किरोच्या नजरेतून

16 ते 22 फेब्रुवारी 2023 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे जन्मतारखेनुसार भविष्य..
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

16 फेब्रुवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर नेपच्यून, चंद्र, हर्षल, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कुंभ आहे. एकाच प्रकारच्या नोकरी,धंद्यात टिकणे अवघड जाईल. निवडलेल्या नोकरी व्यवसायात टिकल्यास उन्नती होईल. चांगल्या व्यक्ती व चांगल्या वातावरणात वावरणे चांगले. आर्थिक बाबतीत धनसंग्रह करणे व स्थावर इस्टेट जमविणे सहज शक्य होईल. सट्ट्यासारख्या व्यवहारात भाग न घेतलेला बरा. तोटा होण्याची शक्यता आहे.

17 फेब्रुवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनी,हर्षल या ग्रहांचा प्रभाव राहील. तुमची सूर्य रास कुंभ आहे. विचार करण्याची सवय आहे. जीवनाच्या प्रत्येक गोष्टीचा तत्वज्ञानाच्या दृष्टीकोनातून विचार कराल. संधी शोधण्याची गरज नाही संधी तुम्हाला शोधत येईल. भौतिकदृष्ट्या जीवनात चांगले यश मिळेल. नोकरी असो वा व्यापार भरपूर जबाबदारी सांभाळावी लागेल. यश मिळेल. मिळालेल्या धनाचा सांभाळ करणे कठीण जाईल.

18 फेब्रुवारी -वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, शनि, या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कुंभ आहे. भरपूर नावलौकीक होईल. अभिनय असो वा सभा, संमेलन यात तुमचा प्रभाव जाणवेल. स्वतंत्र बाणा हे तुमच्या स्वभावाचे वैशिष्ट्ये आहे. असत्य व अन्याय याविषयी चीड आहे. इतरांना त्रास झाल्याचे तुम्ही बंड कराल. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात. निरनिराळया गुंतवणूकीच्या माध्यमातून धनसंग्रह वाढवू शकाल. दानशूर म्हणून प्रसिद्धी मिळेल.

19 फेब्रुवारी -वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कुंभ आहे. सुरूवातीच्या आयुष्यात बरेच कष्ट करावे लागतील आखून ठेवलेल्या मार्गावर जाणे शक्य होणार नाही. कल्पनाशक्ती दांडगी असल्यामुळे आश्चर्यकारक योजना तयार कराल. डॉक्टर, वकील यासारख्या प्रोफेशनपेक्षा व्यापारात जास्त यश मिळेल. बँकींग , आर्थिक देवघेव अशा ठिकाणी यश मिळेल.

20 फेब्रुवारी - वाढाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कुंभ आहे. तुम्हाला तुमच्या योजना कार्यान्वित करुन आपली महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे सोपे जाईल. तुमच्या जीवनात अनेक रोमँटिक घटना घडतील. आदर्शवादामुळे तुमचा अनेक स्त्रियांशी फार जवळचा संबंध येण्याची शक्यता आहे. आयुष्यात उन्नतीसाठी तुम्ही जीवापाड मेहनत घ्याल. सुरुवातीचे तुमचे वातावरण व परिस्थिती याचा वीट आल्यामुळे त्यातून तुमची स्वतःची सुटका करुन घेऊन स्वतःच्या पायावर उभा राहील. उत्तरायुष्यात तुमची धनी लोकांत गणना व्हावी एवढा धनसंग्रह करू शकाल. वारसाहक्काने धनसंपत्ती मिळणेही शक्य आहे.

21 फेब्रुवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर गुरु या ग्रहाचा प्रभाव आहे. गुरुच्या शुभ प्रभावामुळे तुम्ही आपल्या महत्वकांक्षेला पूर्णपणे वाव दिल्यास यश तुम्हाला शोधत येईल. ज्या कामात भरपूर जबाबदारी आहे आणि दुसर्‍यावर सत्ता गाजविण्याची संधी आहे. अशा कामात तुम्हाला उत्तम यश मिळेल. मग ते काम कोणत्या का प्रकारचे असेना, एकदा तुमची महत्वाकांक्षा जागृत झाली की कोणत्याही प्रकारच्या व्यवसायात अथवा नोकरीत यश मिळणे तुम्हाला मुळीच जड जाणार नाही. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक उलाढालीत भाग घेतला तरी तुम्हाला लाभ होईल.

22 फेब्रुवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर हर्षल, शनी या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात चार व आठ आकड्याशी संबंध टाळणे तुमच्या फायद्याचे राहील. तुमचे विचार, योजना व कृती इतरांपेक्षा अगदी वेगळ्या असतील. कारण तुमचे विचार स्वतंत्र आणि मौलिक असतील. नाविन्याची तुम्हाला फार आवड राहील. मग ते नवीन तत्वज्ञान असो अथवा धर्माच्या नवीन पंथ असो. त्यामुळे तुमची वागणूक आत्मकेंद्रीत आणि विचित्र आहे असे अनेकांना वाटेल. अद्भूत बुद्धीच्या आधारावर अलौकीक मार्गाने धनप्राप्ती कराल.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com