ही योगासने तणावमुक्त राहण्यास मदत करतील

ही योगासने तणावमुक्त राहण्यास मदत करतील

आनंदी जीवन जगण्यासाठी माणसाचे मन शांत असणे अत्यंत आवश्यक आहे. ज्यामध्ये योग महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. दररोज फक्त 15-20 मिनिटे योगा केल्याने एखादी व्यक्ती आपले मन तणावमुक्त करू शकते. आपण अशा काही योगासनांविषयी जाणून घेऊया, जे रोज करून तुम्ही मुक्त राहू शकता.

भुजंगासन (Bhujangasana)- या आसनात शरीराचा आकार सापा सारखा बनतो, अर्थात भुजंगासारखा म्हणूनच या आसनाला भुजंगासन असे म्हटले जाते. आधी पोटावर झोपावे. दोन्ही पायांना जोडावे. हनुवटी फरशीवर ठेवावी. कोपरे कमरेला टेकलेले. आता हळूहळू दोन्ही हातांच्या आधारे कमरेपासून वरचा भाग जितका शक्य असेल तितका वरती उचलावा. वर आकाशाकडे पाहावे. आता त्याच सावकाश गतीने पुन्हा जमिनीच्या दिशेने यावे. हे आसन करण्याचा कालावधी तुम्ही आपल्या शारीरिक क्षमतेनुसार कमी अधिक ठरवू शकता.

सर्व प्रकारच्या जुन्या आजारांमध्ये या आसनाचा फायदा होतो. या आसनाने गळा, पोट, पाठ, आणि कंबरेचा चांगला व्यायाम होतो. यामुळे आपल्या पित्ताशयाची क्रियात्मकता वाढते. पचन शक्ती वाढ होण्यासाठी हे फायदेकारक आहे. पोटावरती निर्माण झालेली अतिरिक्त चरबीही हे आसन केल्याने कमी होते, आणि आपण सुडौल दिसायला लागता.

उष्ट्रासन (Ustrasana)- सुरवातीला वज्रासनात बसा. त्यानंतर गुडघ्यांवर उभे राहा. सहाजिकच पाय मागे रहातील. आता दोन्ही हात समोर न्या. त्यानंतर हात कानावरून मागे घ्या. त्यानंतर शरीराचा पुढील भाग हळू हळू मागे झुकविण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर हातही पूर्णपणे मागे न्या. आता हातांनी टाच पकडण्याचा प्रयत्न करा. मानही मागे वळवा आणि डोकेही मागे न्या. तुमचे शरीर आता मागच्या बाजूला झुकलेले असेल. या आसनातून बाहेर येताना दोन्ही हात एकाचवेळी पुन्हा पुढे येतील आणि त्यानंतर वज्रासनातून बाहेर या.

सूचना - हे आसन करण्यासाठी शरीराला जास्त ताण देऊ नका. मागे झुकताना मांड्या सरळ ठेवा. अंतिम स्थितीत मानेपासून गुडघ्यापर्यंतचा भाग सरळ येणे अपेक्षित आहे. आसनस्थितीतून परतताना सावधगिरी बाळगा. हार्नियाचा त्रास असणार्‍यांनी हे आसन करू नये.

फायदे - या आसनामुळे गुडघे, ब्लडर, किडनी, यकृत, लिव्हर, फुप्पुसे, मानेचा भाग यांना चांगला व्यायाम मिळतो. हे आसन केल्यास शरीरात स्फूर्ती निर्माण होते. श्वास, पोट, पाय, खांदे, पाठीचा कणा यांना ताण बसून त्यांचा चांगला व्यायाम होतो. या आसनामुळे पोटासंबंधी आजार बद्धकोष्ट, अपचन, एसिडिटी दूर होण्यास मदत होते.

सेतुबंधासन (Setubandhasana)- सेतुबंधासन : सेतूचे अर्थ आहे पूल. सेतुबंधनाच्यापूर्वी अर्धंसेतुबंधनासन करावं. यामध्ये व्यक्तीचा आकार एखाद्या पुलाच्या सम होतात. म्हणूनच याचा नावामध्ये पूल हे जोडलेले आहे.

खबरदारी - अर्धंसेतुबंधासन काळजीपूर्वक केले पाहिजे कोणत्याही प्रकाराचा हिसका देऊ नये. स्वतःचा तोल सांभाळा. जर आपल्या कंबर, तळहात आणि मनगटावर जास्त वजन पडत असल्यास सर्वात आधी भुजंगासन, शलभासन आणि पुर्वोत्तनासनचा सराव 1, 2 महिन्या पर्यंत करावा. त्यामुळे अर्धंसेतुबंधासनाचा अभ्यास आपल्यासाठी सोपा होईल. ज्यांना आधीपासूनच कंबरदुखी, स्लिपडिस्क किंवा अल्सरचा त्रास आहे त्यांनी अर्धंसेतुबंधासनाचा सराव करू नये.

फायदे - अर्धंसेतुबंधासनाने मन एकाग्र होते, जे चक्रासन करू शकत नाही, ते या आसनाचा लाभ घेऊ शकतात. स्लिप डिस्क, कंबर, ग्रीवा वेदना आणि पोटाच्या आजारावर फायदेशीर आहे. हे आसन मेरुदंडाच्या सर्व कशेरुकांना त्यांच्या जागेवर ठेवतात. हे आसन कंबर दुखी दूर करण्यासाठी साहाय्य करतं. पोटाचे सर्व अवयव जसे की यकृत, स्वादुपिंड (पेनक्रीयाज) आणि आतड्यांमध्ये ताण येतं. बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो. भूक व्यवस्थित लागते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com