किरोच्या नजरेतून : २ ते ८ नोव्हेंबर २०२३ या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य

किरोच्या नजरेतून : २ ते ८ नोव्हेंबर २०२३ या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे भविष्य

- सौ.वंदना अनिल दिवाणे

जन्मतारखेनुसार भविष्य..

2 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. तुमच्यावर प्रभाव टाकणारा चंद्र स्वतः कमजोर आहे. त्यामुळे स्वभावात बराच विरोधाभास जाणवेल. निर्णय घेण्याच्या बाबतीत तळ्यात मळ्यात न करता निश्चित निर्णय घेण्याची सवय लावल्यास जीवनात उत्तम यश मिळू शकेल. करिअरच्या बाबतीत तर ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. आर्थिक बाबतीत विशेष काळजी न घेतल्यास त्याविषयी सतत चिंता वाटत राहील. इस्टेट आणि पैसा दोन्ही बाबतीत स्थिती नेहमी वर खाली होत राहील.

3 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. या ग्रहांची चौकट यश व महत्त्व मिळवून देईल. आत्मविश्वास फार दांडगा असून आपण करतो ते योग्यच आहे अशी खात्री असते. यामुळे जबाबदारीचे काम तुम्ही यशस्वीरित्या पार पाडू शकाल. सुरूवातीच्या काळात अनेक अडथळे येतील पण हळुहळु ते सर्व पार करून तुम्ही पुढे जाल. कोणत्याही कामात धनप्राप्ती होण्याची पूर्ण शाश्वती.

4 नोव्हेेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर सूर्य, हर्षल, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास वृश्चिक आहे. हर्षल आणि सूर्य यांच्या एकत्रित प्रभावामुळे आपले जीवन इतरांपेक्षा वेगळ्या वळणावर नेऊन यशस्वी व्हाल. संशोधनाच्या कार्यात चांगले यश मिळेल. पण र्दुदैवाने कुसंगतीत पडल्यास वाईट मार्गाला लागण्याची शक्यता आहे. मौलिक कल्पनांतून विपूल धनप्राप्ती होईल.

5 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, मंगळ या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. बुद्धीमत्ता अतिशय तीक्ष्ण असून व्यवस्थापनाच्या कामात भरपूर यश मिळेल. धूर्तपणाने काम करून घेतांना इतरांविषयी शंका वाटत रहातील. त्यामुळे कोणावर विश्वास वाटणार नाही. सौंर्द्याचे वेड असल्यामुळे कलाक्षेत्रात सहज यश मिळू शकेल. धनप्राप्तीच्या बाबतीत भाग्यवान आहात.

6 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर मंगळ, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. दुसर्‍याच्या मदतीला तुम्ही आत्मस्फूर्तीने धावून जाल. त्यासाठी नुकसान झाले तरी चालेल. सुरूवातीचे आयुष्य त्रासात जाईल. एखाद्या विषयात रूची निर्माण झाली तरी दुसर्‍याने विरोध केला तरी सोडणार नाही. संपर्कात येणारे लोक तुमच्या प्रभावाने दिपून जातील. कलाक्षेत्राविषयी आपुलकी वाटेल. लेखनाशिवाय चित्रकला व संगीताचे आकर्षण वाटेल. आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. स्वतःच्या मनाप्रमाणे व्यवस्थापन केले तर फायदा होईल. धनसंग्रह करण्यात यश मिळेल.

7 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या मंगळ, नेपच्यून, चंद्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. नेपच्यून ग्रहाचे प्रभुत्व बुद्धीवर असून सांसारिक गोष्टींवर नाही. दैवी शक्तींद्वारे भावी घटनांची चाहूल लागेल. तुम्ही अत्यंत संदेदनशील असून भोवताली असलेल्या लोकांच्या वातावरणाचा तुमच्यावर परिणाम होईल. अशी परिस्थिती जर चांगली नसेल तर बेचैन व्हाल. विज्ञानाद्वारे उत्तम प्रगती होऊ शकेल. नवीन संशोधनात चांगले यश मिळेल. पैसे कमावण्याचे आकर्षण नसले तरी अनेक प्रकारच्या उद्योगातून पैसा मिळेल. संशोधनाद्वारे, वारसाहक्काने बक्षिस रूपाने याद्वारे पैसा मिळेल.

8 नोव्हेंबर - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंंगळ, शनी या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास वृश्चिक आहे. शनी व मंगळ या दोन ग्रहांचे एकत्र येणे त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे. शनी न्यायाधीश असल्याने अर्थप्राप्तीचे मार्ग अवैध असल्यास गोत्यात आणू शकतो. अध्यात्माबाबत उत्तम प्रगती आहे. आत्मसंयमाच्या दृष्टीने या दोन ग्रहांची युती चांगली आहे. स्वतःवा नियंत्रण करणे चांगले जमेल आणि स्वतःवर विजय मिळवणे हाच खरा जीवनातील विजय होय. आर्थिक बाबतीत जसे ठरवाल तसेच होईल. आर्थिक यश मिळवण्याचे ठरवल्यास धनी व्हाल.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com