Monday, April 29, 2024
Homeभविष्यवेधकिरोच्या नजरेतून

किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

25 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्यून, बुध, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मिथून आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, विचित्र वस्तुचा संग्रह करणे आवडेल. गूढशास्त्राबद्दल आकर्षण वाटेल. योग्य मार्गदर्शन मिळाल्यास चांगली प्रगती कराल. भावी घटनांचा भास होत राहील. एकाच प्रकारचे काम सारखे करत राहील्यास बेचैन वाटेल. आर्थिक बाबतीत आयुष्याच्या पूर्वार्धात बर्‍याच प्रकारच्या अडचणी येण्याची शक्यता आहे. उत्तरार्धात तीक्ष्ण बुद्धीमुळे आर्थिक स्थिती उत्तम राहील.

- Advertisement -

26 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनी, चंद्र, बुध, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथून आहे. ग्रहांची चौकट अशी आहे की, करिअर च जीवन दोन्हीही इतरांपेक्षा वेगळे असेल. एक तर तुम्ही अतिशय सामर्थ्यवान व भाग्यवान असाल किंवा त्या उलट असाल. जीवनात एकाकी वाटेल. नातेवाईक खूप दुःख देतील आणि आर्थिक नुकसानही करतील. केवळ भाग्याची साथ म्हणून नव्हे तर हिशोबीपणा, सतर्कता व शहाणपणा याचा उपयोग करून भक्कम योजनांतून पैसा गुंतवल्यामुळे श्रीमंत व्हाल.

27 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, बुध, चंद्र, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सुर्य रास मिथून आहे. सामर्थ्यवान ग्रहांची चौकट लाभलेली आहे. आयुष्य धोके पत्करणे व अ‍ॅडव्हेंचरने भरलेले आहे. निश्चयीवृत्ती, प्रबळ इच्छाशक्ती ही चांगल्यासाठी कींवा वाईटासाठी वापरायची ही तुमच्या बुद्धीच्या आकलन बळांवर अवलंबून आहे.व्यवस्थापन कौशल्य चांगले आहे त्यामुळे मोठमोठ्या कंपन्यांच्या संचलनाचे काम चांगले जमेल. पैसा मिळाला खर्चावर नियंत्रण न ठेवल्याने धनसंग्रह कठीण आहे. व्यापार, उद्योग, आर्थिक उलाढाली यातून प्रचंड धनसंपत्ती प्राप्त होईल. अतिखर्च व हेकेखोरपणा टाळल्यास आर्थिक स्थिती उत्तम राहील.

28 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर बुध, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मिथुन आहे. उत्तम गुणांचा तुमच्या जीवनावर व करिअरवर प्रभाव असेल. आत्मविश्वास दांडगा राहील. स्वभाव शांत व सभ्य आहे. सृजनशीलता व मौलिकता वाखाणण्याजोगी आहे. योजना मोठ मोठ्या असतील. त्याविरूद्ध जाणार्‍या लोकांंची गय करणार नाही. लाथ मारेल तिथे पाणी काढेल अशी वृत्ती असल्याने कोणत्याही करिअरमण्से उत्तम यश मिळेल. आर्थिक बाबतीत भाग्यवान असाल. सट्ट्यासारख्या व्यवहारात थ्रील वाटेल. सढळ हाताने पैसा खर्च कराल.

29 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, बुध, शुक्र या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मिथून आहे. चंद्राचा प्रभाव राहील्याने कल्पनाशक्ती चांगली राहील. कलेमध्ये रस असेल. आदर्शवाद, गूढशास्त्रे, अध्यात्म या विषयात जास्त रस वाटेल. यावरच तुमचे जीवन घडले जाईल. तुमचे घर सुंदर वस्तुंचे माहेरघर असेल. निवासस्थानात अनेक वेळा बदल होतील. आर्थिक बाबतीत कधी कधी भाग्याच्या वारूवर मांड ठोकून घोडदौड कराल तर कधी कधी त्याउलट परिस्थिती राहील.

30 मे – वाढदिवस असलेल्या बुध, गुरू, शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास मिथून आहे. ग्रहांची चौकट चांगली असल्याने जीवनात यशस्वी होणे सहज शक्य आहे. महत्त्वाकांक्षी स्वभावाला वाव द्यावा. आपल्यापेक्षा उच्च व महत्त्वाकांक्षी सामाजिक व आर्थिक् स्तर असलेल्या लोकांच्या संगतीत रहाण्याचा प्रयत्न करा. अन्याय सहन होत नाही. न्याय मिळवण्याचा प्रयत्न कराल. आर्थिक स्थितीबाबत मुळीच चिंता करण्याचे कारण नाही. मोठ्या संधी स्वतःहून तुम्हाला शोधत येतील. लक्ष्मी गळ्यात यशाची माळ घालील.

31 मे – वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, केतू, रवी, शुक्र ग्रहांचा प्रभाव राहील. सूर्य रास मिथून आहे. ग्रहांची चौकट अतिशय चांगली व वेगळी आहे. जीवनात अनेक अकल्पित घटना घडतील. जीवनपथ इतरांपेक्षा वेगळा असेल. भौतिक यश कदाचित मिळणार नाही. कारण इतरांच्या मार्गदर्शनाखाली काम करणे आवडणार नाही. तरी सर्व प्रकारचे अडथळे पार करून हवे ते हवे तितके मिळवून समाधानी व्हाल. आर्थिक स्त्रोत इतरांपेक्षा वेगळा असेल.मौलिक व अद्भूत आर्थिक आवक चालू राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या