतात. दुसर्याच्या व्यवहारात न पडणे हितकारक ठरेल. हितशत्रूंचा सुळसुळाट वाढण्याची शक्यता आहे. कामकाजातील गुपित उघड होणार नाहीत याची काळजी घ्या.
शुभ तारखा : 16, 17, 18
मीन- घर खरेदी व्यवहारात प्रगती
जवळच्या स्नेहीजनात घडणार्या घटना उल्हासवर्धक असतील. नवचैतन्याने पुढील मार्गक्रमण कराल. घर खरेदीसारख्या व्यवहारात प्रगती दिसून येईल. आर्थिक व्यवहार करताना त्यात्या क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेणे उपयुक्त ठरेल. वाहने सावकाश चालवा. आरोग्याची काळजी घ्याल. जुन्या मित्र मैत्रिणींच्या भेटी होतील.
शुभ तारखा : 16, 17, 18