किरोच्या नजरेतून

9 ते 15 मार्च 2023 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे जन्मतारखेनुसार भविष्य..
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

9 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर मंगळ, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. मंगळाच्या प्रभावामुळे तुम्हाला त्वरित निर्णय घेण्याची सवय आहे. विशेष म्हणजे ती कृतीत आणण्याची ‘लगीनघाई’ तुम्हाला होते. नेहमी तुम्हाला बेचैन असल्यासारखे वाटेल. बदल करावा असे वाटत असले तरी धंदा, व्यवसायाच्या बाबतीत तसे करु नये. तोटा होण्याची भीती आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवावे. तुम्हाला गुप्त शत्रू फार असतील. त्यांच्याकडून खाली ओढण्याचे प्रयत्न होतील. आर्थिक स्थिती वर खाली असेल. वृद्धापकाळासाठी तरतूद करून ठेवा. शेअर्स, सट्टा यासारख्या व्यवहारात भाग घेऊ नये. े

10 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर रवि, हर्षल, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. हर्षलचा प्रभाव तुमच्या जीवनावर नेहमी राहील. त्यामुळे तुमच्या आयुष्यात घडणार्‍या घटनेत अचानकता फार राहील. रवि व हर्षल यांच्या एकत्रित प्रभावामुळे स्वप्नाद्वारे तुम्हाला भावी घटनांची आधीच चाहूल लागेल. त्यातून मिळालेल्या सूचनांचा तुमच्या नोकरी, व्यवसायात उपयोग केल्यास तुमचा फायदा होईल. विनाकारण काळजी करण्याची सवय कमी करावी. आर्थिक बाबतीत भाग्यवान आहात. तशा संधी स्वतःहून तुमच्याकडे येतील.

11 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर चंद्र, नेपच्युन, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. तुम्ही जीवनात भरभरुन यश मिळवू शकाल. मात्र त्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी कराव्या लागतील. इच्छाशक्ती वाढविणे, घेतलेल्या निर्णयात बदल न करणे यासाठी तुम्हाला तुमचे लक्ष्य निर्धारीत करणे आवश्यक आहे. तांत्रिक कार्यापेक्षा कलाक्षेत्राशी संबंधित टीव्ही, सिनेमा, लेखन इ. कार्यात तुम्हाला जास्त यश मिळेल. तुमची संवेदनशीलता अधिक असल्यामुळे कर्तृत्वशाली वाढविण्यासाठी शांत परिसरात राहणे आवश्यक आहे. त्यातल्या त्यात निसर्गाचे सान्निध्य व सौंदर्य तुमची कार्यशक्ती चांगली वाढवील.

12 मार्च -वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. तुमची महत्वाकांक्षा मोठी राहील. तुमचा उत्साह बौद्धिक कार्यात इतका दांडगा राहील की तुम्हाला कितीही बौद्धिक काम केले तरी थकल्यासारखे वाटणार नाही. तुमचे कोणते का कार्यक्षेत्र असेना तुमच्या हाताखाली काम करणारे अनेक लोक असतील व बहुधा त्यांना प्रमुख म्हणूनच तुम्हाला काम करावे लागेल. असे झाले तर तुमचे सहकारी व भागिदार तुमच्यावर फार खुश राहतील. पैशांसोबत नावलौकिकासाठी चारित्र्य शुद्ध ठेवाल.

13 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, गुरु, रवि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. परंपरा व रुढीबद्दल आपुलकी नसल्यामुळे त्या गोष्टी पाळणे तुम्हाला जड जाईल. त्यामुळे इतरांना तुमचे वागणे विचित्र आहे असे वाटण्याची शक्यता आहे. आयुष्याच्या सुरुवातीला तुम्हाला नातेवाईकांचा विरोध, कौटुंबिक समस्या व पत्नीच्या नातेवाईकांकडून त्रास सहन करावा लागेल. तुम्हाला काही देणार्‍यापेक्षा तुमच्याकडून घेणार्‍या लोकांची संख्या अधिक असेल. शहाणपणाने उत्तम धनसंग्रह जमेल.

14 मार्च -वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. आयुष्यात यशस्वी व्हायचे की अपयशाच्या खोल दरीत पडावयाचे हे तुमच्या हातात राहील. सकारात्मक वृत्तीची जोपासना केल्यास तुम्हाला प्रचंड यश मिळेल. त्या उलट नकारात्मक वृत्तीच्या लोकांची संगत तुम्हाला अपयशाच्या खोल दरीत लोटून देऊ शकेल. सकारात्मक वृत्तीची जोपासना केल्यास तुमची विलक्षण बुद्धीमत्ता व परिस्थितीशी जुळवून घेण्याची आश्चर्यकारक शक्ती तुम्हाला यशाच्या उंच शिखरावर घेऊन जाईल. पैसे मिळवण्यापेक्षा ते टिकवून धरणे जड जाईल.

15 मार्च - वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शुक्र, गुरु या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मीन आहे. शुक्र आणि गुरुच्या छत्राखाली राहून आयुष्यात प्रचंड यश मिळेल. नाही असे कधी होणार नाही. इतकी ही युती प्रबळ आहे. या सर्व सौंदर्याने परिभूत असलेल्या गोष्टींचे तुम्हाला फार आकर्षण राहील. त्यामुळे संगीत, पेंटींग, काव्य, साहित्य, नाटक, सिनेमा व टीव्ही या कार्यक्षेत्रामध्ये उत्तम प्रकारचे यश मिळवून नावलौकिकही मिळेल. पैशांबरोबर रत्न व दुर्मिळ भेटवस्तूचा संग्रह असेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com