किरोच्या नजरेतून : 19 ते 25 ऑक्टोबर 2023 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य

किरोच्या नजरेतून : 19 ते 25 ऑक्टोबर 2023 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य

- सौ.वंदना अनिल दिवाणे

जन्मतारखेनुसार भविष्य..

19 ओॅक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य, हर्षल, शुक्र, शनी,या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास तुला आहे. सुर्याचे शुक्र, हर्षल, शनीशी मिश्रण झाल्याने बुद्धीमत्ता अतिशय तीक्ष्ण झालेली आहे. शिवाय त्यामुळे ज्ञानग्रहण शक्तीचा वेगही वाढला आहे. विचारवंत असून निसर्गाचे तुम्हाला वेड आहे. उद्योगशील असल्यामुळे कोणत्याही नोकरी, व्यवसायात उत्तम यश मिळेल. अर्थप्राप्तीच्यादृष्टीने भाग्यवान आहात.सर्वांचा विश्वास सहज संपादन केल्याने आर्थिक यश उत्तम राहील.

20 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, शुक्र, नेपच्यून, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास तुला आहे. दैवी शक्ती प्राप्त असल्यामुळे स्वप्नाद्वारे किंवा अन्य मार्गाने पुढील सूचना मिळत राहतील. त्याचा उपयोग तुमच्या योजनांत केल्यामुळे उत्तम यश मिळेल. दुसर्‍यांनी केलेली टीका तुमचे मन अत्यंत संवेदनशील असल्यामुळे लवकर झोंबेल. भविष्याचा विचार करून कणखर मनाने आपले कार्य चालू ठेवाल. व्यापार अथवा कोणत्याही रूळलेल्या वाटेने जाण्यापेक्षा स्वतःच्या विशिष्ट गुणांचा वापर करून उत्तम आर्थिक यश मिळेल.

21 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, शुक्र, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. गुरूंच्या प्रभावामुळे सामर्थ्यवान व्यक्तिमत्वाद्वारे तसेच महत्त्वाकांक्षा, इच्छाशक्ती व निश्चयात्मक बुद्धीचा उपयोग तुम्हाला यशप्राप्तीसाठी चांगला होईल. महत्त्वाकांक्षा मोठी असल्याने सामान्य पदाकडे तुम्ही ढुंकूनही पहाणार नाही. बरोबरीच्या लोकांपेक्षा जास्त पुढे जाल. व्यापार, फायनान्स, इंडस्ट्रीपासून उत्तम यश मिळेल. त्यासाठी मोठ्या लोकांची मदत मिळेल.

22 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, सूर्य, शनी, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. हर्षल आणि शनीच्या एकत्रित प्रभावामुळे वैयक्तीक भावी घटनांवर काहीच नियंत्रण ठेवता येणार नाही. शुक्र कमजोर असल्याने प्रेम व विवाहाच्या बाबतीत अनेक विचीत्र अनुभव येतील. विचीत्र सहकारी अनेक वेळा अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करतील. जीवनाच्या पुर्वार्धात आर्थिक प्रगतीत अडथळा येईल.उत्तरार्धात मात्र आर्थिक सुस्थिती राहील.

23 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध,मंगळ, शनी, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. प्रबळ शनीच्या प्रभावामुळे प्रेमाच्या बाबतीत बरेच खाचखळगे अनुभवास येतील. दुसर्‍यासाठी जीवापाड मेहनत करून व त्याग करूनही ज्यांच्यावर उपकार केला त्यांच्याकडून प्रेमाचा शब्द ऐकावयास मिळणार नाही. त्यामुळे तुमची असामान्य बुद्धीमत्ता कूचकामी ठरेल. विचार उच्च आहेत. तुमच्या सल्ल्याने अनेक लोक श्रीमंत होतील. तोच सल्ला स्वतःसाठी वापरल्यास उत्तम आर्थिक स्थिती प्राप्त होईल.

24 ऑेक्टोबर - वाढदिवस असलेल्या मंगळ, शनी, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. शुक्राच्या प्रभावामुळे मित्रांची संख्या फार मोठी असेल. अनेेक प्रेम प्रकरणे संभवतात. त्यातून प्रेमात ‘पडणे‘ याचा खरा अर्थ कळून येईल. साहित्य, संगीत, चित्रकला या कलांमध्ये उत्तम यश मिळून शकेल. आर्थिक गुंतवणूक आणि योजनाबद्ध उद्योगातून आर्थिक यश मिळण्याच्या बाबतीत अतिशय भाग्यवान असाल.

25 ऑक्टोबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंंगल, नेपच्यून, शुक्र, शनी या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास वृश्चिक आहे. अतिशय विलक्षण आणि तीक्ष्ण बुद्धीमत्तेचे धनी आहात. एक पथ्य पाळल्यास आपल्या जीवनाचे सोने करू शकाल ती पथ्ये म्हणजे समतोल राखण्याच्या बाबतीत स्वतःवर कडक नियंत्रण ठेवणे हे होय. प्रतिभेचा स्पर्श झालेली लेखणी, काव्य, साहित्य यासारख्या कलांत असामान्य यश मिळेल.आर्थिक स्थिती सदैव वरखाली होत राहील. काही दिवस श्रीमंती तर काही दिवस गरिबी असे चक्र अव्याहतपणये चालू राहील.

Related Stories

No stories found.
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com