हे काम तुम्हाला बनवू शकतात भाग्यशाली
भविष्यवेध

हे काम तुम्हाला बनवू शकतात भाग्यशाली

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

प्रत्येक व्यक्तीला भाग्यशाली बनायचे असते; पण बर्‍याच वेळा मेहनत करून देखील त्याचे भाग्योदय होत नाही. जर तुमच्यासोबत देखील असेच होत असेल तर हा त्रास दूर करण्यासाठी या चार गोष्टी तुमची मदत करू शकतात.

1. मेन गेटजवळ ठेवा झाड रोपटे- घर किंवा दुकानाच्या मेन गेटमधूनच बर्‍याच प्रकारची एनर्जी प्रवेश करते. नेगेटिव्ह एनर्जी थांबवण्यासाठी आणि सकारात्तकता वाढवण्यासाठी घर किंवा दुकानाच्या मेन गेटजवळ सुंदर आणि सुगंधित रोपे लावावीत. लक्षात ठेवा की झाड काटेदार किंवा टोकदार नको, अशी रोपे नकारात्मकता वाढवितात.

2. हिंसा दर्शवणारे फोटो लावू नयेत - घर किंवा दुकानात कधीपण हिंसा दाखविणारे फोटो लावू नयेत. खास करून घर किंवा दुकानाच्या दक्षिण पश्चिम दिशेत तर बिलकुलच नाही. कारण हा कोपरा नात्याशी संबंधित असतो. म्हणून, त्रास दूर करून, भाग्योदयासाठी हिंसक दृश्य किंवा हिंसक जनावरांचे फोटो घर किंवा दुकानात लावू नये.

3. तिजोरी किंवा गल्ल्यात लावा आरसा - आपल्या घरात किंवा दुकानाच्या तिजोरीत किंवा गल्ल्यात खाली आणि वरच्या दिशेने आरसा लावावा. असे करणे फारच शुभ असत. यामुळे मिळकत चांगली होते आणि पैशांचा प्रभाव वाढतो. तसेच गल्ल्यात चांदी सोन्याचे नाणे ठेवणे देखील चांगले असते.

4. दूर करावा पायर्‍यांशी संबंधित दोष - बर्‍याच वेळा घर किंवा दुकानात असणार्‍या पायर्‍या देखील तुमच्या त्रासाचे कारण बनू शकतात. सरळ पायर्‍या चांगल्या नाही मानल्या जातात, त्याच्या जागेवर वाकड्या किंवा गोलकार पायर्‍या भाग्यशाली असतात. जर तुमच्या घरात किंवा दुकानात सरळ पायर्‍या असतील तर त्याच्या खाली सहा रॉड असणारे विंड चाइम लावून द्या. असे केल्याने पायर्‍यांशी संबंधित वास्तू दोष दूर होतो.

Deshdoot
www.deshdoot.com