साप्ताहिक राशीभविष्य weekly Horoscope

1 ते 7 जुलै 2021
साप्ताहिक राशीभविष्य weekly Horoscope
साप्ताहिक राशीभविष्यweekly Horoscope

मेष - तापाचा विकार उद्भवण्याची शक्यता

धर्माचरणाने अनेक संकटांवर मात करण्याची ऊर्जा प्राप्त होईल. आपल्या हातून सत्कर्म घडेल. योग्य ठिकाणी दानधर्म करण्याची मानसिकता तयार होईल. जल तत्त्वांशी संबंधित उद्योग व्यवसायात फायदा होईल. दुसर्‍याच्या कामाच्या जबाबदार्‍या पडतील. राजाश्रय मिळेल. गेल्या आठवड्यातील मनोव्यथेचा भार काहीसा हलका होईल. तापाचा विकार उद्भवण्याची शक्यता आहे. नोकरदारांना वरिष्ठाकडून सन्मानाची वागणूक मिळेल. घरातील वडीलधार्‍या व्यक्तींची काळजी घ्यावी. शुभ तारखा : 4 ते 7

वृषभ - पारंपरिक व्यवसायातून आर्थिक लाभ

विवाह इच्छुकांसाठी आनंददायी काळ आहे. नववराला साजेशी वधू तर नववधूला साजेसा वर प्राप्त होऊ शकेल. दूरच्या प्रवासाचे बेत ठरतील. आरोग्यविषयक तक्रारी चालूच रहातील. मनाला वेदनादायक घटना ऐकायला मिळण्याची शक्यता आहे. शक्यतो वाहन चालवणे टाळा. धार्मिक सण व्रतामध्ये सहभागी व्हाल. पारंपरिक व्यवसायातून आर्थिक लाभ होतील. मानसन्मान मिळेल. विरोधकांच्या कारवाया विचलित करू शकतात. आर्थिक मदत मिळू शकेल. पाठ-कंबर दुखीचे विकार वाढणार नाहीत याबाबत काळजी घ्यावी. लांबलेल्या कामांना गती येईल. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे लागेल. परदेशातील व्यवहार सुरळीत होऊन कामकाजाला गती मिळेल.शुभ तारखा : 2, 3, 6,

मिथुन - अकारण शत्रुत्व वाढवून घेऊ नका

मामा-मावशी किंवा आजोळचे नातेवाईक सहकार्य करतील. शरीर पीडा मानसिक चलबिचल वाढवणारी ठरेल. कोणाशीही अकारण शत्रुत्व वाढवून घेऊ नका. आठवड्याच्या उत्तरार्धात सुखद घटना घडतील. काही कारणाने स्थानांतर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बदलीचे योग संभवतात. राजकीय क्षेत्रात अधिक जबाबदार्‍या वाढतील. अन्न तारी अन्न मारी या म्हणीची आठवण ठेवून संतुलित आणि सकस आहार घ्या. घरातील व्यक्तींना दिलेले आश्वासन पाळावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी अडचणींचा व संघर्षाचा काळ संभवतो. शुभ तारखा : 4, 5

कर्क- घरात आनंदी वातावरण

विद्यार्थ्यांसाठी अत्यन्त सकारात्मक वातावरण तयार होईल. नवीन पद्धतीचा अभ्यासक्रम सुलभतेने हाताळाल. संततीविषयक समस्या दूर होतील. लेखक -पत्रकार मंडळींकडून समाजाला पोषक लेखन घडून येईल. काही प्रमाणात पोटाच्या विकाराने मनाला उद्विग्नता येऊ शकते. जलमार्गाने केलेल्या प्रवासातून लाभ होईल. विवाह इच्छुकांसाठी योग्य स्थळ येण्याची शक्यता आहे. घरात आनंदी वातावरण बनेल. तुमच्याकडून धर्म संस्कृती बद्दल अभिमानास्पद कार्ये घडतील. शुभ तारखा : 6, 7

सिंह - संततीच्या कर्तृत्वाने आत्मिक समाधान

मातृ देवो भव: या वैदिक सूत्राचा प्रत्यक्ष उपयोग जीवनात कराल.आई हे महान दैवत आहे हा आदर्श समाजापुढे जाईल असे कार्य आपल्या हातून घडेल. चतुष्पाद प्राण्यांच्या देखभालीविषयी जागरूक रहावे. वाहन खरेदी करताना भविष्यातील साद पडसादाचे अवलोकन करूनच पाऊल उचलावे. संततीच्या कर्तृत्वाने आत्मिक समाधान लाभेल. विविधांगी वाचनाची आवड वाढेल. धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होऊन भक्ती वृद्धिंगत होण्यासाठी कीर्तन प्रवचनादी प्रबोधनात्मक अनमोल मार्गदर्शन करू शकाल. शुभ तारखा : 3, 4, 5

कन्या - जमिनीपासून फायदा होईल

आपण वर्षार्ंनुवर्षे घेतलेल्या अथक परिश्रमाचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग होईल. स्वकर्तृत्वाने मोठे होण्याबद्दलचा आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. साहसी खेळ-योगशास्त्र याविषयातील स्वारस्य वाढेल. नोकरीमध्ये पदोन्नतीसाठी करीत असलेले प्रयत्न यश मिळवून देतील. वयोवृद्ध मंडळींनी प्रकृतीची काळजी घेण्याची अत्यन्त आवश्यकता वाटते. शारीरिक विकारावर मात करण्यासाठी भगवान महामृत्युंजयाची साधना केल्याने संकटांवर मत करण्यात यश मिळेल. जमिनीपासून फायदा होईल. वाहन खरेदी करू शकाल. सद्गुरू मंत्राचा जप करावा. शुभ तारखा : 2, 3, 6

तूळ - स्थावर मालमत्तेच्या वाटाघाटी यशस्वी

पारिवारिक सौख्य उत्तम लाभेल.कोणाच्याही आर्थिक व्यवहाराची हमी घेऊ नका. लहान भावंडांकडून काही आदर्श शिकायला मिळतील. तुमची कीर्ती वाढेल. आर्थिक व्यवहारात नियोजन करावे लागेल. संगती संग दोष: हे वचन सिद्ध आहे. आपण कुणाच्या संगतीत वावरत आहोत त्याचे शुभाशुभ परिणाम नक्की मिळणार, त्यामुळे कोणतेही पाऊल टाकताना काळजीपूर्वक टाका. नोकरदारांसाठी फायदा वाढवणारा काळ आहे. वडिलोपार्जित स्थावर मालमत्तेच्या वाटाघाटी यशस्वी होतील. शुभ तारखा : 2 ते 5

वृश्चिक - शब्द सामर्थ्य वाढेल

उच्च विचारांची वाढ होईल. मात्र बदलत्या विचारसरणीचा इतर लोक गैरफायदा घेऊ शकतात. आपले मत आणि निर्णयावर ठाम रहा. आप्तेष्टांचे सहकार्य लाभेल. नेत्रविकारापासून त्रास वाढू शकतो. कामानिमित्त ऐतिहासिक ठिकाणी जाण्याचे नियोजन ठरू शकते. वाणीतून अमोघ शब्दांचा वर्षाव करू शकाल. शब्द सामर्थ्य वाढेल. साहसी निर्णय घ्याल. केवळ ऐकिवातील गोष्टींवर विश्वास ठेवू नका. शरीर पीडा वाढू शकते काळजी घ्यावी. शुभ तारखा : 2,4,5

धनू- अन्नधान्याची भरभराट होईल

आर्थिक व्यवहाराबाबत व्यवस्थापन आवश्यक आहे. उधार देऊ नका आणि घेऊही नका. कोणत्याही व्यवहारात गुप्तता राखणे हिताचे ठरेल. येऊ घातलेल्या संकटांवर मार्ग निघेल. आपल्या कला कौशल्याने त्यावर सहज मात कराल. शेतकर्‍यांसाठी अत्यन्त दिलासादायक काळ आहे. अन्नधान्याची भरभराट होईल. आठवड्याच्या उत्तरार्धात गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल. शुभ तारखा : 3 ते 6

मकर - खर्चाचे प्रमाण वाढेल

नव्या उमेदीने कामाला लागाल. आपल्याला ऊर्जा पुरविणारी व्यक्ती भाग्योदयाच्या वाटेतील मैलाचा दगड बनेल. योग्य संधीचा फायदा घेण्याची तसदी घ्या. खर्चाचे प्रमाण वाढेल. अकारण होणार्‍या दोषारोपामुळे मानसिक संतुलन ढळण्याची शक्यता आहे. व्यसनांकडे वळत तर नाही ना याबाबत सतर्क रहा. चतुष्पाद प्राण्यांच्या खरेदी विक्रीत फायदा होईल. शेतीतील उत्पादनाच्या सुरक्षेची काळजी घ्या. पारंपरिक उद्योग व्यवसायांकडे लक्ष केंद्रित करा. शुभ तारखा : 2, 3, 6,

कुंभ - स्वधर्मावर निष्ठा वाढेल

अधिकार प्राप्तीचे योग आहेत. पदोन्नती - पगारवाढ यासारख्या समाधानकारक गोष्टी घडायला सुरुवात होईल. परदेशातील व्यवहार सुरळीत होतील. कामकाजासाठी प्रवास करावा लागेल. स्वधर्मावर निष्ठा वाढेल. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. अचानक येणार्‍या जबाबदार्‍या सहज पेलवू शकाल. नवा कीर्तिमान स्थापित करू शकाल. आठवड्याच्या शेवटच्या काळात मन कठोर करावे लागेल. काही अप्रिय घटना कानावर येऊ शकतात. गुडघेदुखीचे विकार त्रासदायक ठरतील. शुभ तारखा 2 ते 5

मीन - सन्मानित केले जाईल

भविष्यात घडणार्‍या घटनांचा अचूक क्रम मांडू शकाल. नवंनवीन संकल्पना सुचतील. परिवर्तन दिसून येऊ लागेल. काही मंडळी दबाव तयार करण्याचा प्रयत्न करतील, मात्र सर्व कुविचारांवर आपल्या सद्विचारांनी मात करू शकाल. समाजामध्ये आपल्याबद्दल आदरभाव निर्माण होईल. पीडितांना न्याय मिळवून द्याल. राजदरबारात सन्मानित केले जाईल. आपण आपल्या विशेष अधिकाराचा वापर करून सामाजिक घडी सुस्थितीत आणण्यासाठी केलेले प्रयत्न प्रभावी ठरतील. शुभ तारखा: 4 ते 7

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com