साप्ताहिक राशीभविष्य Weekly Horoscope

8 ते 14 जुलै 2021
साप्ताहिक राशीभविष्य Weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्यweekly Horoscope

मेष : सकारात्मक विचार करा

आठवडा आपल्यासाठी सकारात्मक विचार घेवून आला आहे. संसारातील जाबबदार्‍या आणि कामात व्यग्र असला तरी आपण सकारात्मक राहाल. नोकरदारांवर अधिक जबाबदार्‍या येवू शकतात. विद्यार्थ्यांच्या मनावर अभ्यासाचा ताण असेल. वैवाहिक आयुष्यात जोडीदारासोबत गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्या. घरातील ज्येष्ठांच्या मदतीने वादावर मार्ग काढा. राजकारणात असलेल्यांना यशासाठी आणखी वाट पाहावी लागेल. सरकारी कर्मचार्‍यांसाठी साधारण आठवडा ठरेल. शुभ तारखा : 9, 12, 13

वृषभ : आव्हानांचा काळ

आठवडा आपल्यासाठी आव्हाने घेवून आला आहे. मात्र या आव्हानांना समर्थपणे तोंड द्या. नोकरी-उद्योगासोबत आपण आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. उधार-उसनवारीपासून सावध रहा. शेअर किंवा तत्सम व्यवहारांपासून दूर राहणे उचित. अशा व्यवहारांमध्ये सावधानता बळगली नाही तर फटका बसेल. आठवड्याचा प्रारंभाला महत्त्वाची कामे मार्गी लावा. कामे टाळली तर लांबणीवर पडतील. शिक्षण क्षेत्रातील निगडीत किंवा शालेय साहित्याची विक्री व्यवसायात फायदा होईल. नोकरदारांना बदलीचे योग आहेत किंवा स्थानबदल होण्याचे संकेत आहेत. वैवाहिक आयुष्यात आनंद मिळणार आहे. तर प्रेमप्रकरण अधिक दृढ होईल. शुभ तारखा : 10, 14

मिथुन : परिश्रम सत्कारणी

आपल्या राशीला या आठवड्यात अधिक परिश्रमाचे योग आहेत. घरात आणि कामाच्या ठिकाणी अनेक कामे आपल्याला हातावेगळी करावी लागतील. मात्र आपले परिश्रम सत्कारणी लागणार आहेत. त्यामुळे परिश्रमही आनंददायी ठरतील. आठवड्याच्या प्रारंभाला महत्त्वाच्या भेटीगाठी होतील. त्यांचा लाभ भविष्यात होणार आहे. कर्ज घेणे टाळा. आपल्या रहस्यांबाबत इतरांशी चर्चा न केलेली बरी. विरोधक याचा फायदा घेण्याची शक्यता आहे. जोडीदार आपणासाठी आनंदाची बातमी देणार आहे. शुभ तारखा : 8, 10, 11

कर्क : हातून समाजसेवा घडेल

आपणास समाजसेवेचा योग आहे. मात्र आपले प्रयत्न योग्य ठिकाणी, योग्य व्यक्तींसाठी असेल याची काळजी घ्या. छुप्या विरोधकांचा त्रास संभवतो. त्यांच्यापासून सावध रहा. कोणत्याही प्रकारच्या स्पर्धेपासून अंतर राखा. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा. आपला ज्यूनिअर सहकारी आपल्यासाठी लाभाचे योग निर्माण करेल. इच्छा नसली तरी प्रवासाचे योग आहेत. महिला धार्मिक कार्यात व्यस्त राहतील. प्रेमसंबंधात जोडीदाराच्या भावनांकडे दुर्लक्ष नको. शुभ तारखा : 10 ,13

सिंह : एक पाऊल मागे फायद्याचे

आपल्या स्वभावाला मुरड घालावी लागेल. प्रत्येकावर वर्चस्व ठेवणे अडचणी निर्माण करेल. अन्यथा कामे बिघडतील. एखाद्या महत्त्वाच्या कामात एक पाऊल मागे घेणे फायद्याचे ठरेल. कोर्टकज्जे संवाद आणि समन्वयाने मार्गी लावा. मोठ्या योजनांमध्ये गुंतवणूक करताना दहा वेळा विचार करा. तात्पूरता फायदा भविष्यात नुकसानदायी ठरेल. वैवाहिक आयुष्यात जोडीदाराशी आणि प्रेमसंबंधात मित्र-मैत्रिणीशी प्रामाणिक रहा. घरातील ज्येष्ठांचे आरोग्य आपल्यासाठी चिंतेचे कारण ठरेल. शुभ तारखा : 8, 11

कन्या : सहकार्‍यांकडून मदत

या आठवड्यात आपणास कार्यक्षेत्रात आपल्या सहकार्‍यांकडून अनपेक्षीत मदत होणार आहे. त्यामुळे कामे मार्गी लावण्यास मदत होईल. एखादी नवी योजना सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. जमीन-संपत्तीचे व्यवहार काळजीपूर्वक करण्याची गरज आहे. अन्यथा चिंता वाढण्याची शक्यता आहे. भावनेच्या आहारी जावून कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेवू नका. त्यातून नुकसान संभवते. पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या. आठवड्याच्या मध्याला घेतलेले काही निर्णय भविष्यातील लाभाची गुंतवणूक ठरणार आहेत. शुभ तारखा : 12 व 13

तूळ - नोकरीची संधी

आपल्यासाठी हा आठवडा लाभदायक ठरणार आहे. काम किंवा नोकरीच्या शोधात असलेल्यांना यश मिळणार आहे. नव्या संधी मिळतील. व्यवसायात लाभ होईल. वडिलोपार्जित संपत्ती मिळण्याचे योग आहेत.आठवड्याच्या मध्याला घरात एखादे धार्मिक समारंभ होईल. जवळच्या तिर्थक्षेत्राला भेटीचे नियोजन कराल. तरूणांसाठी आठवडा सेलिब्रिट करण्याचा आहे. जोडीदारासोबत फुरसतीचे क्षण आनंद देतील. शुभ तारखा : 8, 11

वृश्चिक - संमिश्र यश

आपल्यासाठी संमिश्र यशाचा आठवडा आहे. आर्थिक लाभ आणि पाल्यांकडून आनंदाची बातमी मिळेल. मात्र जोडीदाराशी खटके उडण्याचेही संकेत आहेत. अनावश्यक मैत्री टाळा. त्यातून समाजात प्रतिमेला तडा जाण्याचा धोका आहे. कोर्टची पायरी चढावी लागेल. आर्थिक व्यवहार जपून करा. जोडीदार वादानंतरही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. शुभ तारखा : 09, 13

धनू - कामात झोकून द्या

या आठवड्यात आपल्याला लक्षपूर्तीसाठी झोकून काम करावे लागेल. परिश्रमाचे फळ चांगले मिळेल. आपल्या मेहनतीमुळे कार्यक्षेत्रात किंवा सहकार्‍यांकडून आपल्याला कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतील. कुटुंबातही यामुळे आनंदाचे वातावरण राहील. नोकरीच्या शोधात असाल तर प्रयत्न वाढवा. संधी मिळणार आहे. प्रवासाचे योग लाभदायक ठरतील. नव्या लोकांशी भेटीगाठी लाभदायक ठरतील. शुभ तारखा : 9, 14,

मकर - विवेक जागा ठेवा

आपल्या कामावरून लक्ष भटकण्याचे योग आहेत. कोणाच्या सांगण्यावरून निर्णय घेवू नका. आपला विवेक जागा ठेवा. संभ्रम असेल तर एखादा मोठा निर्णय टाळणे योग्य ठरेल. आठवड्याच्या मध्याला प्रवास करावा लागेल. प्रवासात आपले आरोग्य आणि सामानाची काळजी घ्या. वाहन हळू चालवा. महिला धार्मिक कार्यात व्यस्त राहतील. प्रेमप्रकरणात सावधपणे पाऊल टाका. शुभ तारखा : 13, 14

कुंभ - अडचणींशी सामना

आठवड्यात काही अडचणींचा सामना करावा लागेल. अपेक्षीत यश न आल्याने मन विचलीत राहील. त्यावर लवकर नियंत्रण मिळवा. अन्यथा कुटुंबात वादविवाद वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वादात स्वत:वरचे नियंत्रण सुटणार नाही याची काळजी घ्या. शब्द जपून वापरा. मार्ग काढण्यात कुटुंबातील महिलांची भुमिका महत्त्वाची ठरेल. त्यांची मदत होईल. व्यसनांपासून दूर रहा. शुभ तारखा : 11, 13

मीन - वेळ आणि मैत्रीचे महत्त्व जपा

आपल्याला वेळ आणि संबंध अशा दोन्ही आघाड्यांवर विशेष दक्षता घ्यायची आहे. महत्त्वाची कामे टाळण्याऐवजी वेळीच पूर्ण करण्यावर भर द्या. अन्यथा आपल्या वाटेला अपेक्षीत यश येणार नाही. एखाद्या मंगलकार्यात सहभागी होण्याचे योग आहेत. त्यामुळे कुटुंबासोबत आनंद साजरा करता येईल. महिलांशी वाद टाळा. अन्यथा नुकसान आपलेच होईल. तरूण वर्गासाठी आनंदाचा आठवडा ठरेल. शुभ तारखा 8, 10, 11

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com