फिरोजा रत्न आणि त्याचे लाभ

फिरोजा रत्न आणि त्याचे लाभ

संस्कृतमध्ये हरिताश्म या नावाने ओळखले जाणारे हे एक दिव्य रत्न आहे. हे रत्न तांब्याच्या मिश्रणामुळे वेगवेगळे रंग धारण करते. यात लोखंडाचे अल्प प्रमाण असते . खरंतर फिरोजा म्हणजे ल्यूमिनाचे ड्रायडोस फॉस्फेट होय. यात अल्पप्रमाणात बाष्प देखील आढळून येते.

फिरोजा हे इराण देशाचे राष्ट्रीय रत्न आहे. इसवी सन पूर्व 4000 वर्षे पासून या रत्नाचा इतिहास आहे. इराणमधील निशापुरच्या खाणीत सापडणारे फिरोजा रत्न हे उत्तम दर्जाचे व मौलिक रत्न समजले जाते. फिरोजामधील निशापुरी इराणी फिरोजा हा सर्वश्रेष्ठ प्रकार होय .

लाभ - बुध, गुरू, शुक्र, शनि या चारही ग्रहांचे लाभ करून देणारे हे एकमेव रत्न आहे.

प्रसिद्धी, लौकीक , संपन्नता मिळवून देणारे रत्न म्हणून याकडे पाहिले जाते.

पती - पत्नी मधील नाते दृढ करण्यात हे रत्न काम करते.

शुक्राचे रत्न असल्यामुळे आपले उत्पन्न वाढवून समृद्धी आणण्यात हे रत्न खूप मौलिक आहे.

गुरु या ग्रहाचे रत्न असल्यामुळे सर्व प्रकारचे मार्गदर्शक , सल्लागार, तज्ज्ञ लोकांसाठी हे रत्न फार लाभदायक आहे. ज्ञानसाधनेत हे रत्न अत्यंत लाभदायी आहे.

वकील, शिक्षक, प्राध्यापक, कर सल्लागार , व्यापारी, सौंदर्य प्रसाधनांचा व्यवसाय करणारे व्यापारी, कथाकार किर्तनकार या सर्वांनी हे रत्न वापरल्यास उत्तम लाभ होतील.

हे रत्न डोळ्याच्या विकारावर गुणकारी आहे.

हे रत्न धारण करणारी व्यक्ती आर्थिक क्षेत्रात डबघाईला जात नाही.

जीवनात सकारात्मकता देण्याचं काम फिरोजा उत्तम प्रकारे करतो.

ताणतणावातून बाहेर काढण्याचे कामी फिरोजा गुणकारी आहे.

कोणतेही विपरित परिणाम या रत्नाचे दिसून येत नसल्यामुळे हे रत्न परिधान करण्याचे फारसे कडक नियम नाहीत. गुरु बूध शुक शनी या ग्रहांच्या राशींच्या लोकांनी हे रत्न धारण करायला हरकत नाही.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com