Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधसाप्ताहिक राशीभविष्य Weekly Horoscope

साप्ताहिक राशीभविष्य Weekly Horoscope

मेष – भागीदाराकडून सहकार्य मिळेल

शारीरिक स्थिती नाजूक बनण्याची शक्यता आहे. उधारी वाढणार नाही याची काळजी घ्या. प्रतिस्पर्ध्याकडून होणार्‍या उपद्रवामुळे मानसिक स्थिती बिघडू शकते. आठवड्याचा उत्तरार्ध चिंता दूर करणारा असेल. भागीदाराकडून सहकार्य मिळेल. जुने येणे वसूल होऊ शकेल. आनंददायी घटना ऐकायला मिळतील. विद्यार्थ्यांना विद्यार्जनासाठी उत्तम काळ आहे. दैवी उपासना ध्यानधारणा यावरचा विश्वास दृढ होईल. आरोग्य विषयक प्रश्न भेडसावतील. मंगल कार्यात सहभागी व्हावे लागेल. आपण जर कपड्याचा किंवा स्त्री सौन्दर्य प्रसाधनांचा व्यापार करीत असाल तर त्यात फायदा वाढेल. शुभ तारखा : 26, 27, 30

- Advertisement -

वृषभ – कौटुंबिक सौख्य लाभेल

नोकरदारांसाठी अत्यंत दिलासादायक काळ आहे. राजकीय व्यक्तीपासून सावध असावे. कौटुंबिक सौख्य लाभेल. शरीर व्यथेने मन विचलित होईल. नवीन उद्योग धंद्यासाठी थोडा संयम ठेवा. अधिक गुंतवणूक करण्याची आवश्यकता असल्यास थोडे सबुरीने घ्या. मंगलकार्याची बोलणी लांबणीवर पडू शकतात. आठवड्याच्या उत्तरार्धात आर्थिक व्यवहार सुरळीत होतील. वादविवाद स्पर्धेत यश प्राप्त होईल. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. न्याय्य मागण्याला सरकार दरबारी न्याय मिळेल. हितशत्रूंच्या कारवाया त्रस्त करू शकतात. जुने येणे वसूल होऊ शकेल. व्यवसायात फायदा वाढू शकेल. कोणाशीही वैरभाव ठेवू नका. स्पर्धा परीक्षेची पूर्व तयारी करण्यासाठी कठीण परिश्रमाची आवश्यकता आहे. शुभ तारखा : 25, 28, 29

मिथुन – सामाजिक प्रतिष्ठा वाढेल

बदलीचे योग संभवतात. काहीतरी कारणाने प्रवास करावा लागेल. नेत्रविकार वाढणार नाही याची काळजी घ्यावी. पारिवारिक संबंध सुधारतील. नयनरम्य ठिकाणी सहलीला जाण्याचे नियोजन ठरेल. भावंडांकडून सहकार्य मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. भाग्योदयासाठी अत्यंत अनुकूल काळ आहे. भविष्यातील घडामोडीचा अंदाज बांधू शकाल. घरासाठी आवश्यक अथवा शोभेच्या वस्तू खरेदी करू शकाल. शैक्षणिक क्षेत्रात उन्नती होईल. वैवाहिक जीवनात घडणार्‍या घडामोडी मनाला आनंद देतील. वाहन चालवताना काळजी घ्यावी. शुभ तारखा : 25, 26, 27

कर्क- संकटावर सहज मात कराल

अन्नधान्य उत्पादन विषयीचे अंदाज खरे ठरतील. मनाला आनंद देणार्‍या घटना ऐकायला मिळतील. मनःसामर्थ्य वाढेल. घरामध्ये कलह वाढणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी. मिळालेल्या उत्पन्नाचे सुयोग्य पद्धतीने नियोजन करावे. नोकरदारांना पदोन्नतीचे योग आहेत. नावलौकिक वाढेल. राजकीय व्यक्तींंबरोबर कोणतेही व्यवहार करताना सांभाळून करावेत. संरक्षण क्षेत्रात विशेष कामगिरी करू शकाल. मोठ्या संकटावर सहज मात करू शकाल. वाहन चालवताना काळजी घ्यावी. शुभ तारखा : 25 ते 29

सिंह – मंगलकार्य ठरण्याची शक्यता

दुय्यम दर्जाच्या व्यवसायाकडे कल वाढेल. वडिलोपार्जित स्थावर इस्टेटीपासून फायदा होईल. भागीदाराकडून दिलेला शब्द पाळताना दिरंगाई होऊ शकते. भुसार माल अथवा चतुष्पाद प्राण्याच्या क्रयविक्रयाचा व्यापार करण्याची तयारी असल्यास त्यातून फायदा होईल. सरकार दरबारी सन्मानित केले जाईल. कलाकारांसाठी विशेष आदर सन्मान मिळण्याचा काळ आहे. शैक्षणिक क्षेत्रात अधिक मेहनतीची गरज आहे. विरोधकांवर सहज विजय प्राप्त कराल. रक्तदाब असणार्‍या लोकांनी शरीराकडे दुर्लक्ष करू नये. महत्त्वाचे निर्णयाबाबत गुप्तता राखणे हिताचे ठरेल. विवाह इच्छुकांचे विवाह ठरतील. मित्र परिवाराकडून सहकार्य मिळेल. शुभ तारखा : 26, 27

कन्या – साधुसंत-देवादिकांचे पूजन

कलागुणांना संधी प्राप्त होतील. कापूस उत्पादकांसाठी अत्यंत फायद्याचा काळ आहे. सुगंधी द्रव्याचा तसेच स्त्री सौंदर्य प्रसाधानांचा व्यापार फायद्यात राहील. राहत्या घरात साधुसंत अथवा देवादिकांचे अचानक पूजन घडेल. घर खरेदीसारखे व्यवहार करताना कागदोपत्री व्यवहार पूर्ण करण्याला प्राधान्य द्या. वैज्ञानिक सिद्धांत अचूक ठरतील. विज्ञान विषयाचा अभ्यास वाढविण्याचा प्रयत्न करा. नवे संशोधन करताना यशाच्या टप्प्याजवळ जाल. साथीच्या विकारापासून स्वतःचा बचाव व्हावा यासाठी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. गृहसौख्य उत्तम आहे. घर खरेदीसारखे व्यवहार उत्तम रीतीने पार पडले जातील. कोणाशीही वैरभाव वाढू देऊ नका. शुभ तारखा : 24, 28

तूळ – नातेवाईकांचा सहयोग लाभेल

हळव्या स्वभावाचा कोणी गैर फायदा तर घेत नाही ना याबाबत जागरूक राहणे गरजेचे आहे. आईकडील नातेवाईकांचा सहयोग लाभेल. नियोजित कामांना विलंब होण्याची शक्यता आहे. अडकून पडलेले येणे काही प्रमाणात वसूल होईल. नोकरदारांनी जास्त अपेक्षा ठेवू नयेत. दुधाची तहान ताकावर भागवावी लागली तरी ती भविष्यासाठी सकारात्मक परिणाम वाढवणारी ठरेल. व्यापार उद्योगात चोरीचे प्रमाण वाढू शकते, त्याबाबत विशेष लक्ष देणे हिताचे ठरेल.शुभ तारखा :24, 25, 26

वृश्चिक – देशहितासाठी महत्त्वपूर्ण योगदान

वरिष्ठांकडून अपेक्षा वाढतील. अकारण भय निर्माण होऊ शकते. चांगल्या मित्रपरिवाराच्या सहयोगाने सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक उत्पन्नांत वाढ होईल. गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करा. शक्यतो उधार अथवा उसने देणे टाळावे. दुसर्‍याच्या व्यवहाराची हमी घेऊ नका. उच्च पदावर नियुक्ती होण्याची शक्यता आहे. न्यायासाठी लढत असलेली लढाई जिंकू शकाल. अथवा सकारात्मक वातावरण तयार होईल. देशहितासाठी महत्त्वपूर्ण योगदान द्याल. स्त्रियांनी स्त्री रोगावर वेळीच उपचार करून घ्यावेत. शुभ तारखा : 25, 29

धनू- भांडवलात वाढ होईल

जुने विकार त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. राजदरबारातून न्यायाची अपेक्षा ठेवू नका. जास्त भावनिक बनू नका. काही प्रमाणात दिलासादायक बातम्या ऐकायला मिळेल त्याने आत्मिक समाधान देखील लाभेल. जीवनशैलीबाबत आगळीवेगळी विचारधारा निर्माण होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीसाठी उत्तम काळ आहे. भांडवलात वाढ होऊ शकेल. लोखंडापासून फायदा होईल. भागीदारीत जास्त अडकू नका.शुभ तारखा : 29, 30

मकर – वेळीच औषधोपचार करा

मानसिक क्लेश वाढत जाणे हे क्लेशाचे मूळ कारण आहे ही बाब ध्यानात ठेवा. शाब्दिक विष पसरणार नाही याची विशेष काळजी घेण्याची गरज आहे. घरातील वयोवृद्ध लोकांची देखभाल करा. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. मार्ग व्यावहारिक गुप्तता राखणे हितावह ठरेल. शेतीविषयक मांडलेले आडाखे तंतोतंत जुळतीलदिलेल्या शब्दाची जाणीव ठेवून व्यवहार हाताळल्यास अधिक फायदा आणि विश्वास मिळेल. शुभ तारखा : 25, 28

कुंभ – कलागुणांना संधी प्राप्त होईल

कर्जाऊ रक्कम मागितली असल्यास ती प्राप्त होईल. जुने कर्ज अल्पावधीत फिटू शकेल. शेती विषयक वातावरण अनुकूल राहील. मामाकडे मंडळींचे उत्तम सहकार्य लाभेल. काही प्रमाणात आरोप देखील होण्याची शक्यता आहे. कायद्याच्या चाकोरीतून जाताना नियमबाह्य गोष्टी टाळाव्यात. उपयोगी उपकरण खरेदी करण्यासाठी अनुकूल काळ आहे. परीक्षार्थींसाठी उत्तम यशाकडे घेऊन जाणारा काळ आहे. कलागुणांना संधी प्राप्त होईल. कन्या संततीकडून अपेक्षापूर्तीचा लाभ मिळेल. शुभ तारखा : 26, 27

मीन – व्यावहारिक गुप्तता पाळणे हिताचे

ठोस निर्णय घेण्यासाठी अनुकूल काळ आहे. आरोग्यविषयक किरकोळ तक्रारी येतील. हितशत्रूंच्या कारवाया मनाला उद्विग्नता आणतील. राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावर ख्याती वाढेल. चित्रकला स्पर्धा परीक्षेत आवर्जून सहभागी व्हा. घरातील वातावरणात जास्त काही बदल दिसून येणार नाही. रामरक्षा स्तोत्राचे पठण केल्याने घरातील संकटांवर मात करण्यास मदत होईल. व्यापारात अधिक गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उपयुक्त नाही. व्यावहारिक गुप्तता पाळणे हिताचे राहील. शुभ तारखा : 25 , 28, 29

- Advertisment -

ताज्या बातम्या