खरी प्रार्थना

अध्यात्मवाणी
खरी प्रार्थना

प्रार्थना Prayer परमात्म्याशी संवाद साधण्याची सर्वात प्रभावशाली पद्धत आहे. आपण सर्वजण प्रार्थना करतो. कोणी सकाळी उठून प्रार्थना करतो, कोणी रात्री झोपण्यापूर्वी प्रार्थना करतो. जेव्हा कधी आपण प्रार्थना करतो तर त्यामध्ये आपण काहीना काही तरी या जगतातील वस्तु परमात्म्याकडे मागत असतो.

बर्‍याचदा आपण अशा प्रकारच्या प्रार्थना करत असतो की, हे प्रभू मला ही शारीरिक पीडा होत आहे ही दूर व्हावी. हे प्रभू, माझ्या आईला पीडा होत आहे, त्यांची पीडा दूर व्हावी. हे प्रभू, माझा व्यापार डबघाईला आला आहे, त्याच्यात सुधारणा व्हावी. आपण प्रार्थना Prayer करतो की नवीन घर किंवा नवीन मोटार गाडी मिळावी आणि भौतिक वस्तू मिळाव्यात, तसेच आपले शारीरिक आरोग्य चांगले राहावे.

आपण प्रार्थना Prayer त्या वस्तूंची करतो कि ज्या आपल्या जीवनात खूप गरजेच्या आहेत. आपणास असे वाटते की आपण जे मागत आहोत ते आपल्याला संपूर्ण जीवनभर मदत करेल परंतु असेही असू शकते की ते आपल्या आयुष्यभरासाठी योग्य नसेल. प्रार्थना Prayer करण्याची योग्य पद्धत ही आहे की, प्रभूची जी इच्छा असेल तेच आपल्या जीवनात व्हावे. प्रभू आपल्याबरोबर काय झाले हे जाणून आहेत, काय होत आहे हेही जाणून आहेत आणि काय होईल हे सुद्धा जाणतात.

प्रभू हे जाणून आहेत की आपल्याकरीता काय योग्य आहे. आपल्याला ठाऊक नाही की आपल्याकरीता काय चांगले आहे. आपण पण आपली मर्यादित बुद्धी आणि दृष्टिकोनानुसार जे आपल्या करिता चांगले वाटते तेच मागतो. परंतु जर आपण सर्व काही परमात्म्याच्या इच्छेवर सोपवावे कि, परमात्म्याने आम्हाला तेच द्यावे जे आपल्याकरीता योग्य आहे, तर अशीच प्रार्थना खरी ठरेल.

(अध्यात्मिक गुरू संत राजिंदर सिंह जी महाराज हे सायन्स ऑफ स्पिरिच्युअ‍ॅलिटी (अध्यात्माचे विज्ञान) तथा सावन कृपाल रूहानी मिशन या आंतरराष्ट्रीय अध्यात्म संस्थेचे प्रमुख आहेत.)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com