Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

28 जुलै – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, हर्षल, नेपच्यूनया ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास सिंह आहे. ग्रहांच्या चौकटीमुळे करिअर व दर्जात नेहमी बदल होत रहातील. भोवतालच्या वातावरणाचा प्रभाव राहील. अनेक धाडसी प्रसंगांना सामोरे जावे लागेल. स्वभाव शांत व संवेदनशील राहील. व्यवसायात सारखे बदल करीत राहिल्यास आर्थिक स्थिती बिघडून जाईल. एकाच व्यवसायात टिकून राहिल्यास आर्थिक स्थिती चांगली राहील.

- Advertisement -

29 जुलै – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, रवि, चंद्र, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास सिंह आहे. कल्पनाशक्ती दांडगी आहे. त्यामुळे आकांक्षा फार मोठ्या असतील आणि विशेष म्हणजेे त्या पूर्ण करण्यात यश मिळण्याची शक्यता आहे. उत्साहाच्या भरात पैसे मिळवण्याची कोणतीही संधी दिसली की, त्यात गुंतवणुकीची घाई कराल. त्यामुळे काही योजनांत यश मिळेल. तर काहींत मात्र नुकसान होईल.

30 जुलै – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, रवि, नेपच्यून या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. निडर व धाडसी स्वभावामुळे समोरच्याच्या तोंडावर दोष सांगण्यास कमी करणार नाही. वरिष्ठाची मर्जी संपादन कराल. हाती घेतलेले काम पूर्णत्वास न्याल. बौद्धीक क्षमता उच्च प्रकारची असल्याने विचारांची पातळीही वरची राहील. आर्थिक स्थितीच्या बाबतीत घाबरण्याचे काम नाही. आयुष्याच्या पूर्वार्धात पेरलेल्या कष्टाचे चीज उत्तरार्धात फळफळून वर येईल.

31 जुलै – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, चंद्र, नेपच्यून, या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. स्वभाव इतरांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे परिस्थितीशी जुळवून घेणे कठीण जाईल. नातेवाईक व कौटुंबिक सदस्यांमुळे कोर्टाची पायरी चढावी लागेल. आर्थिक बाबतीत विचीत्र स्वभावामुळे इतरांशी जमणार नाही. एकट्याने केेलेली गुंतवणूक फायद्याची राहील.

1 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या सूर्य, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास सिंह आहे. तीव्र बुद्धी आणि विचारांची झेप वेगवान आहे. महत्त्वाकांक्षा दांडगी आहे. शासकीय अधिकारी, नगरपालिका, कोणत्याही सामाजिक कामात जास्त यश मिळेल. हर्शलच्या प्रभावामुळे जीवनाशी संबंधित भावी घटनांची चाहूल लागेल. आर्थिक बाबतीत भाग्य चांगली साथ देईल. कष्टाच्या जोरावर पुढील आयुष्यात धनी लोकात गणना होईल.

2 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, सूर्य, नेपच्यून ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास सिंह आहे. ग्रहांची चौेकट अशी आहे की, बौद्धीक व सामाजिक क्षेत्रात महत्त्व प्राप्त होईल. अनेक लोकांचा विश्वास संपादन कराल. प्रगतीच्या संधी नेहमी वाट पाहतील. कलाक्षेत्रात चांगले यश मिळू शकेल. वागण्यातील चलाखी व मुत्सद्देगिरीमुळे व्यवस्थापनात उत्तम यश मिळेल. आर्थिक क्षेत्रात फार भाग्यवान रहाल. पण पैशाबद्दल मनापासून आकर्षण राहील. विविध मार्गाने धनप्राप्ती होईल.

3 ऑगस्ट – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, गुरू, हर्षल या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास सिंह आहे. प्रबळ महत्त्वाकांक्षा हे तुमचे वैशिष्ट्य आहे. आयुष्यात मोठी झेप घ्याल. हातात घेतलेले काम एकाग्रतेने पूर्ण कराल. विवाहाच्यावेळी अडचणी येण्याची शक्यता आहे. दैवी शक्ती असल्याप्रमाणे फायदा कशात आहे याचा अंदाज अगोदरच येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या