साप्ताहिक राशीभविष्य Weekly horoscope

15 ते 21 जुलै 2021
साप्ताहिक राशीभविष्य Weekly horoscope
साप्ताहिक राशीभविष्यweekly Horoscope

मेष - नव्या योजनांवर काम

नव्या योजनांवर काम करण्याचे योग आहेत. मात्र आळस आणि आव्हानांमुळे त्या टाळण्याकडे कल चुकीचा ठरेला. सहकार्‍यांकडून सहकार्याची अपेक्षा पूर्ण न झाल्याने मन खिन्न होईल. राजकारणात मोठ्या पदाची अपेक्षा असेल तर आणखी काही काळ प्रतिक्षा करावी लागेल. प्रेमसंबंधात काही गैरसमज होण्याचे योग आहेत. यासाठी ओळखीतील महिलेच्या मदतीने मार्ग काढा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खाण्यापिण्याच्या सवयी बिघडणार नाही, याची काळजी घ्या. सहचरणीची आपल्या पाठीशी ठामपणे उभी राहील. शुभ तारखा : 15, 18

वृषभ - आनंददायी क्षणांचा काळ

हा आठवडा आपल्यासाठी आनंदवार्ता घेवून आला आहे. नोकरी आणि व्यवसाय अशा दोन्ही स्तरावर योजना सफल होतील. प्रतिष्ठीत व्यक्तीच्या सहकार्यामुळे आखलेल्या योजना पूर्ण होतील. जमीन-संपत्तीचा वादाविषयक न्यायालयीन खटल्यात यश मिळेल. प्रवासाचे योग आहेत. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत. गुंतवणूक करताना घाईगर्दी टाळा. प्रेमसंबंधात एकमेकांवरील विश्वास वाढेल. वैवाहिक जोडीदाराशी संबंध अधिक मधूर होतील. संततीकडून आनंददायी वार्तांचे क्षण आपल्या वाट्याला येणार आहेत. शुभ तारखा : 13, 15

मिथुन - समस्यांचे उत्तर मिळेल

काही काळापासून आपण व्यवसायात समस्यांना तोंड देत आहात. हा आठवडा आपल्यांना या समस्यांचे उत्तर शोधण्यास मदत करणार आहे. मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने मार्ग निघेल. नोकरदारांसाठी चांगला काळ. रोजगारच्या शोधात असाल तर वेग वाढवा. संधी मिळण्याचे संकेत आहेत. आप्तस्वकीयांकडून सुखद धक्का मिळेल. जोडीदारासोबत जीवनातील आनंदी क्षण साजरे करा. युवावर्ग मित्र सुटीच्या मुडमध्ये असतील तर त्यांना मित्रांची साथ लाभेल. शुभ तारखा : 17, 20,21

कर्क - वाद जास्त वाढवू नका

या आठवड्यात अधिक परिश्रम आपल्या वाट्याला आले आहेत. मात्र आपल्या स्थितीत सुधारणा करण्यासाठी हे परिश्रम मदतीचे ठरतील. नातेवाईकांकडून मदतीचे आश्वासन मिळेल. त्याच्यावर अधिक विसंबून राहून नका. ऐनवेळी ते अंग काढून घेतील. व्यवसायात काही मनाविरोधी गोष्टी घडतील. प्रेमसंबंध किंवा वैवाहिक आयुष्यात जोडीदाराशी वाद अधिक ताणला जाणार नाही, याची काळजी घ्या. कडवट शब्दांचा वापर करू नका. आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार घ्या. शुभ तारखा : 15 , 17

सिंह - कठीण प्रसंगावर उपाययोजना

कार्यक्षेत्रात विरोधकांच्या त्रासाचा सामना करावा लागेल. स्पर्धकांकडून सुरू असलेल्या कारवायांवर लक्ष ठेवा. त्यांचे डाव उलटविण्यासाठी सज्ज राहा. कठीण प्रसंगावर उपाययोजनाही आपणास स्वत:च्या हिमतीवर करायची आहे. मित्रांकडून मदतीची अपेक्ष न ठेवलेली बरी. व्यवसायातील अडचणी सप्ताहाच्या प्रारंभाला कमी होताना दिसतील. नोकरदारांच्या बदलीचे योग आहेत. प्रेमसंबंधात भावनेत वाहून जावू नका. विवेकाने वागा. घरातील ज्येष्ठ सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या.शुभ तारखा : 15, 16

कन्या - स्वप्ने साकार होतील

आपण पाहिलेली स्वप्ने साकार होणार आहेत. या आठवड्यात आपली भेट एखाद्या प्रतिष्ठीत व्यक्तीशी होईल. ज्यांच्या मदतीने भविष्यात आपल्यासाठी यशाची कवाडे उघडी होतील. राजकारणात असणार्‍यांना मोठे पद किंवा जबाबदारी सांभाळण्याचे योग आहेत. न्यायालयीन खटल्यात निकाल आपल्या बाजूने लागल्यानंतर मनावरील ताण कमी होईल. वैवाहिक जीवनात आनंददायी काळ मात्र जोडीदाराचे आरोग्य काळजी वाढविणार ठरेल. पाल्यांच्या भविष्याची चिंता सतावेल. मात्र मनावर अतिरिक्त ताण न घेता आनंदी रहा. शुभ तारखा : 19 व 21

तूळ - बढतीचे योग

आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. लाभ आणि प्रगतीचे क्षण अनुभवण्याचे योग आहेत. नोकरीच्या शोधात असणार्‍यांना यश मिळणार आहे. नोकरीत असलेल्यांना बढतीचे योग आहेत. नोकरदार महिलांसाठी अधिक अनुकूल काळ आहे. राजकीत इच्छापूर्ती होईल. जमीन किंवा निवासासंबंधी एखादा मोठा निर्णय घेण्यापूर्वी सल्ला घेतलेला बरा. प्रेमसंबंधात सावधपणे पावले टाका. गैरसमज वाढणार नाहीत, याकडे लक्ष द्या. अन्यथा अनावश्यक त्याचे परिणाम होतील. विद्यार्थी अभ्यासात व्यस्त राहतील. शुभ तारखा : 18, 20

वृश्चिक - व्यवसायात विस्ताराची योजना

प्रवासात आपले आरोग्य आणि सामानाची काळजी घ्या. मित्र किंवा कुटुंबियांसोबत पर्यटनाचे योग आहेत. कार्यक्षेत्रात वरिष्ठ आणि कनिष्ठ सहकार्‍यांची मदत होणार आहे. व्यवसायात विस्ताराची योजना साकारत आहे. मात्र विस्ताराच्या योजनेवर काम करत असताना लक्ष विचलीत करणार्‍या बाबींकडे कानाडोळा करा. कोणताही निर्णय विचाराअंती घ्या. महिलांसाठी हा आठवडा धार्मिक कार्यात व्यस्त असेल. शुभ तारखा : 16, 19

धनू- स्वत:ला सिद्ध करा

या आठवड्यात चालून आलेली संधी सोडू नका. आपणास या आठवड्यात आपल्याला स्वत:ला सिद्ध करण्याचे योग आहेत. मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर आपली उपयोगिता सिद्ध करा. कोणत्याही आव्हानांचा विचार न करता पुढील पाऊल टाका. घरात भावंडांशी अनावश्यक गैरसमज निर्माण होईल. वडिलधार्‍यांच्या मदतीने तो दूर करा. जोडीदार आणि मुलांकडून सुखद समाचार मिळेल. प्रवासाचे योग आहेत. शुभ तारखा : 19, 20

मकर - गुंतवणूक सावधपणे करा

या आठवड्यात आपल्याला यशासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे. नोकरीत आपल्या वरिष्ठांशी काही गोष्टींवर मतभेद होतील. व्यवसायात गुंतवणूक किंवा पैशाची देवाण-घेवाण करताना सावधगिरी बाळगा. प्रेमसंबंधात जोडीदारा विश्वास उडेल असे वागू नका. वैवाहिक आयुष्यात जोडीदराच्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. वाहन चालवितांना वेगावर नियंत्रण ठेवा.शुभ तारखा : 15, 18

कुंभ - अनावश्यक वाद टाळा

जवळच्या व्यक्तींच्या शंकास्पद हालचालींवर लक्ष ठेवा. विरोधकांकडून आपल्या कामात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न होईल. मात्र अनावश्यक वादात न पडता आपल्या कामावर लक्ष केंद्रीय करा. नोकरीत वरिष्ठांबद्दल मनात असंतोष वाढेल. मात्र परिस्थितीचे भान ठेवा. महिलांनी भावनांवर नियंत्रण ठेवावे. अडचणींच्या क्षणात जीवनसाठी खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा राहील. शुभ तारखा : 17, 18

मीन - कौटुंबिक जबाबदार्‍यांचा दबाव

कौटुंबिक जबाबदार्‍या पूर्ण करण्याचा दबाव या आठवड्यात जाणवेल. कामकाजानिमित्त प्रवास होईल. व्यवसायात हा काळ सांभाळून पाऊल टाकण्याचा आहे. आवेग किंवा घाईगर्दीत कोणताही निर्णय घेवू नका. धार्मिक आणि सामाजिक कार्याकडे ओढा राहील. वैवाहिक आयुष्यात क्षुल्लक कारणावरून वाद नको. अन्यथा त्याचे पडसाद उमटतील. प्रेमसंबंधात जोडीदाराच्या भावना समजून घ्या. शुभ तारखा : 20, 21

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com