Tuesday, April 23, 2024
Homeभविष्यवेधकरण जोहरच्या आयुष्यात शुक्राचा प्रभाव

करण जोहरच्या आयुष्यात शुक्राचा प्रभाव

करण जोहर यांचा जन्म 25 मे 1972 साली मुंबईत झाला. चित्रपट निर्माता, पटकथा लेखक, वेशभूषा डिझायनर, दूरचित्रवाणीचे संयोजक, परीक्षक, मुलाखतकार अशा विविध भुमिका पार पाडणारा चतुरस्त्र माणूस. करण जोहर निर्माता यश जोहर यांचे पुत्र. त्यांनी रोमँटिक कॉमेडी-चित्रपट कुछ कुछ होता है पासून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्यांना यासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक व सर्वोत्कृष्ट पटकथेसाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

एकत्र कुटुंबातील मेलोड्रामा कभी खुशी कभी गम आणि रोमँटिक चित्रपट कभी अलविदा ना कहना हे त्यांचे पुढचे चित्रपट. या चित्रपटांनी देशांतर्गत आणि परदेशी बाजारपेठेत व्यावसायिकदृष्ट्या मोठे यश मिळवले. माय नेम इज खान या त्यांच्या सामाजिक चित्रपटाने त्यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवला. धर्मा प्रॉडक्शन बॅनरखाली त्यांनी तयार केलेल्या अनेक यशस्वी चित्रपटांसह, त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीतील अग्रणी दिग्दर्शक-निर्माते म्हणून स्थापित केले आहे. त्यांनी मनोरंजन उद्योगाच्या इतर क्षेत्रातही यशस्वी पाऊल टाकले आहे. ते टेलिव्हिजन टॉक शो, कॉफी विथ करण, डेटिंग शो व्हॉट द लव्ह आणि रेडिओ शो कॉलिंग करण आणि रिअ‍ॅलिटी शो झलक दिखला जा, इंडियाज गॉट टॅलेंट, इंडियाज नेक्स्ट सुपरस्टारमध्ये परिक्षक होते.

- Advertisement -

2020 मध्ये कारण जोहर यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. करण जोहर यांनी वडील यश जोहर यांनी स्थापन केलेली धर्मा प्रोडक्शन कंपनीची धुरा सांभाळली. स्वतःच्या दिग्दर्शनाचे काम तर केलेच शिवाय त्यांनी या बॅनरखाली इतर दिग्दर्शकांच्या सोबत घेत अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली.

करण यांना लाभलेले भाग्य व त्या भाग्यात असलेल्या उणेपणाबद्दल हस्तसामुद्रिकशास्राच्या दृष्टीकोनातुन त्यांच्या हातावरील रेषा काय भाकीत वर्तवित आहे, ते आपण पाहणार आहोत. मानवाच्या आयुष्यात काही ना किंवा उणेपणा आहे. सर्व सुखे फार क्वचितच एखाद्या माणसाच्या वाट्याला येतात. परंतू असा माणूस विरळाच. प्रत्येकाच्या जीवनातील त्याच्या अशा, आकांशा, स्वप्ने ही वेगवेगळी असतात. व्यक्तीला जे प्राप्त नाही त्याची प्राप्ती होण्याची अभिलाषा असते.

हस्त सामुद्रिकशास्त्रात व्यक्तीला त्याच्या संपूर्ण जीवनात कोणती सुखे प्राप्त आहेत, कुठल्या सुखात उणीव आहे व ती व्यक्ती आयुष्यभर कोणत्या सुखापासून वंचित राहू शकते याचे अचूक निदान होते. जीवसृष्टीत जीवाला त्याचा परिवार वाढविण्याच्या दृष्टीने नर-मादीची निर्मिती विधात्याने केली आहे. वंश वाढविण्याच्या दृष्टीने प्रत्येक मनुष्य मात्रात संवेदना दिल्या आहेत. प्रेम भावना व काम भावनेतून मिळणारी तृप्ती वंश वृद्धीसाठी कामाला येते. हस्तसामुद्रिकदृष्टया विवाह रेषा काम भावनेची रेषा आहे. जी डाव्या व उजव्या हातावर हृदय रेषेच्या वर व करंगळीच्या तिसर्‍या पेर्‍याच्या खाली बुध ग्रहावर असते. या रेषेवरून वैवाहिक सौख्य, आपत्य, कामभावनेची मात्रा किती आहे, हे अचूक कळते. या विवाह रेषेवर बारीक बारीक दोन ते तीन मिली मीटर उंचीच्या उभ्या रेषा असतात. या एकूण नशिबी असलेल्या अपत्यांची संख्या दाखविते. पण मनुष्याने नियमन केल्याने त्याला त्याच्या नशिबी आपत्य किती या संख्येला आता अर्थ उरलेला नाही. हातावर शुक्र ग्रह हा प्रेम भावनेबरोबरच कामवासना व शुक्राणूंचा कारक आहे. शुक्र ग्रह बिघडलेला असला तरी शुक्राणूंमध्ये कमतरता येऊन अपत्य प्राप्ती होत नाही. निश्चित आपत्य प्राप्तीसाठी हातावर असलेल्या रेषा ग्रह यांचा विचार नुकताच मागील लेखात केलेला आहे.

विवाह रेषबरोबरच विवाह रेषेखाली असलेल्या हृदय रेषेला गायीच्या शेपटा सारखे फाटे हवेत. नाहीतर यांना अपत्य प्राप्तीसाठी आयव्हीएफ, टेस्ट ट्यूब बेबी किंवा वैद्यकशास्त्रातील विज्ञानाचा आधार घ्यावा लागतो. करण जोहर यांच्या डाव्या व उजव्या हातावरील हृदय रेषा शेवटपर्यंत सरळ व एकसारखी आहे. त्या हृदय रेषेंना शेवटी गायीच्या शेपटासारखे फाटे नाहीत. त्यामुळे नैसर्गिक अपत्य प्राप्ती होत नाही. अपत्य प्राप्तीसाठी आधुनिक विज्ञानाचा आधार घ्यावा लागतो. त्याप्रमाणे कारण जोहर यांनी सरोगसीद्वारे एक मुलगा व एक मुलगी अशी आपत्य प्राप्ती करून घेतली. कुंडलीशास्त्रातसुद्धा लग्नासाठी गुणमिलन पाहताना सर्वात आधी वंशवृद्धीची क्षमता तपासली जाते नव्हे. नंतरच बाकीच्या ग्रह व इतर बाबींचे गुण मिलन होते. या लेखाद्वारे हे अधोरेखित होत आहे कि हस्तसामुद्रिकशास्त्र किती प्रभावी आहे. व्यक्तीतील कमजोरी असो अथवा तिच्यातील अन्य गुण-अवगुण असोत ते प्रकर्षाने लक्षात येतात व त्यादृष्टीने जातकाला मार्दर्शन योग्यरीत्या व अचूक करता येते. करण जोहर यांनी त्यांच्यातील कमीपणा कधीही लपविला नाही किंवा त्याबद्दल खंत व्यक्त केली नाही. करण जोहर वयाच्या पन्नाशीच्या घरात आहेत. त्यांनी लग्नाचा विचार आधीही केला नाही व आता तर तेे शक्य वाटत नाही.

प्रफुुुल्ल कुलकर्णी

8888747274

- Advertisment -

ताज्या बातम्या