किरोच्या नजरेतून : 5 ते 11 ऑक्टोबर 2023 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य

किरोच्या नजरेतून : 5 ते 11 ऑक्टोबर 2023 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य

- सौ.वंदना अनिल दिवाणे

जन्मतारखेनुसार भविष्य..

5 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध,शुक्र, शनी,सूर्यया ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. बुध, शनी, शुक्र ग्रहाचे एकत्र येणे तुमच्या व्यक्तिमत्वाला पोषक आहे. त्यामुळे व्यक्तिमत्वाला विशेष सामर्थ्य प्राप्त झाले आहे. कुटुंबातील मंडळी व नातेवाईक यांच्यासाठी वाटेल तो त्याग करण्यास सदैव तयार रहाल. कधी कधी त्यामुळे तुमच्या प्रगतीत आर्थिक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. आपण इतरांपेक्षा अधिक बुद्धीमान असल्याची जाणीव असल्याने उत्तरार्धात आर्थिक सुस्थिती प्राप्त होईल.

6 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. व्यक्तिमत्वावर शुक्राचा प्रभाव असल्यामुळे मित्रांची संख्या फार मोठी राहील. त्यांच्यामध्ये तुम्ही लोकप्रिय असाल. तुमच्यामध्ये असलेल्या आकर्षक व्यक्तिमत्वामुळे समाजातील सर्वच आकर्षित होतील. सामाजिक संबंधांमुळे खर्चाचे प्रमाण जास्त राहील.पण त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे असे लोकांना वाटेल. स्वतःचे निर्णय कार्यान्वित केल्यास सहकार्‍यांच्या मदतीने उत्तम धनप्राप्ती होईल.

7 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्यून, शुक्र,शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता समतोल राखण्याची कला अवगत केल्यास असामान्य बुद्धीमुळे तुम्ही आपली महत्त्वाकांक्षा सहज पूर्ण करू शकाल. काव्य, संगीत, चित्रकला, संगीत अशा कोणत्याही कलेमध्ये फार उत्तम यश आहे. स्वभाव अतिशय संवेदनशील आहे. साहसी स्वभावाला थोडा अंकुश लावणे आवश्यक आहे. कधी एकदम श्रीमंत तर कधी साधारण अशी आर्थिक परिस्थिती राहील.

8 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शनी, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. वारसाहक्काने मिळालेली संपत्ती असल्यास जीवन सुरळीतपणे चालेल. अन्यथा कष्ट करण्याची आवड नसल्यामुळे आर्थिक अडचणी येण्याची शक्यता आहे. बौद्धिक पातळी उच्च दर्जाची असल्यामुळे डॉक्टर, वैज्ञानिक, वकीली अशा व्यवसायात उत्तम यश मिळेल. महिलांना सामाजिक विषयावर लेखन करणे आवडेल. तुम्ही मांडलेल्या मतांना प्रखर विरोध होण्याची शक्यता आहे. वारसाहक्क्काने आलेली संपत्ती असल्यास आर्थिक परिस्थिती चांगली राहील.

9 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शनी, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. प्रत्येक काम घाईने व विचार न करण्याच्या सवयीमुळे अनेक लोक विरोधात जाण्याची शक्यता आहे. किंबहुना तुम्हाला भांडण्याची आवड आहे. असे म्हटल्यास अतिशयोक्ती होणार नाही. या वृत्तीस आळा घालून मुत्सद्दीपणाने वागल्यास जीवनात प्रगती होऊ शकेल. जबाबदारीचे व उच्च पद स्वतःहून चालत आल्यामुळे आर्थिक बाबतीत नेहमी सुस्थिती राहील.

10 ऑेक्टोबर - वाढदिवस असलेल्या सूर्य, हर्षल, शनी, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. ग्रहांच्या चौकटीमुळे व्यक्तिमत्व बहुआयामी बनेल. अवतीभोवती शांतता असेल यासाठी प्रयत्नात रहाल. दुसर्‍यांच्या भांडणात हस्तक्षेप करून ते सोडवणे तुम्हाला चांगले जमेल. दांडगी महत्त्वाकांक्षा असली तरी जबाबदारीने पुढे जाणे कठीण होईल. बौद्धिक कार्यामध्ये उत्तम धनप्राप्ती होईल.

11 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, शुक्र, शनी या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास तुला आहे. प्रत्येक कार्यात अदृश्य शक्तीची मदत मिळेल. स्वप्नाद्वारे संदेश प्राप्त होत राहतील. त्यामुळे जीवनात पुढे जाताना दैवी शक्तीचा वरदहस्त डोक्यावर आहे याची जाणीव होईल. जवळच्या लोकांमुळे आर्थिक स्थिती खालावण्यााची शक्यता आहे काळजी घ्यावी. 6, 7, 8, 14, 15, 17, 18, 21, 25, 27, 31

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com