
मेष- अधिक लाभामुळे धावपळ वाढेल
हा आठवडा स्थिर आणि शांत आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासात प्रयत्नपूर्वक एकाग्रता साधावी. वडिलोपार्जित वाटाघाटींना हा आठवडा चालना देईल. व्यावसायिक स्तरावर हा आठवडा आनंदी वधावपळीचा आहे. अधिक लाभामुळे धावपळ वाढेल. लांबच्या प्रवासासाठी हा आठवडा फारसा उपयुक्त नाही. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी अनुकूल काळ आहे. आर्थिक गुंतवणूक करताना व्यावहारिक गणित मांडा. अधिकारात वाढ होऊ शकेल. प्रशिक्षणासाठी लाभदायक काळ आहे. नोकरीमध्ये हुशारीला आणि कौशल्याला सुयोग्य संधी दृष्टिक्षेपात येईल. त्यासाठी प्रशिक्षण घेण्याची तयारी असेल.
शुभ तारखा : 14, 16
वृषभ -कमाईमध्ये वाढ होण्याचे योग
मानसिक अस्वस्थता वाढवणारा काळ. जोडीदार, जिवलग व्यक्तींच्या बाबतीत ही अस्वस्थता वाढेल. शांत राहून चर्चा करणे चांगले. पुढील आठवड्यात परिस्थिती अनुकूल होईल. तोपर्यंत मनःस्ताप होणार्या,अस्वस्थता वाढवणार्या विषयांकडे कानाडोळा करा. मन:स्वास्थ्य जपा. वाद टोकाला पोहोचणार नाहीत याची काळजी घ्या. सौंदर्य आणि सजावट क्षेत्रातील व्यक्तींसाठी हा आठवडा प्रगतीकारक. कमाईमध्ये ही वाढ होण्याचे योग. नोकरी करणार्या व्यक्तींसाठी हा आठवडा शुभ. सामाजिक स्तरावर केलेल्या कामाची पावती मिळाल्याचं आनंद प्राप्त होईल. दैवी शक्तीवरील भाव दृढ करण्याची आवश्यकता आहे. खर्च करावा लागेल. उसनवारी टाळा. नोकरीत वरिष्ठांची खुशामत केलीत तर कामाचा ताण वाढेल. घरामध्ये पाहुणे, नातेवाईक यांच्यामध्ये वेळ कसा गेला हे समजणारही नाही.
शुभ तारखा : 16, 17,18
मिथुन- आर्थिक लाभ होईल
हा आठवडा अत्यंत आनंदी, वेगवान आणि अनुकूल घडामोडींचा आहे. आर्थिक लाभ होईल. नवीन प्रॉपर्टी घेण्याचे विचार मनात सुरू होतील आणि खरेदी प्रत्यक्षात केली जाईल. वयोवृद्ध व्यक्तींसाठी विशेष खरेदी होईल. त्यांचे आशीर्वाद मिळतील. राजदरबारात मानमान्यता मिळेल. जवळचे प्रवास कराल. तीर्थयात्रा किंवा मंगल कार्यात सहभागी व्हाल. वरिष्ठांकडून तुम्हाला चांगले मार्गदर्शन मिळेल तुमचे कौतुक होईल. कोणतेही नवीन पाऊल उचलताना काळजीपूर्वक उचला. व्यवसायासाठी नवीन संधी चालून येतील. सांसारिक जीवनात खर्च वाढल्याने वादविवाद होतील.
शुभ तारखा : 15, 17, 18
कर्क- सकारात्मक दृष्टीेकोन ठेवा
हा आठवडा तुमच्या जीवनातील विशेष आठवडा असेल. कौटुंबिक स्तरावर हा आठवडा शुभदायी. सखोल विचारात गुंतून जाल. प्रयत्नपूर्वक हे विचार सकारात्मक ठेवायचा प्रयत्न करा. यापूर्वी जीवनात घडलेल्या घटना आणि यानंतरच्या जीवनातील निर्णय याविषयी मन फार गांभीर्याने विचार करू लागेल. दुःखद घटनांचा फार विचार करू नका. सकारात्मक दृष्टीेकोन ठेवून वाटचाल करा. बेकार व्यक्तींनी तडजोड करायची तयारी ठेवली तर नोकरी मिळू शकेल. मुलांच्या प्रगतीकडे जातीने लक्ष द्यावे लागेल. जीवनात निराशा येणार नाही. जुन्या मित्र मैत्रीणींच्या भेटीचे योग.
शुभ तारखा : 13, 14, 15
सिंह- आर्थिक स्थिती बरी
वाहन खरेदी टाळा. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. या आठवड्यात संततीसंबंंधी शुभ वार्ता मिळेल. सर्दी, खोकला, दमा, जुनाट आजार, वाढण्याची शक्यता. दुर्लक्ष करू नये. योग्य उपचार घ्यावेत. लगेच आराम मिळेल एकंदर, अनुकूल आठवडा. तरीही सावधानतेेने मार्गक्रमण करावे. व्यवसायउद्योगात काही कामात स्वत: पुढाकार घ्याल. पण ते न जमल्याने मध्यस्थांचा वापर करावा लागेल. खर्च भागवण्याइतकी आर्थिक स्थिती बरी असेल. नोकरीत वेगळ्या पद्धतीचे काम हाताळावे लागेल. त्यातील बारकावे लक्षात आल्यावर थोडासा तणाव जाणवेल. घरामध्ये मित्रमंडळींची वर्दळ राहील.
शुभ तारखा : 14, 17, 18
कन्या - अचानक धनलाभ योग
कमी बोलून आणि सकारात्मक चर्चा करून समस्या सुटतील. यापूर्वीच केलेल्या आर्थिक गुंतवणुकीचा लाभ या आठवड्यात होईल.भावंडे, भागीदार, मित्रपरिवार त्रासदायी ठरू शकतात. परिस्थितीसाठी आधीपासून तयार राहा. नवीन आर्थिक गुंतवणूकदारांना हा आठवडा सोयीचा नाही. थोडे थांबणे योग्य. कौटुंबिक वातावरण अन्य व्यक्तीमुळे बिघडेल. कुटुंबातील सदस्यांनी एकत्रित चर्चा आणि एकमताने निर्णय घेणे आवश्यक. घरी छोटेसे धार्मिक कार्य कराल. नोकरीमध्ये स्वत:च्या कामाचे आणि स्वत:चे महत्त्व वाढविण्यासाठी युक्तीचा वापर कराल. घरामधील एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील सुखद प्रसंगाची नांदी होईल.
शुभ तारखा : 15, 17, 19
तूळ- नवीन संधी चालून येतील
आठवडा तुमच्या धैर्याची परीक्षा पाहणारा आहे. मानसिक ताण फार वाढू देऊ नका. सहकार्यांकडून,समवयस्क लोकांकडून आणि भावंडांकडून मदत मिळेल. विशिष्ट ध्येयाच्या मागे असाल तर हा आठवडा त्या कामात अडथळे आणू शकतो. शिक्षण,नोकरी,विवाह,आर्थिक गुंतवणूक आणि व्यापार वृद्धी अशा काही विषयांशी संबंधित निर्णय घेताना सावधानता बाळगा किंवा काही दिवस पुढे ढकला. संततिविषयीग्रहमान शुभ आहेत. व्यवसायासाठी नवीन संधी चालून येतील. मित्रमंडळी किंवा नातेवाईकांकडून समारंभाचे निमंत्रण येईल.
शुभ तारखा : 15, 16, 17
वृश्चिक- मोठे यश मिळवाल
सरकारी नियमाविरुद्ध वागणार्या लोकांना हा आठवडा त्रासदायक जाईल कदाचित तुमच्या जोडीदाराला सुद्धा यातून त्रास संभवतो. तुम्हाला मन:स्ताप देणार्या व्यक्ती या आठवड्यात उजेडात येतील मात्र टोकाची भूमिका नको. आठवडा धावपळीचा आणि कस पाहणारा असेल. यापूर्वी तुम्ही नीतिमत्तेने वागला असाल तर फार मोठे यश मिळवाल. अन्यथा तुम्ही तुमच्या तत्त्वांमध्ये आणि वर्तनामध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. एखाद्या सहकार्याचे काम करावे लागेल. प्रवासाचे बेत ठरतील. तरुणांनी हात राखून खर्च करावा.
शुभ तारखा : 16, 17
धनू- आनंदाच्या घटना घडतील
उत्तम ग्रहमान. आनंदाच्या घटना घडतील. आठवडा समाधानाने पार पडेल. मोठे निर्णय घेण्यासाठी योग्य काळ. नोकरी,व्यापार,शिक्षण,आरोग्य,विवाह, संतती-इच्छा सर्वच बाबतीत अनुकूल काळ. ज्यांनी तुम्हाला तुमच्या जीवनात यापूर्वी मदत केलेली आहे. त्यांचे ऋण फेडा म्हणजे त्यातून अधिक चांगले घडेल. आधुनिकता आणण्याच्या प्रयत्नात मोठी गुंतवणूक होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. नोकरीमध्ये अधिकार वाढले की जबाबदारी वाढते याची प्रचीती येईल.
शुभ तारखा : 14, 15, 16
मकर- कागदपत्रांची पडताळणी करा
दूर असणारे प्रियजन भेटतील. आवडीने,हौसेने प्रवास घडेल. शिक्षण आणि नोकरीविषयक चांगल्या घटना घडतील. आजोळाकडून लाभ मिळतील. कौटुंबिक स्तरावर हा आठवडा खूप छान! संक्रांतीच्या पर्वकालात शक्य तितका दानधर्म जरूर करा. संपूर्ण आठवडा उत्तम ग्रहमान आहे. प्रकृती स्वास्थ्य चांगले राहील. नवीन नोकरीच्या प्रयत्नात असणार्यांना मनाप्रमाणे संधी लाभेल.
शुभ तारखा : 13, 14, 15
कुंभ-समस्यांमधून मुक्तता
आठवडा चैतन्य आणि उत्साह देईल. आरोग्यासंबंधी असणार्या समस्या काही अंशी दूर होतील. आयुष्याकडे बघण्याची सकारात्मकता वाढेल. कोणाला त्रास दिलेला असेल तर धैर्याने माफी मागा. यामुळे भविष्यात येणार्या अनेक समस्यांमधून मुक्तता होऊ शकेल. कौटुंबिक स्तरावर हा आठवडा सर्वसाधारण चांगला राहील. ज्येष्ठांचे आशिर्वाद मिळतील. प्रतिष्ठित व्यक्तींच्या ओळखींचा बराच उपयोग होईल. पूर्वी केलेल्या कामातून नवीन संधी मिळतील. नोकरीच्या प्रयत्नास यश मिळेल.
शुभ तारखा : 12, 13
मीन- आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा
कला-कौशल्यातून उद्योग करणार्या व्यक्तींना मोठे यश या आठवड्यात मिळेल. कामातील सातत्यावर भर द्या. भागीदारीत आणि मदत करताना सावध राहा. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रातील वरिष्ठांकडून तुम्हाला चांगले मार्गदर्शन मिळेल तुमचे कौतुक होईल. मात्र टोकाच्या अपेक्षा टाळा. आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल. नवीन वर्षांतील नवीन उपक्रमांमध्ये गुप्तता पाळा.
शुभ तारखा : 13, 14, 15