साप्ताहिक राशीभविष्य

10 ते 16 नोव्हेंबर 2022
साप्ताहिक राशीभविष्य
साप्ताहिक राशीभविष्यWeekly Horoscope

मेष- अशक्य कामात यशस्वी व्हाल

अर्थाअर्थी काहीही संबंध नसणार्‍या बदलांना सामोरे जावे लागेल.कार्यालयातील लोक आदर देतील,त्यामुळे आनंदी वाटेल. काही वेळा तुमचा अहंभाव वाढेल. त्यामुळे तशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा. या काळात इतर वेळेला अशक्य वाटणार्‍या कामातही तुम्ही यशस्वी व्हाल. आपल्या कामांची समाजात चर्चा होईल. लाभाच्या संधी उपलब्ध होतील. नवीन ओळखी संभवतात. आपल्या बुद्धि आणि तर्काने कार्यात यशाची शक्यता. कामाला वाव मिळेल. आपले निर्णय, विचार दुसर्‍यांवर थोपू नका. वेळेच महत्त्व समजा.

शुभ तारखा : 14, 15, 16

वृषभ - आरोग्याची तपासणी करा

पैशाच्या पाठीमागे धावताना हाती असलेल्या कामावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घ्या. कुटुंबाच्या उन्नतीसाठी काम कराल. पण त्यांच्याकडून तुमचे कौतुक होण्याची शक्यता दिसत नाही. आरोग्याची तपासणी करावी. जोखीम घेणे टाळा. कारण त्यामुळे तोटा होऊ शकतो. अन्यथा काही गंभीर स्वरुपाचे त्रास होऊ शकतात. प्रामुख्याने त्वचा आणि रक्तासंबंधी. नोकरी करणार्‍या लोकांना अधिक फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही या आठवड्यात आपल्या उच्च अधिकार्‍यांसोबत महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा कराल. नवीन जागेत राहावयास जाण्याचे बेत ठरतील. तुम्ही तुमचे विचार घरच्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न कराल. ज्याने त्यांच्या मनात तुमची प्रतिमा एकदम चांगली होईल.

शुभ तारखा : 13, 15, 16

मिथुन- अचानक धनलाभाचे योग

तुम्ही हाती घ्याल ते तडीस न्याल. नवीन महिन्यात तुमची आर्थिक स्थिती तुमच्या कल्पनेबाहेर सुधारल्याने एक प्रकारचा नवीन आत्मविश्वास तुमच्यात जागृत होईल. निश्चितपणे खूप उत्तम कमाई करणार आहात. पण पैशाची गुंतवणूक मात्र करू नये. तुमच्या कार्यालयातील लोक आदर देतील,त्यामुळे आनंदी वाटेल. काही वेळा तुमचा अहंभाव वाढेल. बौद्धिक कार्यांमध्ये आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार असून त्यात आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आपल्या व्यावसायिक जीवनात साम, दाम, दंड, भेदाचे धोरण ठेवून पुढे जाल. व्यवसायात स्टाफ, पार्टनर आणि कुटुंबातील सदस्यांकडून मदत मिळेल.

शुभ तारखा : 11, 12, 13

कर्क- सहकार्य मिळवून देणारी ग्रहस्थिती

मिळकतीचे स्त्रोत वाढतील. प्रेमात लाभलेल्या क्षणांमुळे विवाहित सुखावतील. तुम्ही मेहनती आहात आणि तुम्ही सगळ्या प्रकल्पासाठी भरपूर मेहनत घेतात. पण त्यामानाने फार कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे मानसिकरीत्या हताश होता. महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कुटुंबाकडून तणावाचा सामना करावा लागेल. पण जसा वेळ जाईल तशा समस्या कमी होतील. मानसिकरूपेण थोडे अस्वस्थ राहाल. सुख सुविधा देणार्‍या सर्व वस्तू असतील. आर्थिकरूपेण जास्त सशक्त असाल. वाहन किंवा दागिन्यांची खरेदी करू शकता. अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे.

शुभ तारखा : 12, 13, 14

सिंह- जिवलग दुरावण्याची शक्यता

मेहनती आहात आणि तुम्ही सगळ्या प्रकल्पासाठी भरपूर मेहनत घेतात. पण त्यामानाने फार कमी प्रतिसाद मिळतो. त्यामुळे तुम्ही मानसिकरीत्या हताश होता. कुटुंबाकडून तणावाचा सामना करावा लागेल. पण जसा वेळ जाईल तशा समस्या कमी होतील. तुमच्या हट्टी स्वभावामुळे कदाचित जिवलग दुरावण्याची शक्यता आहे. पण जर तुम्ही शहाणपणाने वागलात तर तुम्हाला या महिन्यात जोडीदार मिळेल. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये तुमचा रस वाढेल. तुमचा यश बघून तुमचे प्रतिस्पर्धी नाराज होतील आणि तुम्हाला रोखण्याचा प्रयत्न देखील करतील. पण त्यांचे एक ही षडयंत्र कामी पडणार नाही. उत्पादनाच्या प्रचारासाठी खर्च कराल.

शुभ तारखा : 14, 16

कन्या - घरात आनंदी वातावरण राहील

निराशेचे काही क्षण येतील, पण त्याला न जुमानता काम करीत राहिलात, तर अखेर सफतला मिळेल. तुम्ही ज्या माणसावर प्रेम करता त्याच्यासोबत बराच वेळ घालवता येईल. तरुणांचे विवाह ठरतील. नवीन जागेत राहावयास जाण्याचे बेत ठरतील. तुमच्या घरात तसे आनंदी वातावरण राहील. पण काही वाद तुम्हाला निराश करतील. कदाचित घरातल्या सदस्याचे अनारोग्य तुम्हाला व्यथित करणारे ठरेल. परंतु तुम्ही मात्र तंदुरुस्त राहणार आहात. अडकलेली कामं पूर्ण झाल्याने कामाला गती येईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुम्ही नवीन कार्य सुरू करू शकता. घर, वाहन, दागिने, वस्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, गॅझेट्स इत्यादींच्या खरेदीवर विशेष खर्च करण्याची शक्यता आहे.

शुभ तारखा : 11, 12

तूळ- विद्यार्थ्यांना अपेक्षित यशप्राप्ती

धंदा-व्यवसायात यशाच्या नवीन सीमा गाठण्याचा तुमचा निर्धार बहुतांश प्रमाणात सफल होईल. तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जात आहेत का? याबाबत तुम्ही खूप सावध असणे गरजेचे आहे. तुमच्या व्यवसायानिमित्त त्वरित प्रवास करावा लागेल. तरुणांचे विवाह ठरतील व पार पडतील. विद्यार्थ्यांना अपेक्षित यशप्राप्ती होईल. सामाजिक क्षेत्रातील लोकांना स्वत:च्या क्षेत्रात नाव कमावता येईल. आर्थिक स्थिती उत्तम असल्यामुळे मानसिकदृष्ट्या स्वस्थ अनुभवाल. कमी मेहनत करूनही त्याचे उत्तम फळ मिळणार आहे.

शुभ तारखा : 15, 16

वृश्चिक- व्यवसायानिमित्त प्रवास घडेल

ज्या गोष्टीला हात लावाल त्याचे सोने होईल आणि जरी हात लावला नाही तरी नक्कीच अन्य मार्गाने तुम्हाला फायदा संभवतो. धंदा-व्यवसायात यशाच्या नवीन सीमा गाठण्याचा तुमचा निर्धार बहुतांश प्रमाणात सफल होईल. तुमचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जात आहेत, याबाबत तुम्ही खूप सावध असणे गरजेचे आहे. तुमच्या व्यवसायानिमित्त त्वरित प्रवास करावा लागेल. वाहन किंवा मशीनरी चालवताना सावधगिरी बाळगा. वाहन किंवा मशीनरी चालवताना सावधगिरी बाळगा.मानसिक संतूलन ठीक असल्याने फसवणूक करू शकत नाही. शुभ तारखा : 14, 16

धनू- नवा व्यवसाय सुरू कराल

जोडधंदा असणार्‍यांनी नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुम्ही नवा व्यवसाय सुरू करण्याची शक्यता आहे आणि तुम्हाला परदेशी व्यवसायातून फायदा होईल. जोखीम घेणे टाळा. कारण त्यामुळे तोटा होऊ शकतो. नवीन महिन्यात देणी निर्माण होणार नाहीत याकडे लक्ष द्या. जोडधंदा असणार्‍यांनी नेहमीच्या कामाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. स्थायी मालमत्ता आणि वाहन खरेदीचे प्रबळ योग आहे.

शुभ तारखा : 12, 13

मकर- समस्यांवर उपाय शोधाल

जोवर तुमच्या आरोग्याचा प्रश्न आहे, तुम्ही जोखीम घेऊन चालणार नाही. तुमच्या कार्यालयीन ठिकाणी काही समस्यांचा सामना करावा लागेल. पण अशा समस्यांवर तुमची हुशारी आणि प्रामुख्याने तुमची मेहनत उपाय शोधून काढेल. नको त्या ठिकाणी मनाविरुद्ध बदली होण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्यासाठी तुम्हाला दोष देण्यात येईल. घरात होणार्‍या शुभ आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही व्यस्त राहणार आहात.मिळकतीच्या स्रोतांमध्ये वृद्धी होणार आहे.

शुभ तारखा : 13, 14

कुंभ- अहंभाव वाढेल

खूप खंबीर बनणार आहात आणि प्रेम तसेच कुटुंबासंबंधी गंभीर परिस्थितीशी मुकाबला करता येईल पण त्यातून बराच फायदा होणार नाही. त्यामुळे शक्य होईल तितके स्वत:ला शांत ठेवा. तुमच्या तापट स्वभावामुळे नुकसान होणार नाही व शत्रूत्व वाढणार नाही, याची विशेष काळजी वर्षभर घ्यावी लागेल. तुमच्या कार्यालयातील लोक आदर देतील, त्यामुळे आनंद वाटेल. काही वेळा तुमचा अहंभाव वाढेल. त्यामुळे तशी परिस्थिती टाळण्याचा प्रयत्न करावा.

शुभ तारखा : 12, 13, 14

मीन- मनाविरूद्ध बदली होण्याची शक्यता

नोकरीसाठी हा काळ अनुकूल राहील. नको त्या ठिकाणी मनाविरुद्ध बदली होण्याची शक्यता आहे. तुम्ही ज्या गोष्टी केल्या नाहीत त्यासाठी तुम्हाला दोष देण्यात येईल. व्यवसाय आणि पैशासंबंधी काही व्यवहार करण्याआधी प्रत्येक गोष्टीचे अवलोकन करून अंदाज घ्यावा. तुम्ही विद्यार्थी असाल तर आधी संस्थेविषयी सगळी माहिती तपासा असा सल्ला आहे. म्हणून वायफळ खर्च करणे टाळा. अन्यथा आर्थिक स्थिती मंदावेल.

शुभ तारखा : 10, 11

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com