Tuesday, April 23, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

30 मार्च – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरु, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. जीवनात यश मिळणार यात शंका नाही. इतरांवर हुकूमत गाजवणे ही शक्य होईल. भागीदारीत यश मिळेल. त्यासाठी उद्योगातील प्रमुखपद तुमच्या हातात असणे आवश्यक आहे. आदर्शवाद आणि वास्तविकता यांचा समतोल राखणे सहज जमेल. मोठ्मोठ्या धार्मिक, आर्थिक संस्थांशी तुमचा संबंध येईल. पैसा मिळवण्याच्या बाबतीत जागरूक असाल. आपल्या नावलौकीक ाला धक्का लावू नये. मोठ मोठ्या उद्योगाशी संबंध येईल.

- Advertisement -

31 मार्च – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, मंगळ, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. जीवनाच्या पूर्वार्धात पुष्कळ अडचणी येण्याची शक्यता आहे. कारण नातेवाईक, कुटुंबातील माणसे किंवा सासरवाडीकडील लोक यांच्याकडून त्रास संभवतो. कल्पना मौलिक असतील. विचार परंपरेला न जुळणारे असतील. स्वतंत्र बाण्यामुळे कार्यावर टिका होण्याची शक्यता आहे. शहाणपणा व दुसर्‍यावर विश्वास न ठेवण्याची वृत्ती आर्थिक परिस्थितीचे संरक्षण करतील. वारसाहक्काने संपत्ती मिळण्याचे योग. आहेत.

1 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, रवि या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास मेष आहे. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात या म्हणीप्रमाणे तुमचे विशेष गुण बालपणीच प्रकट होऊ लागतील. मौलिक प्रतिभेतून उत्तम योजना तयार करून त्या कार्यान्वित करताना माघार घेणार नाहीत कारण तुमची निश्चयी वृत्ती तसे करू देणार नाही. महत्त्वाकांक्षा स्पष्ट असेल. उच्च दर्जा प्राप्त कराल. एकट्याने केलेल्या कामात जास्त यश मिळेल. आर्थिक बाबतीत बराच चढउतार असेल. त्वरीत निर्णय घेऊन कृती करण्याचा उतावळेपणा करणे टाळा.

2 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, तुमच्या स्वभावात नेहमी द्वैत राहील. कधी कधी निश्चयी असल्यासारखे वागाल तर कधी लोण्याप्रमाणे मऊ असाल. रूढी, परंपरा यांचे दबाव न मानत त्याविरुद्ध बंड करून मनाप्रमाणे कार्य करमन प्रगती कराल. उद्योगात वारंवार बदल केल्यास नुकसान संभवते. आर्थिक बाबतीत उद्योगाची सूत्रे स्वतःच्या हातात ठेवल्यास उत्तम यश मिळेल. कलावंत, लेखकांना पैशांसोबत किर्तीही प्राप्त होऊ शकेल.

3 एप्रिल -वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरू, मंगळ या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मेष आहे. कोणत्याही क्षेत्रात प्रमुखपद भूषवण्यात यश मिळेल. मते फार पक्की व हुकूमशाही वृत्ती राहील. हाताखालील लोकांशी कडक व्यवहार राहील. त्यात जवळचा नातेवाईक व इतर असा भेद रहाणार नाही. शत्रू सामर्थ्यवान असतील. त्यांना परास्त करण्यासाठी तोलामोलाचे मित्र तयार करा. उपकार न घेण्याविषयी जागरूक रहाल.

4 एप्रिल – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, रवि, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मेष आहे. ग्रहांची चौकट अशी असेल की, जीवनात बराच विरोधाभास राहील. काही काळ यशाचा राहिल तर याउलटही परिस्थिती राहील. घडणार्‍या घटनांमध्ये अकल्पितपणा राहील. न होणार्‍या गोष्टी घडून जातील. खरे मित्र मिळणे सश्याचे शिंग शोधण्याइतके कठीण वाटेल. मानसिक स्थिती सदैव बेचैन राहील. त्यामुळे सतत उद्योगात बदल करावासा वाटेल. आर्थिक बाबतीत एकट्याने उलाढाल केल्यास आर्थिक बाबतीत प्रचंड यश मिळेल.

5 एप्रिल- वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, मंगळ या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास मेष आहे. मन व बुद्धी सर्वांगीण विकसीत असल्याने कोणत्याही विषयाचा ध्यास घेतल्यास त्यात प्राविण्य मिळेल. मात्र त्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शक व गुरू मिळायला हवा. बुद्धीमत्ता, हजरजबाबीपणा, त्वरीत निर्णयक्षमता पाहून लोक चकीत होतील. वाणी व लेखनीद्वारे कोणालाही सहजपणे मुद्दा पटवून शकाल. आर्थिक बाबतीत ठरवाल ते लक्ष्य गाठू शकाल. रूढीविरूद्ध बंड करून आपल्या अद्भूत बुद्धीतून निघालेल्या नवनवीन कल्पनांचा प्रसार करण्यात चांगले यश मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्ही ठरवाल ते लक्ष्य गाठू शकाल. पण अर्थापेक्षा स्वतःच्या कार्यावर तुमचे लक्ष्य जास्त प्रमाणात केंद्रीत कराल.

- Advertisment -

ताज्या बातम्या