Saturday, April 27, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

8 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू, शनी मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. शनी व गुरू यांच्या एकत्रित प्रभावामुळे इच्छाशक्ती प्रबळ राहील. सुरूवातीला करिअरमध्ये जीव तोडून मेहनत करावी लागेल. त्यामुळे लक्ष्य साध्य होईल. न्यायाधीश, वकील, व्यापारी म्हणून चांगले यश मिळेल. आत्मविश्वास वाढविल्यास आणि थोडी आक्रमक भूमिका घेतल्यास प्रगती पथावर पुढे जाणे शक्य होईल. अर्थप्राप्तीच्यादृष्टीने प्रगती हळुहळु पण निश्चीतपणे होत राहील.

- Advertisement -

9 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास धनु आहे. आशावादी आहात. आपले म्हणणे इतरांनी ऐकलेच पाहिजे. असा आग्रह असतो. इतरांच्या संकटकाळात मदतीला धावून जातात. तुमचे मनोबल व धैर्य अशावेळी जागृत होते. निसर्गाच्या सान्निध्यात रहाणे आवडते. धाडसी आहात. आतापर्यंत न पाहिलेल्या लांबच्या देशाचा प्रवास करणे ही महत्त्वाकांक्षा आहे. लवकर लवकर मोठ्या प्रमाणावर उद्योगधंदा करून भरपूर पैसा मिळेल. त्याहीपेक्षा बौद्धिक कामापासून जास्त धनयोग होण्याचा योग आहे.

10 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, गुरू, हर्षल या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. तुमचा चेहरा आनंदी, प्रसन्न असतो. आशावादी असल्याने कोणत्याही संकटाला किंवा त्रासाला मुळीच घाबरत नाहीत. बोलण्यात उदारपणा स्पष्ट झळकतो. स्पष्टवक्ते आहात. एका उद्योगात अपयश आल्यास निराश न होता दुसरा उद्योग सुरू करून त्यात यशस्वी होऊन दाखवाल. स्वतःजवळ असलेले दुसर्‍याला देण्याची वृत्ती असल्याने आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. त्याबाबतीत जागरूक रहा. माणूस ओळखण्याची कला जन्मजात असल्याने सहसा फसवणूक होणार नाही. कोणत्याही करिअरमध्ये विपुल प्रमाणात पैसा मिळवाल. शेअर्ससारख्या व्यवहारात गुंतवणूक करताना सावध रहा.

11 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, चंद्र, नेपच्यून ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. स्वभाव सौम्य, कमी आशावादी व कमी आत्मविश्वासाचा आहे. आध्यात्मिक कार्यात रस आहे. स्वप्नसृष्टीत होणार्‍या साक्षात्काराकडून भावी घटनांची सूचक चाहूल लागते. या शक्तीचा आर्थिक फायदा मिळण्यासाठी उपयोग करता येणार नाही. शिकण्याची जन्मतःच आवड आहे. वास्तविक पाहता पैसे मिळवण्याचे विशेष आकर्षण वाटत नाही. इतरांच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न कराल.

12 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या रवि, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास धनु आहे. रवि-गुरू एकत्र आल्यामुळे एक शक्तीशाली ग्रहयुती मदतीला आहे. उत्तम ऑर्गनायझर होणे चांगले जमेल. राजकीय चळवळीत जास्त यश मिळून अनेक प्रकारचे पुरस्कार मिळतील. पुढे अनेक मोठ्या जबाबदार्‍या सांभाळाव्या लागतील. सरकारी नोकरीत शिरल्यास उच्च पदापर्यंत पोहचाल. धार्मिक विषयांची आवड राहील. प्रगतीच्या या काळात मिळालेला पैसा 50 वयाच्या आतच योग्य गुंतवणूक करून ठेवावा.

13 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्शल, रवि, गुरू या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास धनु आहे. हुशार आहात. बौद्धिक पातळी उंच आहे. कार्यक्षेत्रातील विशेष गोष्टीवर बौद्धिकदृष्ट्या प्रभुत्व प्राप्त आहे. इतरांशी अंतर ठेवून वागताना दुसर्‍यांचा तुमच्याविषयी गैरसमज निर्माण होतो. साक्षात्कार होणे, विचीत्र स्वप्न भावी घटनांविषयी चाहूल अशा गोष्टी घडत रहातात. पैसा हा तुमच्या बाबतीत विचित्र विषय आहे. अद्भूत प्रकाराने तुमच्याकडे पैसा येतो खरा पण तो टीकवणे तुमच्या शक्तीच्या बाहेर आहे. कुठून तरी बाहेरून मदत मिळेल असे वाटत राहील.

14 डिसेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. जीवनात बुधाचा प्रभाव फार मोठा आणि महत्त्वाचा राहील. बुद्धी अतीशय तीक्ष्ण असून हुशार व हजरजबाबी असून नेहमी बौद्धिक व शारीरिकदृष्ट्या अस्वस्थ असता. काल्पनिकदृष्ट्या महत्त्वाकांक्षी आहात. आवडीनिवडी निश्चीत आहेत. मानसिक अस्वस्थेवर नियंत्रण केल्यास कोणत्याही करिअरमध्ये शिखर गाठू शकाल. आर्थिक उत्पन्नाच्यादृष्टीने भाग्यवान आहात. गुंतवणुकीतून चांगला पैसा मिळेल. मात्र गुंतवणूक स्वतःच्या मनाप्रमाणे करावी.

- Advertisment -

ताज्या बातम्या