Friday, April 26, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

17 नोव्हेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनी, मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. एकमेकांचे शत्रू असलेल्या मंगळ व शनी ग्रहांचे एकत्रिकरण अनेक अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. शनी न्यायाधीश असल्यामुळे अवैध मार्गाला गेल्यास शिक्षा करील. मात्र संकटातून निभावण्याची शक्ती मंंगळ देईल. आयुष्याच्या पूर्वार्धात क्रांतीसाठी बराच संघर्ष करावा लागेल. स्वतःचा निर्णय दुसर्‍यावर लादण्याची सवय राहीलश एकतर श्रीमंत व्हाल किंवा भयंकर आर्थिक अडचणीत सापडाल. मधला मार्ग नाही.

- Advertisement -

18 नोव्हेेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास वृश्चिक आहे. मंगळच्या प्रभावामुळे लष्कर व पोलीस खात्यात काम करणे प्रगतीचे राहील. तसे झाले नाही तर कोणत्याही करिअरमध्ये आपली लष्करी वृत्ती दाखविल्याशिवाय राहणार नाही. राजकारणात उत्तम नेता म्हणून चांगले यश मिळेल. संघर्षानंतर आर्थिक बाबतीत प्रचंड यश मिळेल. त्यानंतर कधीही पिछेहाट होणार नाही.

19 नोव्हेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर सूर्य, हर्षल, मंगळया ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. सूर्याच्या प्रभावामुळे शारिरीक मानसिकव मानसिक शक्ती चांगली राहील. राजकारणात उल्लेखनीय यश मिळू शकेल. बोलण्यातून विनोदाची पखरण करण्याची सवय असल्याने संपर्कात येणारा व्यक्ती हास्याच्या कारंज्याचा आनंद घेतील. दुसर्‍याचं दोष तिरकस शैलीने उघड करण्याची सवय शत्रु निर्माण करू शकेल. आर्थिक बाबतीत उत्तम यश मिळेल. पैसा कमावणे अवघड नसले तरी तो टिकवून धरणे जड जाईल.

20 नोव्हेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, मंगळ ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास वृश्चिक आहे. कमजोर मंगभ व चंद्र यांच्या विचीत्र मिश्रणाने तुमच्या स्वभावात बराच विरोधाभास निर्माण होईल. मनात नककी काय आहे हे ओळखणे कठीण आहे. नेमके कोणते करिअर करावे याचा निर्णय घेणे जड जाईल. विशेष काळजी घेतली नाही तर आर्थिक बाबतीत सतत चिंता वाटत राहील.

21 नोव्हेंबर – वाढदिवस असलेल्या मंगळ, गुरू या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास वृश्चिक आहे. गुरू मंगळ ग्रहाच्या एकत्रित प्रभावामुळे जीवनात यश मिळवून समाजात महत्त्व प्राप्त करणे कोणत्याही क्षेत्रात तुम्हाला सोपे जाईल. आत्मविश्वास दांडगा राहील. बर्‍याच कौटुंबिक जबाबदार्‍या सांभाळाव्या लागतील. अनेक लोकांचा सांभाळ करणे हे जणू पाचवीलाच पूजले आहे. आर्थिक बाबतीत नशीबवान आहात. मातीचे सोने करण्याची क्षमता तुमच्याजवळ आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात उत्तम यश मिळवून श्रीमंत व्हाल.

22 नोव्हेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंंगल, हर्षल, रवि या ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास वृश्चिक आहे. हर्षल व मंगळ यांच्या एकत्रित प्रभावामुळे जीवनात इतरांपेक्षा काही तरी वेगळे घडत राहील. गूढशास्त्रांचे आकर्षण वाटत राहील. नावीन्याची हौस असल्यामुळे नवनवीन प्रदेश पाहण्यासाठी बराच प्रवास घडेल. मनावर ताबा ठेवल्यास सवय केल्यास संकटांपासून संरक्षण मिळेल. आर्थिक बाबतीत अतिशय सावध रहाणे आवश्यक आहे. दुसर्‍याने दिलेल्या आश्वासनांवर विसंबून राहू नये.

23 नोव्हेंबर – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास धनु आहे. बुधाच्या प्रभावामुळे बुद्धीमत्तेत विलक्षण सामर्थ्य राहील. व्यवस्थापनाचे कौशल्य सहज आत्मसात करू शकाल. सहकार्‍याची पारख करणे चांगले जमेल. काहीसा संशयी स्वभाव असल्यामुळे सहकार्‍यांवर विश्वास टाकणे इतरांपेक्षा वेगळ्या मार्गाने धनप्राप्ती होईल. कल्पनाशक्ती प्रेमाच्या जोरावर कलेद्वारे धनप्राप्तीही होऊ शकेल.

- Advertisment -

ताज्या बातम्या