किरोच्या नजरेतून

19 ते 25 जानेवारी 2023 या आठवड्यात जन्मलेल्या व्यक्तींचे जन्मतारखेनुसार भविष्य..
किरोच्या नजरेतून

सौ. वंदना अनिल दिवाणे

19 जानेवारी - वाढदिवस असलेल्या सूर्य, हर्षल, शनिग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. सूर्य व हर्षल यांच्या प्रभावामुळे व्यक्तीमत्व विशिष्ट प्रकारचे व इतरांपेक्षा वेगळे राहील. तुमचे विचार मौलिक असतील. त्यातून अनेक विधायक कार्य पार पाडाल. बर्‍याच वेळा असे होईल की, यश मिळता मिळता हुलकावणी देईल. पण जीवनात यश मिळेल हे नक्की. स्वभाव काटकसरी असल्याने आर्थिक गुंतवणुकीच्या बाबतीत फार सावधानता बाळगा. त्यातून पुढे कमाई होईल.

20 जानेवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, नेपच्यून, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास मकर आहे. नेपच्यूनच्या प्रभावामुळे स्वभाव सौम्य राहील. कल्पनाशक्ती चांगली असून दैवी कृपेने प्रतिभेची देणगी जन्मतःच लाभली आहे. अतीसंवेदनशीलतेमुळे दुसर्‍याने सहज वापरलेला शब्दही तुम्हाला लागेल. कल्पनाशक्तीवर आधारित सर्व प्रकारच्या लेखन, चित्रकला,इ. कलामध्ये यश मिळू शकेल. आत्मविश्वासात वाढ केल्यास तुमची स्वप्ने खरी करू शकाल. पैशाचे आकर्षण नसल्यामुळे गरजेइतका पैसा मिळाला तरी तुम्ही खूष रहाल.

21 जानेवारी -वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर शनि, गुरू या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य कुंभ आहे. गुरूच्या प्रभावामुळे आक्रमक वृत्ती राहील. पण ती इतरांच्या भल्यासाठी असेल. करिअर कोणते का असेना त्यात पुढे जाण्याची महत्त्वाकांक्षा दांडगी राहील. सामाजिक कामात पुढाकार घेऊन इतरांवर राज्य करण्यात आनंद वाटेल. वैवाहिक जीवनात काळजी घ्या अन्यथा पश्चाताप करावा लागेल. गुंतवणूक मोठ्या प्रमाणात असेल, यश सहन न झाल्याने शत्रु तुम्हाला मागे ओढण्याचा प्रयत्न करतील. पण अपयशी ठरतील.

22 जानेवारी -वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर हर्षल, सूर्य, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कुंभ आहे. तुमचे मौलिक विचार इतरांना न पटल्यामुळे इतरांशी फटकून राहून तुम्ही स्वतंत्रपणे आपली उद्योग उभा कराल व पुढे याल. इतरांचा विरोध होईल पण संयम ठेवण्यात यश आल्यास विरोधकांचे नामोहरण होईल. नशिबावर तुमचा फार विश्वास आहे. मोठ्या प्रमाणावर आर्थिक प्राप्ती होऊनही पैसा खर्च झाल्यामुळे धनसंग्रह करणे कठीण जाईल.

23 जानेवारी -वाढदिवस असलेल्या व्यक्तींवर बुध, शनि या ग्रहांचा प्रभाव आहे. सूर्य रास कुंभ आहे. बुधाच्या प्रभावामुळे एकाच वेळी अनेक विषयात व उद्योगात प्राविण्य संपादन करता येईल. तुमचे चांगले करण्यासाठी मदत करणार्‍या लोकांविषयी तुमच्या मनात शंकेची पाल चुकचुकत राहील. मुत्सद्दी व धुर्त स्वभावामुळे इतरांच्या मनातील विचार सहज बाहेर काढाल. कर्जाची भिती वाटेल. संधीची बस चुकू देऊ नका

24 जानेवारी-वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर शुक्र, शनी या ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची कुंभ आहे. तुमच्या जीवनात प्रेम, प्रेमविवाह याला जास्त महत्त्व राहील. तुमच्या व्यक्तीमत्त्वात एक संमोहनशक्ती आहे. इच्छाशक्तीत वाढ केल्यास त्याचा प्रगतीसाठी उपयोग करू शकाल. मनासारखा धनसंग्रह होत नाही अशी तक्रार करीत करीत हळुहळु पण निश्चीतपणे अधिक सुस्थिती प्राप्त होईल.

25 जानेवारी - वाढदिवस असलेल्या व्यक्तीवर चंद्र, शनि, ग्रहाचा प्रभाव आहे. तुमची सूर्य रास कुंभ आहे. भक्तीमार्गाकडे तुमचा ओढा राहील. स्वभाव आदर्शवादी आहे. कल्पनाशक्ती विशेष असल्याने आपल्या कल्पना विश्वात रमाल. प्रवासाची अत्यंत आवड आहे. परदेशगमन योग संभवतो. व्यापार्‍याच्या निमीत्ताने दूरवर प्रवास घडेल. भरपूर अर्थप्राप्ती असून खर्चावर नियंत्रण नसल्यामुळे आर्थिक बाबतीत चिंता राहील.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com